छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाची घटना म्हणजे पुरंदरचा तह आणि आपल्या राजेंचे वाढते सामर्थ्य पाहून गाळण उडालेल्या औरंगजेबाने आपल्या एकनिष्ठ राजपूत सरदाराला राजांच्या घोदौडीला लगाम घालण्यासाठी पाठवले, तो सरदार म्हणजेच मिर्झा राजे जयसिंग. तसेच आपणास सांगू इच्छितो कि मिर्झा राजा जयसिंह हा अत्यंत मातब्बर आणि अनुभवी सेनानी होता आणि या त्याच्या अनुभवाचा औरंगजेबाने पुरेपूर फा यदा उठविला.
मोगल साम्राज्यात सर्वाधिक काळ सेनापती पद भूषवणारे हे जयसिंग आमेर संस्थानचे राजे म्हणून बादशहाकडे चाकरी करत होते. त्यांनी ३ मोगल सम्राटांचा कारभार जवळून पहिला ते म्हणजे जहांगीर, शहाजहा आणि औरंगजेब. शहाजहा याच्याकडून त्यांना १६३७ मध्ये मिर्झाराजे ह्या उपाधीने सन्मानित केले. जयसिंग हे केवळ अकरा वर्षाचे असताना त्यांना आमेर च्या रा ज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घ्यावी लागली.
सुरवातीच्या काळात त्यांनी जहांगीर आणि शहाजहा यांची नोकरी केली. जहागीर याने त्यांना अहमदनगरचा शा सक अंबर याच्यावर चाल करण्यास पाठवले ज्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट रणनीतीचे प्रदर्शन केले. आणि १६३६ मध्ये शहाजान याने राजा जयसिंग यांना विजापूर आणि गोवळकोंडा का बीज करण्यास पाठवले. ज्यामध्ये राजे जयसिंग यशस्वी झालेत्यांच्या कामगिरीवर खुश होऊन जहागीरने त्यांना चाकसु आणि अजमेर हे परगणे भेट म्हणून दिले सोबतच मिर्झाराजे हि उपाधी दिली.
१६५७-५८ मध्ये मोगल सा म्राज्यात उत्तराधिकारी कोण होणार यावरून मतभे द सुरु झाले. तेव्हा शाहजहा याने आपला मुलगा शुजा याच्या विरुद्ध ल ढण्यासाठी मिर्झाराजेना पाठवले. कारण शहाजहाला असे वाटत होते कि, आपला जेष्ठ मुलगा शिकोह मोघल साम्राज्याचा उत्तराधिकारी बनावा. मिर्झाराजेनी बहादुरपूर मध्ये शुजा याचा प राभव केला. त्यांच्या कामगिरीवर खुश होऊन शहजाहाने त्यांची मनसबदारी वाढवली.
शहजहा नंतर उत्तराधिकारी पदासाठी औरंगजेब आणि शिकोह यांच्यातील वा दाने यु द्धाचे स्वरूप घेतले, या यु द्धात जो जिंकेल त्याला उत्तराधिकारी केला जाईल असे ठरवले गेले. शहाजहाच्या सांगण्यावरून मिर्झाराजे यांनी औरंगजेब विरुद्ध शिकाहोच्या बाजूने यु द्ध केले. मात्र या यु द्धात औरंगजेब विजयी झाला. ज्यामुळे त्याला मोगल सा म्राज्याचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले.
औरंजेबाचे सामर्थ्य लक्षात घेऊन मिर्झाराजेनी मथुरे मध्ये १६५८ साली औरंगजेबाची भेट घेतली आणि त्याच्या प्रती आपली संपूर्ण मदत आणि निष्ठा समर्पित केली आणि ते औरंगजेबाच्या सा म्राज्यात सामील झाले. औरंगजेब हा उत्तराधिकारी ठरल्यानंतरही मोगल सा म्राज्यात उत्तराधिकारी पदासाठी ल ढाई सुरूच राहिली.
१६५९ मध्ये उत्तराधिकारी बनण्यासाठी दुसरे आणि शेवटचे यु द्ध शिकहो आणि औरंगजेब यांच्यात झाले. त्यामध्ये आपल्या वचनानुसार मिर्झाराजे औरंगजेबाच्या बाजूने यु द्धामध्ये सामील झाले. आणि या यु द्धात सुद्धा औरंगजेबाचा विजय झाला. औरंगजेबाच्या स त्ताकाळात दक्षिणे मराठ्यांचे साम्राज्य अधिकाधिक श क्तिशाली होत चालले होते.
मुघल सत्तेला आव्हान देण्यासोबतच त्यांनी बऱ्याच मुघल ख जिन्याची लु ट केली होती. ज्यामुळे अस्वस्थ झालेल्या औरंगजेबाने मिराझाराजे यांना १६६५ मध्ये १ लाख ४० हजार मुघल सेनेसह स्वराज्यावर चाल करण्यासाठी पाठवले. मिर्झाराजेनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला आणि आपल्या यु द्धकौशल्याचा परिचय करून देण्यास सुरवात केली.
ज्यामध्ये त्यांनी यु द्ध नको असेल तर मुघल सेनेशी संधी करण्याचा प्रस्ताव शिवाजी राजांसमोर ठेवला. स्वराज्याचे होणारे नु कसान पाहून महाराजांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आणि सन १६६५ मध्ये शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे यांच्यात पुरंदरचा तह झाला नंतर महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यास जावे लागले.
या तहावर खुश होऊन औरंगजेबाने त्यांची मनसबदारी वाढवून त्यांना पुढे कर्नाटक मोहिमेसाठी पाठवले. त्यानंतर मात्र आपल्या विजयाची घौडदौड कायम राखणे मिर्झाराजेना जमले नाही. आपल्या कोणत्याच मोहिमेत त्यांना यश मिळाले नाही. मिर्झा राजाला सारखा पराभव स हन करावा लागला. ज्यामुळे नाराज झालेल्या औरंगजेबाने त्यांची रवानगी पुन्हा बुऱ्हानपूर येथे पाठवले. त्यांच्यातील सं बंध सुद्धा बि घडले होते.
तसेच इकडे मात्र शिवाजी महाराज औरंगजेबाला चकवून महाराष्ट्रात सहीसलामत परत आले आणि अशी बातमी मिर्झा राजास मिळाली आणि त्याचे नशीब फिरले, औरंगजेब मिर्झा राजावर नाराज झाला होता आणि आता ह्या म्हाताऱ्या सिंहाची आता औरंगजेबाला गरज नव्हती. तसेच आग्रा प्रकरणामुळे मिर्झा राजाचा मुलगा रामसिंहाची पंचहजारी औरंगजेबाने ज प्त केली, त्याला दरबारातही येण्यास म नाई करण्यात आली.
आणि त्याला आसामला पाठवून दिले, आणि त्यानंतर औरंगजेबाने मिर्झा राजांचा अत्यंत विश्वासू असा सल्लागार उदयराज मुन्शीची मदत घेतली तसेच त्यावेळी मिर्झा राजे दिल्लीस जाण्यास निघाले आणि बुरहनपूर जवळ २८ ऑगस्ट १६६७ च्या रात्री बऱ्हाणपुरास मुक्कामी असलेल्या मिर्झा राजा जयसिंहाची उदयराज मुन्शीने वि ष देऊन ह त्या केली.
नंतर लगेच उदयराज मुन्शीने मु स्लिम ध र्म स्वीआकारले त्यामुळे राजपूत त्याचे काही वाकडे करू शकले नाही. आणि बुऱ्हानपूर मध्येच मिर्झाराजेंची स माधी आहे. त्यांच्या नंतर त्यांचा मोठा मुलगा रामसिंग याला त्यांचा उत्तराधिकारी बनवले गेले.