वासुदेव पुत्र, द्वारकाधीश, महापुरुष, गोपिकांचा सखा, अगाध लीला घडवून आणणारा रासलीलाकार अशा अनेक उपाध्या भगवान श्रीकृष्णाला दिल्या गेल्या. भगवान श्री कृष्णाचं आयुष्य जितकं विलोभनीय तितकाच त्यांचा अंतकाळ हा पीडादायक होता, असं त्यांच्याबद्दल आख्यायिकेत सांगितलं गेलं आहे. महाभारतातील यु द्धामध्ये मोठ्या प्रमाणात जी वितहानी झाली होती. या यु द्धामध्ये भगवान श्रीकृष्ण हे पांडवाच्या बाजुने होते.
त्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ चालवत होते. या यु द्धा दरम्यान भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केवळ यु द्धा संदर्भात मार्गदर्शन न करता मोहमायेच्या जगा पलीकडे चि रकाल सत्याची अनुभूती दिलेली होती. मोहमायेच्या पलीकडे जाऊन अंतिम सत्याकडे मार्गक्रमण करण्याची दिशा देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना आजही जगभरात अनेक भक्त आणि अनुयायी मा नसिक शांती देणारे प्रतीक मानतात.
जी वनातील सार आपल्या संपूर्ण आयुष्य आणि मृ त्यूनंतर देखील जगाला उलगडून दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा मृ त्यू मात्र त्यांच्याच मोहमायेच्या चक्रात अडकून झाल्याचे पुरावे तत्कालीन आख्यायिकेमधून समोर आले आहेत. महाभारतातील यु द्धामध्ये केवळ कौरवच नव्हे तर अन्यही अनेक महाधनुर्धारी व शूरवीरांचा मृ त्यू झाला यामध्ये भीष्मपितामह, द्रोणाचार्य इ.चा समावेश होता.
गांधारीने आपले शंभर पुत्र या यु द्धात ग मावले. शंभर कौरव पुत्रांच्या मृ त्यूने व्यथित होऊन गांधारीने दुःखामध्ये श्रीकृष्णाला या यु द्धाचा अ पराधी घोषित करून त्याला शाप दिला की बरोबर 36 वर्षानंतर श्रीकृष्णाचा मृ त्यू होईल आणि त्याच्या मृ त्युला कारणीभूत त्याचा पुत्र असेल. श्रीकृष्णाने हा शा प स्वीकारला होता असं या आख्यायिकेमध्ये नमूद केलेले आहे. या आख्यायिकेच्या समर्थनार्थ लिहिलेली अजून एक आख्यायिका मौसल पर्वामध्ये आपल्याला आढळते.
आख्यायिका मध्ये असे वर्णन केले आहे की श्रीकृष्णाचा पुत्र सांब हा एकदा श्रीकृष्णाच्या सभेमध्ये नारद, दुर्वास व अन्य काही ऋषिमुनींनसोबत बसले असताना तेथे ग र्भवती स्त्रीचे सोंग घेऊन आला व चेष्टा करण्याच्या हेतूने त्याने आपल्या ग र्भातील मुल हे मुलगा आहे की मुलगी हे ओळखण्यास तेथील ऋषीमुनींना सांगितले. सांबने केलेली ही मस्करी एका ऋषींच्या लक्षात आली व त्यांनी क्रोधित होऊन त्याला शाप दिला की तुझ्या ग र्भात लोखंडाचा तीर तयार होईल व या तीरा मुळेच यादव वंशाचा विना श होईल.
सांबने ही सर्व घटना उग्रसेनला सांगितली. उग्रसेनने यावर उपाय म्हणून सांबला तांब्याच्या तीराचे चूर्ण करून ते प्रभास नदीमध्ये सोडून देण्यास सांगितले. यामुळे ऋषींनी दिलेल्या शापाचे निराकरण तर होईलच आणि यादव वंशाचा ही विना श होण्यापासून सं रक्षण होईल असं सांगितलं. यासाठी वंशामध्ये नशील्या पदार्थांचे उत्पादन केले जाऊ नये असे ही उग्रसेनाने त्यावेळी सांगितले. मात्र हा उपाय केल्यानंतर यादव कुळाला जणू उतरती कळा लागली.
श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र शंख व रथसुद्धा नाहीसं झालं. या सर्वांवर उपाय म्हणून श्रीकृष्णाने यादव कुळातील सर्व स्त्री-पुरुषांना प्रभास नदीवर तीर्थयात्रा करून येण्यास सांगितले. मात्र त्याठिकाणी तीर्थयात्रा करण्यास गेल्यानंतर सर्व स्त्री-पुरुषांना नशील्या पदार्थांनी वि ळखा घातला. या अंतिम काळामध्ये श्रीकृष्ण आपल्या कुळातील माणसांमुळे, दूराचारामुळे अत्यंत वे दनादायी स्थितीतून पुढे जात होते. श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली अतिशय सुरक्षित असलेल्या यादव कुळाचा विना श हा आपापसांत ल ढूनच झाला.
बलरामाच्या देहत्यागानंतर श्रीकृष्णाने योग ध्यान समाधी घेतली. सांबने प्रभास नदीमध्ये प्रवाहित केलेल्या तीराचे चूर्ण एका माशाच्या शरीरात गेले. तो मासा जर नावाच्या एका पारध्याच्या गळाला लागला. माशाच्या पोटातील धातूपासून त्याने लगोलग एक वि षारी तीर बनवला. श्रीकृष्ण ज्या ठिकाणी देह त्यागाच्या उद्देशाने समाधी लावून बसले होते तिथे श्रीकृष्णाच्या पायांना नजरचुकीने हरिण समजून जरा ने तीराने त्याचा वे ध घेतला.
मात्र आपली चूक लक्षात येताच तो श्रीकृष्णाच्या पायाशी नतमस्तक झाला व माफी मागू लागला. त्यावेळी श्रीकृष्णांनी त्यांच्या मृ त्यूला जर हा केवळ निमित्त मात्र होता असे सांगून मागील जन्मात श्रीकृष्ण हे राम भगवान श्रीराम होते व रावणावर चाल करून जाण्या अगोदर त्यांनी सुग्रीवाचा बलवान भाऊ वाली याचा व ध केला होता हे त्याला सांगितले. त्या रामायणातील वालीला एक वरदान लाभले होते.
तो ज्या कोणासोबत यु द्ध करेल त्या श त्रूची अर्धी ताकद वालीला मिळत असे. वाली सोबत समोरासमोर यु द्ध करून विजय प्राप्त करणे शक्य नव्हते म्हणून श्रीरामांनी त्याला पाठीमागून तीराने मा रले होते. तोच राजा वाली या जन्मामध्ये जर होता. म्हणजेच एका अर्थाने कर्म सिद्धांताचे चक्रच भगवान श्रीकृष्णांच्या मृ त्यूने पूर्ण झाले.