जाणून घ्या पन्हाळा जिंकल्यावर सुद्धा सिद्धी जोहरने आत्महत्या का केली होती…असं क्या घडलं होत ज्यामुळे त्याने हे पाऊल उचल

लाईफ स्टाईल

आपल्याला असा कोणी भेटणार नाही, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नसेल. भारत देशाने अनेक शतकांपासून आपल्या हृ दयात अनेक पराक्रमी महान पुरुषांना सामावून घेतले आहे. आणि त्यामधीलच एक महापुरुष म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज, महाराजांनी अशी यशोगाथाच निर्माण केली की तिला कोणीही विसरू शकणार नाही.

आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. त्यांनी स्वरा ज्य निर्माण केल्यामुळे आहोत. त्यावेळी महाराजांनी आदिलशाही आणि मोघल सा म्राज्य यांच्यासोबत केलेल्या यु द्धामुळे आणि सं घर्षामुळे हे मराठी स्वराज्य स्थापन झाले. आणि महाराजांच्या इतिहासाला आज कित्येक वर्षे जरी झाली असली तरी त्यांना आपण आजही आठवतो, त्यांची आठवण म्हणून शिवजयंती सुद्धा साजरी करतो.

तसेच आपल्याला तर माहिती आहेच की रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे उभे केले. स्वरा ज्याच्या वाईटावर अफजल खान सारख्या श त्रूंची नजर ही होतीच. त्यातच सिद्दी जोहरने पन्हाळ्याला घातलेला वेढा ही एक गोष्ट, असा हा इतिहास आपल्याला माहित आहे, पण आपल्यातील अनेक व्यक्तींना हे माहित नसेल कि पन्हाळा सोडल्यावर सिद्धी जोहरने आ त्मह त्या का केली ?

खरतर सिद्दी जोहर बद्दल आपण एवढेच ऐकले असेल की त्याने पन्हाळ्याला वेढा घातला होता. पण अफजल खा नच्या व धानंतर महाराज हे कोल्हापूर पर्यंतचा मुलुख आपल्या ता ब्यात करण्यात यशस्वी झाले. महाराज हे अतिशय चातुर्याने आणि बुद्धीने लढायचे. त्यातूनच त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला होता. याच बातमीमुळे आदिलशाही बि खरलेली होती.

आणि त्यावेळी महाराज हे विजापूर वर चालून जाणार अशी अफवा पासरण्यात आली होती. याच बाबतीमुळे आदिलशाही फार च वताळून उठला होता. त्याला भी ती होती की महाराज विजापूर त्याब्यात घेणार. यातून बाहेर पडण्यासाठी स्वरा ज्यावर चालून जाण्यासाठी कोणीतरी हवे होते. पण अशावेळी कोणीही तयार झाले नव्हते सगळे माना खाली खालून उभे होते.

त्यातूनच एक व्यक्ती समोर आली ती म्हणजे ‘सिद्दी जोहर’. सिद्दी जोहर हा आंध्र प्रदेशातील कुर्नुल प्रांताचा विजापुरी सुभेदार होता. तो अत्यंत चिवट, शब्दाला पक्का आणि यु द्ध करण्यात पटाईत असा होता. तो स्वतः च्या स्वकर्तृत्वावर मोठा झालेला होता. हा अतिशय पराक्रमी आणि महात्त्वकांक्षी होता. आदिलशहाने महाराजांचा बं दोबस्त करण्यासाठी त्याला सांगितले होते आणि त्याबदल्यात आदिलशहा सिद्दीला त्याला सुभेदारी मंजूर करून काही प्रांत त्याच्याकडे सोपवणार होता.

आदिलशहाने ‘सलाबत जं ग’ हा किताब त्याला देण्यात आला. सिद्दी हा स्वराज्यावर चालून येण्याची खबर ज्यावेळी महाराजांना कळली तेव्हा स्वरा ज्याच्या हद्दीवरच ह टवायचे असे ठरवण्यात आले. म्हणूनच महाराज हे पन्हाळ्यावर पोहचले. पण सिद्दीने पन्हाळ्याला चौबाजूंनी वेढा घातला होता. सिद्धी हा चार महिने वेढा घालून होता. आणि तेव्हा महाराज हे पावसाळ्याची वाट पाहत होते.

त्यांना असे वाटत होते की पावसाळ्यात तरी वेढा सैल करेल पण तो अतिशय कपटी आणि चालाख होता. त्याने भर पावसाळ्यामध्ये वेढा अगदी कडक केला होता. महाराजांच्या दृष्टीने तो महाभ यंकर चतुर निघाला होता. त्यांनी अनेक आमिषे दाखवली, लाच देण्याचा प्रयत्न केला तरीपण काही उपयोग झाला नाही. तब्बल सात ते आठ महिने तो वेढा देऊन होता.

त्यामुळे सिद्दी हा वैतागलेला होता. त्याला सगळीकडे त्याचे अपयश दिसत होते. त्याला पन्हाळा तरी हवाच होता. आणि आदिलशहाला खुश करायचे होते. आणि मग त्यावेळी महाराजांनी पन्हाळा देण्याचे मान्य केले. पन्हाळा मिळताच सिद्दीने आदिलशाही झेंडा फडकवला होता. ही बातमी आदिलशहाला कळवली. तेव्हा ते खुश व्हायचे सोडून सिद्दीवर संशय घेतला.

सुलतान अली आणि बडी बेगम साहिबा हे भयंकर संशयी निघाले होते. यावर आदिलशाहा म्हणाला की ‘तू अतिशय ग द्दार आहेस, तू शिवजीकडून पैसे खाऊन त्याला पळून जाण्यास मदत केली. एवढे म्हणून गप्प नाही राहिला तर तो शिवाजी सोबत हातमिळवणी करून माझ्याविरुद्ध बं ड करण्याची तयारी केलीस. तू मला शरण ये नाहीतर मीच तुझा बं दोबस्त करीन.

सिद्दीला असे काही होईल याची कल्पनाच नव्हती. तो प्रचंड सं तापला आणि फडकवलेला झेंडा फाडून दिला. तो स्वामी निष्ठ आणि स्वाभिमानी होता, त्याला हे सहन झाले नाही. आदिलशाह प्रचंड सै निक घेऊन सिद्दीवर चालून जात होता आणि सिद्दीला त्याच्या एवढ्या सै निकांना तोंड देण्याची ताकद नव्हती. त्याने तो निर्दोष असल्याची खात्री एका पत्रात लिहून ठेवली.

ज्यावेळी सुलतान अलीला त्याची चूक कळली. त्यावेळी काहीच उपयोग झाला नाही. कारण सिद्दीने आ त्मह त्त्या केली होती. सिद्दीच्या मृ त्यू नंतर फार मोठा फटका आदिलशहाला बसला होता. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *