जाणून घ्या दुसरे शिवराय म्हणजेच ‘वीर शिवा काशीद’ याचा मृत्यू कसा झाला…त्याचा मृत्यू झाला तेव्हाचा प्रसंग…जाणून घ्या त्यावेळी काय घडले होते

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित असेल कि स्वराज्याच्या सीमा वाढू लागताच धडकी भरलेल्या आदिलशाहीने शिवरायांचा बं दोबस्त करण्यासाठी अफजल खानाला स्वराज्यावर चाल करण्यास पाठवले, पण त्यानंतर खानाचे काय झाले आणि त्याचा शिवरायांनी कसा बं दोबस्त केला हे आपल्याला माहित आहेच. पण हा पराभव मात्र आदिल शाहीला अतिशय झोबला. म्हणून त्याने आपल्या खास सरदाराला स्वराज्य सं पवण्यासाठी पाठवले.

आदिलशाही सरदार सिद्दीच्या वे ढ्यात पन्हाळगडा सोबत संपूर्ण स्वराज्याची मने अडकून पडले होते. खुद्द महाराज यामध्ये अनेक महिने अ डकून पडले होते. स्वराज्याचा कारभार सुरळीत सुरु असला तरी प्रत्येकाला चिं ता होती आपल्या राजांची आपल्या शिवरायाची, आणि सिद्दी जौहर सोबत तेव्हा पंधरा हजाराचे सै न्य आणि अनेक नामांकित सरदार होते. अश्या मगरमिठीतून बाहेर पडण निव्वळ अशक्य होत.

तरी सुद्धा महाराज सुखरूप विशाळगडावर पोहचले. यामध्ये बाजी प्रभूनी केलेल्या पराक्रमाची गाथा तर सर्वश्रुत आहेच, पण सिद्दी घोडखिंडी पर्यंत पोहचू नये म्हणून महाराजांनी केलेली आणखीन एक व्यूहरचने मध्ये आणखीन एका मावळ्याचे योगदान सलामीस पात्र ठरणारे असे आहे. तो वीर म्हणजे वीर शिवा काशीद. हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा या मावळ्याचा जन्म पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर गावातील नाभिक कुटुंबात झाला होता.

मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर अशी त्यांची देहयष्टी. श त्रूच्या गोटातून अचूक माहिती काढण्यात शिवा काशीद पटीत होते. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा, गड चढणे, लढाई करणे हा त्यांचा दैनंदिन सराव होता. आणि आपल्याला माहित असेल कि पन्हाळ्याचा वेढा महिनोंमहिने चालू राहिला. पावसाळा सुरु झाल्यावर प्रचंड पावसात हा वेढा चालवणे सिद्धीस कठीण जाईल असा महाराजांचा अंदाज सिद्दीने खोटा ठरवला.

उलट सिद्दीने हा वेढा अधिक कडक केला. गडावरील दाणा-गोटा मात्र आता सं पत आला होता. गडावरून सु टणे अवघड असले तरी भाग होते. पन्हाळ्याच्या वे ढ्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे हे ओळखून महाराजांनी सावधपणे हालचाली सुरु केल्या. सर्वात आधी त्यांनी सिद्दीच्या सै न्याला गाफील बनवले, त्यासाठी खोटी तहाची बोलणी सुरु केली आणि पन्हाळगडावरून निसटण्याची तयारी केली. १२ जुलै १६६० आषाढ पौर्णिमा हा दिवस गडावरून बाहेर पडण्यासाठी निश्चित करण्यात आला.

रात्रीच्या किर्र अंधारात महाराज गडावरून उतरण्यास सज्ज झाले. ते पालखीत बसले, मावळ्यांनी पालखी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू, बाजीप्रभू यांच्यासोबत निवडक ६०० मावळे त्यांच्यासोबत गड उतरू लागले. या पालखी बरोबरच गडावरून आणखीन एक पालखी निघाली, या पालखीत होते शिवा काशीद आणि शिवा काशीद हे उभेहूब महाराजांचा पेहराव करून निघालेले. पावसाची संततधार सुरूच होती. विजांचा लखलखाट सुरु होता.

मुसळधार पावसात मावळे पालखी खांद्यावरून घेऊन चालू लागले होते. पालखी आडवाटेने खाली येत होती. तिला वाट दाखवण्यासाठी काही हेर पालखीच्या पुढे चालत होते. तसेच मुसळधार पावसाने मोर्चावरील सै निक गारठले होते. शिवाजी महाराज आपल्याला शरण येणार आहे, म्हणूनच ते गाफील होते. वेढ्यातील सै निक बेसावध राहिले. जमेल तसा आडोसा शोधत ते आराम करत राहिले. दुसरीकडे मावळे इतक्या थंडीतही घामाघुम झाले होते.

संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर होती, त्यांची एक चूक स्वराज्याचे दैवत पणाला लावणारी ठरली असती. म्हणूनच ते अतिशय सावधपणे मार्गक्रमण करत राहिले. झाडाझुडपातून खाच खाल्ग्यातून पालखी विशालगडाकडे कूच करत होती. पाउस पडत होता, ढग गडगडत होते. एकीकडे पालखी धावत होती, तर समोर वेढ्याचा पहारा होता. मावळ्यांच्या नजरा भिरभिरत होत्या, पहारा जवळ आला. पहाऱ्यातून पालखी बाहेर काढणे सर्वात मोठी जो खीम होती.

यातून महाराजांची पालखी बेमालूमपणे बाहेर पडली. धो का टळला म्हणून सर्वजण निश्चिंत झाले आणि पुढील वाट तुडवू लागले. घनघोर अंधारात पालखी दिसणे कठीण आहे असा सगळ्यांचा अंदाज होता. परंतु काही अंतरावर गेल्यावर सिद्दीच्या हेरांनी पालखी बघितली. गनीम….गनीम… असे ओरडत त्यांनी सिद्दीला सर्व माहिती दिली. सिद्दीला हे ऐकून ध क्काच बसला.

आपली एवढ्या महिन्याची मेहनत वाया जाणार या भी तीने त्याचे धाबे दणाणले त्याने ताबडतोब पालखीचा पाठलाग करण्याचा हुकुम दिला. दोन हजार घोडेस्वार आणि एक हजार पायदळ घेऊन सिद्दी मसूद पालखीच्या मागे निघाला. मावळ्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याचा ऊर धडधडू लागला. त्यांच्या अपेक्षेच्या आधीच पालखी सिद्दीने हे रली होती. ठरल्याप्रमाणे ती पालखी विशालगडाच्या दिशेने आडवाटेने धाऊ लागली.

पंधरा-वीस जन पालखी घेऊन जात असताना सिद्दी मसूदने पालखी हेरली. तो व त्याचे सै न्य खुश झाले. शिवा शिवा असे ओरडत ते त्या पालखीच्या मागे धावू लागले. काही क्षणात पालखी घेरली गेली. पंधरा वीस मावळे तीन हजार सै न्यापुढे उभे होते. मसूद पालखी पाहत कोण आहे याची चौकशी करू लागला. मावळ्यांनी उत्तर दिले शिवाजी महाराज. यावर पळून जाणारा शिवाजी मी पकडला म्हणून सिद्दी मसूद खुश झाला.

त्याने ही बातमी सिद्दी जौहर पर्यंत पोचवली. त्याला देखील विलक्षण आनंद झाला. पालखी त्याच्यासमोर आणली गेली, तेव्हा पालखीतील महाराजांना बाहेर काढण्यात आले. रात्रीच्या अंधारात कोणाला काही समजले नाही. परंतु तेथे असणार्ऱ्या काही लोकांनी महाराजांना प्रत्यक्ष पहिले होते, त्यांनी पालखीतील इसम हा शिवाजी महाराज नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा समजले कि हा शिवबा नसून त्यांच्या वेशातील न्हावी आहे.

सर्व हकीकत ऐकून सिद्दीच्या तळपायाची आ ग मस्तकाला गेली. त्याने रा गाने लालबुंद होत शिवा काशीद यांना विचारले, “तुला म रणाची भीती नाही का वाटली?” शिवा काशीदने सिद्दीच्या नजरेस नजर भिडवून उत्तर दिले, माझ्या धन्यासाठी मी एकदाच काय हजार वेळा सुद्धा म रण पत्करायला तयार आहे. हे ऐकून सिद्दीचा पार आणखीनच चढला. त्याने तत्काळ शिवा काशीद यांच्या शि रच्छेदाची आज्ञा त्याच्या सै न्याला दिली.

त्याच्या हातात आता निव्वळ पश्चाताप करण्याशिवाय आणखी काहीच उरले नव्हते. पुढे सिद्दीच्या सैन्याने मुसळधार पावसात शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरु केला. तेथे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्रा णपणाने स्वराज्याच्या धन्याचे रक्षण केले. शिवा काशीद यांच्या धा डसाचे आणि शौर्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांचे हे बलिदान आपण कोणीच कधीच विसरू शकणार नाही. आजही त्यांची आठवण म्हणून पन्हाळगडावर त्यांची स माधी आपल्याला पाहायला मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *