जाणून घ्या स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांची ह त्या कोणी केली…कोण होता तो आपल्यातीलचं गद्दार…जाणून घ्या अज्ञात असा इतिहास

लाईफ स्टाईल

छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द ही रोमहर्षक घडामोडींनी भरलेली होती. त्यांच्या प्रत्येक ल ढाईमध्ये त्यांना यश मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची उत्कृष्ट रणनीती, झाडा-झुडपांनी आणि डोंगर-दऱ्यांचा गर्द प्रदेश आणि साथीला असणारे उत्तम आणि प्रा णाची पर्वा न करता लढणारे उत्तम मावळे. त्यांच्या मावळ्याच्या शौर्याच्या कथा सांगाव्यात तेवढ्या कमीच.

उत्तम साथीदारांच्या मुळेच शिवरायांचे स्वराज्य उभारणीचे स्वप्न सत्यात उतरले. उत्तम साथीदारांची ही परंपरा पुढे देखील अशीच चालू राहिली. छत्रपती संभाजी राजेंच्या मृ त्यूनंतर राजाराम महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. आणि असेच ते एकदा जिंजीच्या किल्ल्यावर असताना जुलमी झुल्फिराखान याने किल्ल्याला वेढा घातला. तेव्हा महाराज वेढ्यात अडकले होते. त्यावेळी महाराजांना सोडवण्याची जबाबदारी मराठा सरदार संताजी घोरपडे यांनी घेतली.

त्याने राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी लावली. यावेळी संताजींचं मत मोंगलांना जाऊ देऊ नये, का पून काढावं असं होतं पण राजाराम महाराजांनी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून मोंगलांना वेढा उठवून जायला सांगितलं. या राजाराम महाराजांच्या निर्णयामुळे संताजी त्यांच्यावर नाराज होते. संताजी आणि धनाजी यांमध्येही भां डण सुरू झाली होती.

संताजी हे शिस्तीचे क डक होते तर धनाजी हे वेळप्रसंगी पाहून माणसं आपल्या बाजूला घेण्याच्या दृष्टीचे होते. अनेक कनिष्ठ सरदार हे संताजींच्या शि स्तीला कंटाळून धनाजींची बाजू घेत यामुळे या भां डणात आणखी ठि णग्या पडल्या. यामध्येच संताजींनी अमृतराव निंबाळकर या धनाजींच्या बाजूने असलेल्या सरदाराला हत्तीच्या पायी दिले होते.

हा अमृतराव निंबाळकर राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलत भाऊ होता आणि याची सखी बहीण नागोजी माने ची बायको होती. आणि १६९५ मध्ये मोगली फौ जांनी संताजी आणि धनाजी यांच्या फौ जांचा स्वतंत्ररित्या पराभव केला होता. यानंतर संताजी आणि धनाजीची या दोघांनीही राजाराम महाराजांच्या समोर एकमेकांविषयीचे चु कांचे पाढे वाचले.

राजाराम महाराजांनी संताजींना सेनापती पदावरून दूर केले होते. यानंतर संताजींनी उघडपणे बंड पुकारले असले तरी त्यांना राजाराम महाराजांशी थेट ल ढण्याची ताकद नसावी असं दिसतं. जे सरदार पूर्वी मोगलांकडून स्वराज्यात आले होते ते संताजींना सेनापती पदावरून काढल्यामुळे पुन्हा मोगलाईत गेले. या सरदारांमध्ये नागोजी माने होते.

हे तेच नागोजी ज्यांची बायको म्हणजे संताजींनी ज्याला ह त्तीच्या पायी दिलं त्या अमृतराव निंबाळकरांची सख्खी बहीण होय. मार्च १६९७ च्या सुमारास धनाजी जाधवांची मोठी फौज संताजींच्या मागे धावू लागली, अखेर संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. आणि याचदरम्यान म्हसवड च्या आसपास संताजींचा मुक्काम असताना नागोजी माने याने संताजींना द ग्याने मा रले.

नागोजीने संताजींचं म स्तक का पून ते ब्रह्मपुरीला नेऊन बादशहाला नजर केलं, यावरून संताजी आणि धनाजी यांच्यातला भांडणाचा फा यदा औरंगजेबाने अप्रत्यक्ष वा प्रत्यक्ष घेतला असं नक्कीच म्हणता येईल. पूर्वी आपण बादशहाला सोडून गेलो आणि आता पुन्हा रुजू झालो याची खात्री पटवण्यासाठी नागोजीने या गोष्टीचा दुहेरी फा यदा घेतल्याचं दिसतं.

कारण बादशहाचा सरदार लुत्फुल्लाखानाचं नागोजीला जुलै १६९७ मध्ये एक पत्रं लिहिलं त्यात तो म्हणतो, “संताजीला तुम्ही पळून जाऊ दिलं नाही. येणेंकरून स रकारची नोकरी तुम्ही एकनिष्ठतेने बजावत आहेत हे समजून तुमचे अ पराध (पूर्वी सोडून गेल्याचे) क्षमा होऊन बादशहाची मेहेरनजर होईल”. याच सर्व कारणांमुळे संताजी घोरपडेंसारख्या मातब्बर मराठा सरदाराचा दुर्दैवी मृ त्यू म्हणजेच खू न झाला.

संताजींचे वास्तव्य हे नेहमीच शंभू महादेवाच्या देवळात असे. तेथूनच ते चारही दिशात विजेसारखे चमकत राहायचे. संताजी हे १६८९ ते १६९७ या काळात स्वराज्याचे सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृ त्यूनंतर संताजी आणि धनाजी यांनी सतरा वर्षे औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. पण आपल्यातील लोकांनीच घा त केल्यामुळे… अश्या या महान सेनानीस आमचे कोटी कोटी प्रणाम!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *