जाणून घ्या छत्रपती राजाराम महाराज यांचा मृ त्यू कशा प्रकारे झाला…संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर कोणत्या अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले…

लाईफ स्टाईल

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांचे कनिष्ठ पुत्र स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणजे राजाराम महाराज. १६७० साली फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर एका बालकाने जन्म घेतला, आणि जन्मताना हे बालक पायाकडून ज न्माला आले म्हणून सर्वजण चिं तीत असताना शिवाजी राजेंनी मात्र हा साऱ्या पात शाहीला पालथे घालेल असे भविष्य वर्तवले.

प्रत्यक्षात जरी पातशाही पालथी घातली नाही तरी या पातशाहीच्या नाकी नऊ आणायचे आणि तिला निकराची झुं ज देण्याचे काम मात्र त्यांनी चोखपणे पार पडले. तसेच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी अखंड स्वराज्याची धुरा त्यांनी हाती घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य त्यांच्या मृ त्यू नंतर संभाजी महाराजांनी सांभाळले.

परंतु अचानक त्यांच्या घरपकडीमुळे व नंतर त्यांच्या ह त्येमुळे मराठे शाहीचा कणाच मोडून गेला. त्याचवेळी स्वराच्याचा कारभारी म्हणून राजाराम महाराज यांचे मंचकारोहण केले गेले. हा कालावधी त्यांच्यासह संपूर्ण राज्यासाठी अत्यंत धामधुमीचा आणि अस्मानी तसेच सुलतानी सं कटांचा होता. त्यावेळी आपल्या विश्वासू सरदारां सोबत त्यांनी स्वराज्य अजेय ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

राजाराम महाराजांच्या जी वनातील पहिली ल ढाई १० जून १६८९ रोजी प्रतापगडाच्या पाय्थाशी झाली. काकर खानासारख्या मुघल सैन्याला महाराजांनी आणि एकनिष्ठ नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयना काठी धूळ चारली. तसेच त्या दरम्यानच्या काळात त्यांचे वास्तव्य हे प्रतापगडावर होते. पातशाही खिळखिळी करणारा हा राजा सुरवातीपासूनच अत्यंत धीर गं भीर असा होता.

चांगल्या माणसांची आणि प्रवृत्तीची त्यांना जा ण होती. त्यांचे ल ष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहिते म्हणजेच स्वराज्याचे सरसेनापती आणि राजाराम महाराजांचे सखे मामा यांच्या कडे झाले. दरम्यानच्या काळात त्याचे चार विवाह झाले. १५ मार्च १६८० रोजी स्वराज्याचे पहिले सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या जानकी बाई यांच्याशी त्यांचा पहिला विवाह झाला.

त्यांच्या नि धनानंतर हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराबाई यांच्याशी ते विवाह बद्ध झाले, कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई आणि अंबिकाबाई या त्यांच्या आणखीन दोन पत्नी होत्या. पण संभाजी राजेंच्या मृ त्यू नंतर स्वराज्य खिळखिळे करण्यासाठी मुघल फौजा त्यावेळी चारही बाजूनी आ क्रमण करत होत्या. स्वराज्याचे बरेच गड किल्ले, अनेक ठाणी त्यांनी काबीज केली होती.

स्वराज्याची राजधानी रायगड श त्रूच्या वेढ्यात अ डकली होती. त्यावेळी महाराणी येसूबाई आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकारी राजाराम राजेना गडावरून बाहेर पडण्यास मदत केली आणि आपला जी व वाचवण्यासाठी प्रसंगी कर्नाटकात जावे असे सुचवले. त्यानुसार राजे जिंजी मध्ये वास्तव्यास गेले. जिंजी प्रात खुद्द शिवाजी राजेंनी स्वराज्यात आणला होता.

औरंगजेबाचा धो का लक्षात घेऊन स्वराज्य अबाधित ठेवता येईल म्हणून त्यांनी जिंजी स्वराज्यात आणला होता. राजाराम महाराजांनी याच जिंजीचा आश्रय घेउन तेथून स्वराज्याचा कारभार पहिला. या सर्व प्रवासात मोगल फौ जा त्यांचा पाठलाग करीतच राहिल्या. मात्र त्यांना निकराचा ल ढा देण्यास मराठा सरदार मानसिंग मोरे, प्रलाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निलो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम, संताजी, धनाजी असे मातब्बर लोक होते.

त्यावेळी जिंजी प्रांतात त्यांचे जंगी स्वागत झाले आणि त्यानंतर स्वराज्याची राजधानी पुढे जिंजी मध्ये हलवण्यात आली. या दरम्यान राजाराम राजेंनी आपल्या दोन राजमुद्रा तयार केल्या. राजाराम महाराज हे जेवढे शांत आणि गं भीर होते तेवढेच ते मुत्सद्दी आणि पराक्रमी देखील होते. स्वराज्य सं कटात असताना राजाराम महाराजांनी ते खऱ्या अर्थाने सावरले.

त्याकाळात औरंगजेबाने स्वराज्यावर अनेकदा आ क्रमण केले पण त्याला कधी मोठे यश मिळवता आले नाही कारण राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांना गनिमी काव्याने निकराची झुं ज दिली होती आणि स्वराज्यातून त्यांची पळता भुई थोडी झाली होती. जिंजीला मुघल सरदार झुल्फिकार खान याने वेध घातला तो आठ वर्षे सुरु राहिला.

त्यानंतर त्याला जिंजी मिळवता आली मात्र राजे त्या आधीच किल्ल्यातून बाहेर पडल्याने धो का टळला होता. त्यावेळी महाराष्ट्रात येऊन महाराजांनी मोठी धामधूम गाजवली होती. मात्र श त्रू प्रदेशातील स्वारी वर असताना त्यांच्या प्र कृतीने त्यांची साथ दिली नाही आणि सन १७०० मध्ये फाल्गुन वद्य नवमीला महाराजाची प्रा ण ज्योत मालवली…जय जिजाऊ जय शिवराय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *