नमस्कार मित्रांनो, कोणतेही कार्य हे आढतळ्यांशीवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे न चुकता न थकता कार्य करत राहतात त्यांना यश नक्कीच प्राप्त होते. तुमच्या वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह असून बोध चिन्ह बैल आहे. बैलासारखं काम करणं अस आज नकारात्मक पद्धतीने म्हणलं जात. खरतर बैल हा प्रचंड परिश्रमी प्राणी आहे त्याचे महत्व कोणी शेतकऱ्याला विचारावं. त्यानुसार प्रचंड परिश्रम करणं हा तुमचा स्थायी भाव आहे. ते परिश्रम करत असताना त्यात अनेक प्रकारचे आढतळे येतात. त्यांना पार करून तुम्ही यशाचे शिखर गाठा.
व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना वृषभ जातकांसाठी अनेक प्रकारचे शुभ संकेत घेऊन येणारा आहे. महिन्याची सुरुवात ही लक्ष्मी नारायण योगाने होणार असून महिन्याच्या दुसऱ्या दिवसापासून मालव्य योग जास्त प्रबळ होईल म्हणजे शुभ योगांनी महिन्याची सुरुवात होत आहे.तसेच काही अशुभ योग देखील आहेत. महिन्याच्या सुरुवातीला तयार होणारा मालव्य योग तुमचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारा आहे. समोर कितीही मोठी स मस्या असली तरी तुम्ही तुमच्या बुद्धीने, कर्तृत्वाने पुढे जाणार आहात.
कुटूंब – कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी परस्पर विरुद्ध स्थिती निर्माण होत आहे. एकीकडे तुमचे व्यक्तिमत्त्व अत्यंत सकारात्मक पद्धतीने तयार होत असताना तुमचा जोडीदार मात्र अग्रेसीव होणार आहे म्हणून ती स्थिती तुम्ही अलगदपणे प्रेमाने सोडवली पाहिजे. सं तती तुम्हाला प्रचंड सहकार्य करणार आहे. आई थोडी नाराजी दाखवणार आहे. वडील तुमच्याकडे थोडंस दुर्लक्ष करणार आहेत. अशा कौटुंबिक पार्शवभूमीवर तुमचे व्यक्तिमत्व मात्र इतके समृद्ध असेल की कौटुंबिक ऐक्य राखण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात.
परिश्रम- तुम्ही प्रचंड परिश्रम करता आणि ते इतक्या शांतपणे करता की कोणाच्या लक्षात येत नाही की तुम्ही केव्हा, काय व कसे केले. सौम्यपणे, शांतपणे मोठी काम करणं हा तुमचा नैसर्गिक गुणध र्म आहे. तो या महिन्यात विशेषत्वाने वाढणार आहे. हा महिना तुमच्यासाठी व्यवसायात यश मिळवून देईल. रा जकीय क्षेत्रात यश मिळविण्यासाठी हा महिना चांगला राहील.
वास्तू, वाहन, जमीन – व्यापाऱ्यांनी ह्या महिन्यात कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करू नये. त्यासाठी थोडी वाट पाहावी. उत्साहात कोणतेही मोठे पाऊल उचलल्यास आपणास स मस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दृष्टीने विचार केला असता या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुम्ही कुटूंबाला जाणीवपुर्वक शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार आहात आणि ही बाब तुम्ही टाळली पाहिजे. कारण नियम लावून माणस बदलत नसतात त्याने ती फक्त तुमच्यापासून दुरावतात.
शिक्षण- शिक्षणात मोठे यश प्राप्त होऊ शकते. अकाउंट, मॅनेजमेंट क्षेत्रात जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर यशाची टक्केवारी ही प्रचंड मोठी असेल. विद्यार्थ्यांचा अभ्यास सहजपणे होईल. त्यांना कोणत्याही मोठ्या स मस्यांचा सा मना करावा लागणार नाही. नक्षत्रात बृहस्पती ची उपस्थिती असण्याने विद्यार्थ्यांना फा यदा होईल सोबतच, पंचम भावावर शनी ग्रहाची पूर्ण दृष्टी असण्याने शिक्षणात मेहनती नंतर चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्तीसाठी योग्य दिशा मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ बरीच चांगली राहील.
नोकरी व व्यवसाय – या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा तर व्यावसायिक जातकांसाठी प्रचंड मनस्थापाचा राहील. नोकरी करणाऱ्या जातकाना आपल्या कामातून समाधान प्राप्त होईल, व्यावसायिकांना मनस्थाप होईल. मात्र हा मनस्थाप तुम्हाला पुढील काळात यश देणारा राहील. महिन्याच्या पूर्वार्धात एकादश भावात शनीची स्थिती असण्याने आणि दुसऱ्या भावात शुकाची उपस्थिती असण्याने तुम्हाला आर्थिक लाभ होईल.
शुभ व ता णत णावाचे दिवस – 7,17 आणि 26 जुलै हे दिवस शुभ तर 5, 15 आणि 24 हे दिवस त णावाचे असतील. धनाच्या आगमनाचे नवीन मार्ग उघडल्यामुळे आर्थिक बाबतीत हा काळ चांगला आहे. भौतिक सुख-सुविधांसह व्यवसाय वाढेल. नोकरीत अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. स माजात मा न-सन्मान वाढत असताना क्षेत्रातील तुमच्या प्रयत्नांसाठी तुमचा स न्मान होऊ शकतो.
आ रोग्य – हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या आ रोग्यात खूपच सुधारणा होईल. या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी संमिश्र फलदायी म्हणता येईल. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.