महाड बंदराची वतन आणि देशमुखी, खेद बंदराची मुकादमी मिळाल्यामुळे शंकराजी यांना महाडिक हे आडनाव मिळाले. शहाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली. तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी सं बंध आला. परसोजी यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे महाडिक यांना अनामिका उर्फ अंबिकाबाई यांना देऊन छत्रपती शिवाजीराजांनी महाडिक घराण्याशी सोयरिक जुळवली.
ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर, जाधवराव, राजेशिर्के, मोहिते यांच्याशी भोसल्यांची सोयरिक झाली त्याच प्रमाणे महाडिक यांच्याशी. तसे महाडिक घराणे फार प्राचीन असून ते उत्तर हिं दुस्थानातून आलेले क्षत्रिय होत. हरारजी राजे महाडिक हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते. जी मोहीम द्यावी ती मोहीम ते यशस्वी करून दाखवतील अशी त्यांची खासियत होती.
हरजी यांच्या कर्नाटकातील मोहिमेवर खुश होऊन शिवाजी राजांनी त्यांना आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने हातात दिला.शिवाजी महाराजानंतर शंभू राजांच्या कारकीर्दीतही त्यांनी इमानाने कामगिरी बजावली. त्यांचे पुत्र शंकराजी महाडिक यांच्याशी शंभू पुत्रिका भवानी बाई यांचा वि वाह करण्यात आला.
शंकरजी महाडिक औरंगजेबाच्या नोकरीत कर्नाटकात असताना त्यांनी येसूबाई आणि शाहू महाराजांच्या सुटकेसाठी खूप पर्यंत केले. संभाजी राजांच्या मृ त्युनंतर औरंगजेबाने जेंव्हा स्वराज्य ताब्यात घेण्याचा मनसुबा करून स्वराज्यावर हल्ला केला, साऱ्या दक्षिण प्रांतात मोगलांचा धु माकूळ चालला असताना हरजी महाडिक आणि शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात अबाधित ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली.
त्यांच्या कामगिरीवर खुश होऊनच शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या जेष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली. तसेच ७२ वाड्यांची आणि पाच वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली. शाहू महाराजांना आपल्या जेष्ठ भगिनी खूप प्रिय होत्या. भवानी बाई आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत हुशार व धा डसी होत्या.
सनदेप्रमाणे भवानीबाई आणि शंकराजी तारळ्याला आले. मोगलांच्या धामधुमीत तारळे गावची वाताहत झालेली होती. अशावेळी हनगोजी का टे-देशमुख, सिदोजी, विठोजी व इतर बलुतेदार मंडळीनी रयतेला सं रक्षण देण्याबरोबरच महालाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी भवानी बाईना साकडे घातले. त्यानुसार भवानी बाई आणि शंकराजी यांनी महालावर आपला अंमल प्रस्थापित करून गावची वि स्कटलेली घडी भवाननी बाई यांनी व्यवस्थितपणे बसवली.
तेथील कारभार सुरळीतपणे सुरु करून घेतला व पुढे तसाच चालू ठेवला. पुढे काही दिवसांनी शंकराजी महाडीकांचे नि धन झाले. त्यावेळी भवानी बाई स ती गेल्या. तारळे येथे महाडिक यांच्या खासगी स्म शानभूमीत त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. आजही ही समाधी बघण्यासाठी इतिहासप्रेमी लोक येथे आवर्जून येत असतात.
भवानी बाई यांना २ पुत्र दुर्गोजी आणि अंबाजी. तारळेगावात महाडिक घराण्याच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार आजही उपलब्ध आहेत. महाडिक राजेंच्या वंशजांचे आठही वाडे दिमाखात उभे आहेत. तारळे गाव साताऱ्यापासून पासून ३० किमी अंतरावर आहे.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.