जाणून घ्या वृषभ राशींच्या लोकांचा स्वभाव, गुण, भविष्य, संतती, सर्वकाही…या राशींचे लोक वैवाहिक आयुष्यात आणि समाजात..

राशी भविष्य

राशी वरून माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्याची माहिती होत असते. म्हणूनच भारतीय ज्योतिष ज न्म राशी आणि कुंडली याला खूप महत्त्व देते. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे जरी खरे असले तरी राशीवरून ठराविक स्वभाव आणि वैशिष्ट्याचा अंदाज लावता येत असतो. राशीचक्रात एकूण बारा राशी आहेत त्यापैकी दुसरी रास म्हणजे वृषभ रास. आज आपण वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हे बघणार आहोत.

ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ई, ऊ, ओ, वा, वी, वू, वे, वो यापैकी एक असते त्यांची ज न्मरास ही वृषभ असते. राशी चिन्ह बैल असून हे लोक बैलाप्रमाणे मेहनती आणि कष्टाळू असतात. राशी स्वामी शुक्र असल्यामुळे हे लोक रसिक असतात. हे लोक कष्टाळू, सोशिक आणि सतत मेहनत करणारे असतात. वृषभ राशी ही स्त्री राशी आहे.

तसेच पृथ्वी तत्वाची राशी असून स्थिर स्वभावाची राशी आहे. वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्राचे तीन चरण, रोहिणी नक्षत्राचे चार आणि मृग नक्षत्राचे पहिले दोन चरण येतात. वृषभ राशी चंद्राची उच्च राशी असून हे लोक तेजस्वी आणि बुद्धिमान असतात. यांचा स्वभाव प्रेमळ असतो प्रत्येकाला आपलेसे करणे यांना आवडते. हे लोक शांत स्वभावाचे असतात.

परतू राग आल्यास उ ग्र रूप धारण करू शकतात. उच्च शिक्षण घेण्याची आवड असते. त्यामुळे काही वेळा यांचा संभाव अ हंकारी बनू शकतो. तसेच कलाक्षेत्रात यांना विशेष रुची असते. कलात्मक विचार, उच्च राहणीमा नाची आवड यांना उपजत असते. नटणे, मुरडणे, सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणे हे या लोकांना आवडते.

भौतिक सुखांच्या बाबतीत हे लोक अत्यंत नशीबवान असतात. स्थावर इस्टेट, जमीन, जंगम मालमत्ता या सगळ्या गोष्टींचा उपभोग यांना घेता येतो. करिअरचा विचार केला असता वृषभ राशीचे लोक आपल्या कलागुणांना वाव मिळेल असे करिअर करणे उत्तम असेल. जिथे सौंदर्य असेल, तुमच्या कलेला वाव मिळेल, लोकांना आनंद देता येईल अश्या सर्व ठिकाणी हे लोक उत्तम यश मिळवतात.

त्यातूनही जमीन, शेती, बँ किंग, प्रदर्शन, कला, हॉटेल, संगीत, गायन , नृत्य, अभिनय, शृंगार, सजावट, शिल्पकारी, डिझाईनीग, जाहिरात इ. क्षेत्र यांच्यासाठी लाभदायक ठरतात. वै वाहिक जी वनाचा विचार करता, हे लोक सुखी वै वाहिक जी वन जगतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या जोडीदाराच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची यांची तयारी असते.

यांना अनेकांचे प्रेम मिळते पण, आपला जिद्दी स्वभाव आणि राग यामुळे सगळ्यापासून दूर व्हावे लागते. सुखाचा अनुभव यांच्यासाठी खूप महत्वाची असतात. यांचा स्वभाव प्रचंड उत्साही असतो. आपल्या जोडीदाराप्रती पूर्ण समर्पित असतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला भेटी देणे यांना आवडते. अत्यंत विश्वासाहर्ता हे त्यांचे वैशिष्ठ्य मानावे लागेल.

तसेच यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते. पण आपल्यासाठी काय चांगले आणि काय वा ईट याचा अंदाज करणे यांना समजत नाही. समोरच्याच्या नजरेत आपण चांगले कसे बनू याचा प्रयत्न हे लोक नेहमी करत असतात.
आपल्या जिद्दी स्वभावामुळे कोणत्यही गोष्टीसाठी कितीही वाट बघण्याची यांची तयारी असते.

नैसर्गिक सुंदरता यांना अधिक आकर्षित करते. आरामदायी आणि इमानदार स्वभावामुळे यांचे व्यक्तिमत्व अधिकच आकर्षक असते. क ठोर स्वभावाच्या असल्या तरी मानाने अत्यंत हळव्या असतात. आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त यांना आवडते. रा ग हा यांचा खूप मोठा शत्रू आसतो. रा ग आल्यावर की बोलतील याच्यावर यांचे नियंत्रण नसते.

दुसऱ्यांवर अधिकार गाजवणे यांना आवडते. त्यामुळे कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतंत्र काम करणे यांना जास्त आवडते. गर्दीतही आपले स्वतंत्र अस्तित्व लोकांना जाणवून देणे यांना आवडते. इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करणे, आपले राहणीमान लोकांच्या नजरेत कसे येईल याची ते नेहमी काळजी घेतात. तसेच प्रत्येक गोष्ट मनापासून करतात.

वृषभ राशीसाठी वृश्चिक राशी ही परफेक्ट पार्टनर मानली जाते. त्यांचे नाते अत्यंत मजबूत आणि अप्रतिम ठरते. पृथ्वी तत्वाची राशी असल्याने यांच्यासाठी हिरवा रंग शुभ मानला जातो. लाल रंगापासून लांब राहणे यांच्यातही चांगले असते. ५, ३५, ५०, ५७, ८२ हे यांचे शुभ अंक आहेत तर शनिवार, बुधवार, शुक्रवार हे शुभ वार आहेत. हिरा किंवा पोवळे यांच्यासाठी शुभ रत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *