राशीचक्रातील सातवी रास म्हणजे तूळ रास प्रचंड संतुलित आणि उत्साही स्वभाव हि या राशीची वैशिष्ठ्ये आहेत. राशी चिन्ह तुला असल्याने तुमच्या चेतनेमध्ये देखील हे व्याप्त असते. त्यामुळे तुमच्या चारही बाजूला संतुलन असते, मग ते तुमचे घर असो व कामाचे ठिकाण. या राशीचे लोक समंजस असतात. सुखी असण्यापेक्षा समाधानी असण्याकडे यांचा कल असतो.
तसेच तुळ राशीचे लोक प्रचंड उर्जावाण असतात. त्यामुळे स्फूर्तीने काम करतात, मात्र हे करत असताना आपल्या शा रीरिक क्षमतेचा विचार न केल्यामुळे लवकर थकतात. तसेच यांना राग खूप लवकर येतो. ज्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर रा, री, रु, रो, ता, ती, तू किवा ते पासुन सुरु होते त्या व्यक्तीची रास तूळ असते. तूळ राशीचा राशीस्वामी शुक्र आहे.
त्यामुळे यांची कफ प्र कृती असते. वायु तत्व असलेल्या या राशी मध्ये चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वाती नक्षत्राचे चारही चरण आणि विशाखा नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणांचा समावेश होतो. तसेच या राशीचे पुरुष सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात, त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि डोळे सुंदर असतात. रा ग लवकर येत असला तरी ते शांत सुद्धा तितक्याच लवकर होतात.
कोणत्याही परीस्थित आपला तोल ढळू न देता नेहमी सकारात्मक राहणे हे त्यांचे वैशिष्ठ्य असते. इतरांना प्रोस्ताहित करणे यांना आवडते हे लोक कलावंत असतात. सौंदर्याची आवड असणारे आणि प्रेमळ असतात. व्यावहारिक असल्या तरी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळेच मित्र परिवारामध्ये लाडक्या असतात.
प्रवासाची आवड असली तरी ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणे त्यांना विशेष आवडते. जगभर प्रवास करण्याची त्यांची इच्छा असते. यांचा आवाज हा मधुर असतो, मोहक व्यक्तिमत्व असल्याने आकर्षक दिसतात. तसेच नेहमी प्रसन्न आणि दिलखुलास असतात. खळखळून हसणे यांना आवडते. तसेच राशी स्वामी शुक्र असल्याने भो ग, विलासता यांची खूप आवड असते.
त्यामुळे व्यवस्थित राहणे, खाणे, पिणे या सगळ्याचा भरपूर आनंद घेणे यांना आवडते. चांगल्या वाहनातून फिरणे, चांगले कपडे घालणे, चैनीच्या वस्तू वापरणे हे त्यांचे छंद असतात असे म्हणणे चु कीचे होणार नाही. वायुतत्वाची रास असल्याने स्वभावात वेगळेपण जाणवून येतो. त्यामुळे समोरच्याला यांच्या स्वभावाचा अंदाज येत नाही. कधी मनमोकळेपणाने बोलतात तर कधी पटकन रा गावतात.
म नाने उदार, न्या यप्रिय असणाऱ्या तूळ राशीला गीत, संगीत, नाटक, प्रवास यांची आवड असते. यांचा आवडता रंग निळा आणि पांढरा असतो. वै वाहिक जी वनात स्थिरता पसंत करतात. त्यामुळे वा दात वेळ वाया न घालवता सा माजिक कार्य आणि उत्सवामध्ये भाग घेणे उचित समजतात. यांची मुले शिक्षण किंवा नोकरीमुळे यांच्यापासून दूर जाऊ शकतात त्यांना योग्य शिक्षण व आ त्मविश्वास देणारे पालक असतात.
त्यामुळे यांची मुले स्वावलंबी आणि कष्टाळू होतात. शिक्षणाचा किंवा करिअरचा विचार करत तूळ राशीच्या लोकांना साहित्य, संगीत, नृत्य, टेलरिंग, चित्रकारी, क्राफ्ट, चीकीस्ता, वकिली या क्षेत्रात उत्तम यश मिळते. शिक्षण घेताना थोडे कष्ट सोसावे लागले तरी करिअर मात्र उत्तम असते. स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहणे यांना आवडते.
कोणाची मदत न घेता स्वकर्तुत्वाने सर्व गोष्टी मिळतात. त्यामुळेच मोठ्या पदावर देखील पोचतात. उत्तम अभिनेता, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, प्रसिद्ध व्यापारी, उद्योजक या क्षेत्रात त्यांना उत्तम करिअर करता येते. वै वाहिक जी वनाच्या बाबतील बोलायचे झाल्यास त्यांना वै वाहिक आयुष्यात स्थिरता आवडते. बऱ्याचवेळा करिअर सुरु होण्या आधी त्यांना त्यांचा जोडीदार मिळालेला असतो.
वि वाहात करिअरचा अडसर यांच्या बाबतीत राहत नाही. कौटुंबिक जी वनात मात्र विखुरता दिसून येते. आपल्या मुलांपासून दूर राहणे, नोकरी, शिक्षण यासाठी आई वडिलापासून दूर जाणे अश्या गोष्टी यांच्या बाबतीत घडू शकतात. आर्थिक परिस्थिती हि उत्तम असते. वि वाहानंतर त्यामध्ये सुधारणा दिसून येते. त्यामुळे स्थवार, जंगम मालमत्ता उत्तम होते.
आ रोग्याचा विचार करता कफ प्रकृती असल्याने क्षय, दमा, श्वसन वि कार, कफ यासारख्या रो गांकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते. तसेच नेत्र रो ग, मु त्र वि कार, स्नायू दु र्बलता, मधुमेह, वात किंवा ब द्धकोष्ठता होऊ शकते. म्हणून आपल्या सवयींवर विशेष लक्ष द्यावे लागते. ६, ४, ५, ८ हे शुभ अंक शुभ असतात. तर निळा, क्रीम हे शुभ रंग असतात. बुधवार, शुक्रवार यांच्यासाठी शुभ असतो.