जाणून घ्या महाराजांचे विश्वासू, गुप्तहेर बहिर्जी नाईक याचा मृत्यू कसा झाला?… त्यांनी त्यावेळी जे काही केले होते जाणून अंगावर शहारे येतील

लाईफ स्टाईल

महाभारत काळापासून आज पर्यंत रा ज्य व्यवस्थेबाबत आपल्याकडे अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. त्या सगळ्या सिद्धांतांमध्ये गु प्तचर यंत्रणेला अनन्य साधारण महत्व देण्यात आले आहे. कौटिल्य यांनी आपल्या ‘अर्थशास्त्र ‘ग्रंथांत राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा दिली आहे. ज्यामध्ये राजा हा या शरीराचा आ त्मा, प्रधान आणि मंत्री हे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू तर गु प्तचर यंत्रणा म्हणजे रा ज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हणले आहे.

हे डोळे आणि कान जितके सजग आणि तीक्ष्ण असतील तितकेच ते राज्य सु रक्षित असा कौटील्यांचा सिद्धांत आहे. युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची उभारणी करत असताना आपल्या रा ज्य रुपी शरीराच्या या डोळे आणि कानांकडे विशेष लक्ष दिले असणार हे तर निश्चितच आहे. म्हणूनच शिवरायांना जाणता राजा म्हणतात. त्यामुळेच शिवरायांच्या स्वराज्यात ‘हेर यंत्रणेला ‘अतिशय महत्त्वाचे स्थान होते.

हेर यंत्रणा जास्तीत जास्त प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्न राजांनी केलेले दिसतात. म्हणूनच इंग्रज आणि फ्रेंच यांनी सुद्धा राजांच्या हेर यंत्रणेचे कौतुक केले आहे. स्वराज्यात २ ते ३ हजार गु प्तहेर कार्यरत होते अन या सगळ्याचे नेतृत्व होते गु प्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या कडे. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणता ‘ ठेवण्याचे काम त्यांच्या हेर यंत्रणेने केले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शिवरायांची प्रत्येक मोहीम सर्वात आधी हेर यंत्रणेला माहित असायची.

त्यामुळेच मोहीम यशस्वी करण्यासाठी जी काही आवश्यक माहिती लागेल ती राजांपर्यंत चोखपणे आणून देण्यात आणि पुढे ती मोहीम यशस्वी करण्यात बहिर्जी नाईक यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण मानावे लागेल. महाराजांचे गु प्तहेर बहिर्जीनी पार विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे आणि इतरत्र सुद्धा आपले काम मोठ्या चलाखीने पसरवले होते. यंत्रणेचे काम अत्यंत चोख होण्याचे महत्वाचे कारण हे देखील होते कि, स्वराज्यात चुकीची माहिती देणाऱ्याचा कडेलोट केला जाई.

गु प्तहेर खात्याची एक स्वतंत्र भाषाच बहिर्जीनी तयार केली होती जी गु प्तहेर यंत्रणे शिवाय फक्त महाराजांना माहित असे. त्यामुळे कुठलाही संदेश त्या विशिष्ट भाषेत दिला जी आणि महाराजांच्या पुढील मोहिमेचे नियोजन ठरत असे.
स्वराज्य उभारणेच्या प्राथमिक तयारी पासून बहिर्जी महाराजांसोबत राहिले आहेत. बहुरूपी म्हणून नक्कल करणे आणि वेषांतर करणे यात पारंगत असणाऱ्या बहिर्जीना महाराजांनी त्याच्यातील याच कौशल्यामुळे आपल्या गु प्तहेर खात्याचा प्रमुख बनवला होता.

बहिर्जी फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असा कोणतेही सोंग हुबेहूब वठवत असत. अनेकदा विजापूरच्या आदिलशहा आणि निजामशहा यांच्या दरबारात जाऊन खुद्द बादशाहांच्या तोंडून खरी माहिती काढून घेणे त्यांना सहज जमले आहे. दुसऱ्या राजाचा हेर आपल्या राज्यात दिसला जरी तरी त्याचा कडेलोट करणारे हे दोन बादशहा असून देखील त्यांना एकदाही बहिर्जीचा संशय सुद्धा आला नाही हे एक नवलच म्हणावे लागेल.

शिवरायांनी अनेकदा अशक्य आणि अवघड मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत हे तर आपल्याला माहित आहे. पण याचे श्रेय जसे ल ढवय्या मावळ्यांना जाते त्याहून जास्त ते गु प्तहेरांचे आहे. स्वराज्या वरील प्रत्येक संकटात या गु प्तहेर यंत्रणेने महाराजांना अचूक आणि नेमकी माहिती दिल्याने महाराजांना मोहिमांचे व्यवस्थित नियोजन करणे शक्य झाले. अफजल खा न सारख्या पहाडावर महाराजांनी ज्या चतुराईने यश मिळवले त्याला इतिहासात तोड नाही.

त्यावेळी ही कामगिरी करण्यासाठी बहिर्जींचे योगदान दुर्लक्षित करून चालणार नाही. खानाच्या गोटाची इत्यंभूत माहिती काढण्यापासून भेटीच्या वेळी अफजल खानाने चिलखत घातला नाही आणि त्याच्यासोबत असणारा सय्यद बंडा धो कादायक असण्यापर्यंतची सर्व माहिती वेळोवेळी बहिर्जीनी महाराजांना दिली होती. शाहिस्तेखानाची बोटे तो डण्यात महाराजांचे कसब आपल्याला दिसून आलेच, ही कामगिरी करताना व्यूह रचना करणे महाराजांना शक्य झाले ते बहिर्जींमुळे.

रात्रीचे पहारे सुस्त असतात, खान कोठे झोपतो, महालातील कोणता रस्ता बंद आहे या सगळ्याची तपशीलवार माहिती शिवरायांकडे आधीपासूनच होती. सुरतेच्या लुटे मध्ये सुद्धा जरी राजांची ही परमुलखातली ही पहिली लुट होती तरी ती यशस्वी करणे बहिर्जींमुळे शक्य झाले. या लुटेची योजना ३/४ महिने आधीपासून सुरु होती. त्या दरम्यान बहिर्जी भिकाऱ्याचा वेश करून सुरतभर फिरत होते. यावेळी त्यांनी सुरतेची सुरक्षितता, संपन्नता याची अचूक माहिती महाराजांना पोचवली.

औरंगजेब दिल्लीमध्ये महाराजांबरोबर द गा करणार आहे हे महाराजांना आधी पासूनच माहिती होते, त्यामुळे अतिशय सावधपणे त्यांनी यासगळ्याची तयारी केली आणि पुढे आग्र्याहून सुटका झाल्यनंतर सुद्धा उलट दिशेने प्रवास करून स्वराज्यात परत सुखरूप आले, यासाठी बहिर्जींच्या बुद्धिमत्तेचे कौतुक नक्कीच करावे लागेल. स्वराज्यात अष्टप्रधान मंडळ असताना गु प्तहेर खाते स्वतंत्र नव्हते, तरी याचा सगळा कारभार व्यवस्थित चालेल याची पूर्ण काळजी महाराजांनी घेतली होती.

त्यांना कधीही रसद, दाणा-गोटा यांची कमी पडू दिली नाही. बहिर्जी परमुलखातच नाही तर स्वराज्यात सुद्धा वेषांतर करून राहत असत. बऱ्याचदा ते दरबारात हजर आहेत हे फक्त महाराजांनाच माहित असे. इतक्या खुबीने ते वेषांतर करत असत. तलवारबाजी, दांडपट्टा यामध्ये सुद्धा ते निष्णात होते. त्यांच्या मोहिमा कधी व कोठे आहे ते त्यांच्याशिवाय कोणालाच माहित व्हायचे नाही.

गु प्तचर हे नेहमी प्रसिद्धी वलयापासून मागे राहिलेले आहेत, कारण ते कधी हातात नं गी तलवार हेऊन श त्रूशी लढत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण ते या पराक्रमाचे सहभागी नसतात. त्यांची आधी ही नेहमी सं यम आणि बुद्धीची असते, इतर लोक शांत असताना त्यांना त्यांचे काम चोख करावे लागत असते. सोंग घेणे ते हुबेहूब वठवणे, परमुलखात, श त्रूच्या गोटातून गु प्त माहिती आणणे यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास करावा लागतो.

या सर्व गोष्टींचा विचार करता बहिर्जी हे एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणले पाहिजे. बहिर्जी यांच्या यंत्रणेची तुलना आताच्या कोणत्याच यंत्रणेशी करणे शक्य नाही. जेम्स बॉं ड किंवा शेरलॉ क होम्स हि काल्पनिक पात्रे तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करून खरी असल्याचा आभास निर्माण करतात. पण बहिर्जी मात्र कोणत्याही तंत्रज्ञाना शिवाय अनेक मोहिमा वास्तवात यशस्वी करण्यात माहीर ठरलेले आहे.

स्वराज्याचा तिसरा डोळा मानलेल्या या यो द्ध्याला इतिहासकार फारसे महत्व देऊ शकले नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट म्हणली पाहिजे. त्यांच्या मोहिमा, त्यांची हे रगिरीची पद्धत त्यांचे राहणीमान याबाबत कोणतीच ठोस माहिती इतिहास आपल्याला देऊ शकत नाही. त्यांच्या मृ त्यूबाबत देखील पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही. सांगली जिल्यातील भूपाळगडावर हेरगिरी करताना त्यांचा मृ त्यू झाला असे म्हणले जाते.

तर ल ढाईत ज खमी झालेल्या बहिर्जीनी भूपाळगडावर महादेवाचारणी आपले प्रा ण सोडले अश्या अखायिका तत्कालीन बखरीत सापडतात इथेच त्यांची समाधी आहे. बहिर्जींच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना फक्त एकदाच एका इंग्रज वखारवाल्याने ओळखले होते. गु प्तचर यंत्रणेच्या यशाचे सूत्र मांडताना अज्ञात राहणे महत्वाचे असल्याचे म्हणले आहे. बहिर्जी अज्ञात होते म्हणून याश्सी झाले कि यशस्वी होते म्हणून अज्ञात राहिले हे आजवर न उलगडलेले कोडे आहे. अशा या महान व्यक्तिमत्वास मानाचा त्रिवार मुजरा !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *