जाणून घ्या आजच्या या महागाईच्या काळात १००० स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो…जाणून उपयुक्त अशी माहिती

लाईफ स्टाईल

प्रत्येकाचं उराशी जपलेलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं, स्वतःचं सुंदर आणि प्रशस्त घर!.. पण दिवसेंदिवस वाढणारी कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही प्रत्येकासाठी डोकेदु खी बनत चालली आहे. अधिक खर्च म्हणजे अधिक मोठं कर्ज. जितकं मोठं कर्ज तितकं मोठं टेंशन, घराचे हप्ते भरण्यातच सामान्य माणसाची उमेदीची वर्ष खर्च होवुन जातात. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला व्यक्ती मनमोकळेपणाने जीवनाचा उपभोग घेऊ शकत नाही आणि जगण्याचा निर्भेळ आनंदापासुन तो दुरावतो.

जर आपल्याकडे वेळ आणि धैर्य असेल, तर आपण स्वतः बांधलेल्या घरात राहण्यासारखे दुसरे सुख नाही. आपणास हवे तसे, दिसावे तसे घर आपण बांधून घेऊ शकता. आपल्याकडे एक अतिरिक्त-मोठा बेडरुम आणि असाधारण स्नानगृहे, स्वयंपाकघर व इच्छा आहे तेथे कोठेही ओपन प्लॅन किंवा अतिरिक्त स्टोरेज स्पेस असे सर्व आपल्या मनाप्रमाणे केले जाऊ शकतात!

हे सर्व मोहक दिसत असले तरी, बहुतेक लोक त्याऐवजी साधे तयार अपार्टमेंट मध्ये जाण्यासाठी खरेदी करतात. कारण घर बांधकाम खर्च जास्त आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया तणावपूर्ण आहे. परंतु घर बांधकामाच्या किंमतींमध्ये, घराच्या बांधकामाचा अंदाज कसा लावावा आणि हे जाणून घेणे महत्वाचे आहे व पुढे जाण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे.

जेव्हा आपण एखादा अंदाज विचारत असाल. तर मेट्रो शहरामध्ये फक्त १००० चौरस फूट छोटे घर बांधण्यासाठी आपल्याला कदाचित ४० ते ४३ लाख रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. बहुतेकांना हा धक्का नक्कीच असेल, परंतु आपण हे समजले पाहिजे की ही किंमत काय व कशा कशाला विचारात घेते चिन्हांकण आणि उत्खनन, काँक्रीट कंत्राटदार, विद्युत काम, नळ काम, फॉर्मवर्क आणि फ्रेमवर्क, बोअरवेल, कंपाऊंड भिंती आणि दरवाजे, प्रवेशद्वार.

आपल्याला कच्च्या मालासाठी देखील पैसे द्यावे लागतील. जसेकी वाळू, पाणी, स्टील आणि मजबुतीकरण, विटा, दगड, पेंट्स, स्वच्छताविषयक, पोशाख, फ्लोअरिंग, दारे, माती, सिमेंट या सर्व किंमती, बाजारात मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून बदलू शकतात. आपलाजवळजवळ ४० % खर्च हा मजुरीवरील खर्च असेल. बांधकामाची किंमत कमी करण्यासाठी ह्या काही टिप्स शक्य आहे तितके फर्निचर जसं की कपाटे, शेल्फ आणि सिटींग, सिव्हील वर्क मध्ये बनवल्यास प्लायवुडमध्ये फर्निचर बनवण्याचा अवाढ्यव्य खर्च वाचतो.

बांधकाम सुरु करण्याआधी – प्लॉट विकत घेताना, रोडपासुन फार खाली ख ड्ड्यात असलेला किंवा फार उंच असलेला प्लॉट निवडु नये. कटींग/फिलींग करुन जमीन लेव्हल करण्याने बिल्डींग कॉ स्ट वाढते. असा प्लॉट असलाच तर आतमध्ये स्टेप्स देवुन नैसर्गिक स्लोपचा वापर करुन घ्यावा. प्लान बनवतानाचं कागदावरचं प्रत्येक फर्निचरची पक्की मांडणी करुन घ्या. प्रत्यक्ष काम सुरु झाल्यास, कधी ऐनवेळी क्लायंटने केलेल्या बदलामुळे, किंवा कधी आर्किटेक्ट-इंजिनीअरच्या दुर्लक्षामुळे, मो डतो ड झालेल्या कामाची किंमत सरळ-सरळ दुप्पट होते.

शक्य आहे तितके फर्निचर जसं की कपाटे, शेल्फ आणि सिटींग, सिव्हील वर्क मध्ये बनवल्यास प्लायवुडमध्ये फर्निचर बनवण्याचा अवाढ्यव्य खर्च वाचतो. लेबर कॉस्ट कमी करण्यासाठी, काम सुरु होण्याआधी, वेळेचं आणि कामाचं, सु क्ष्म नियोजन, केलं पाहीजे. तसंच ते कॉ न्ट्रॅक्टरला समजावुन सांगुन, त्या वेळापत्रकाप्रमाणे काम करुन घेतल्यास नक्कीच, दोघांचेही पैसे वाचतात.

मटेरीअल:- प्रत्येक मटेरीअलची किंमत ट्रा न्सपोर्टेशनमुळे वाढते, म्हणुन स्थानिक पातळीवर असलेल्या मटेरिअलचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर असावा. उदा. यात दुरवरुन मार्बल, ग्रॅनाईट आणण्याऐवजी, सिंमेंट मध्ये चुन्याची भुकटी मिसळुन सुंदर फ्लो रींग बनवली जाते. प्रत्येक मटेरीअल निवडताना, हे घेणं, खरचं इतकं आवश्यक आहे का ? ह्या कसोटीवर तपासुन घ्या.

वीटकाम – वीटकाम केल्यास भिंतीवर दोन्ही बाजुंनी प्लास्टर न करण्याचा आग्रह असतो, कारण त्यात खुप बचत होते. यात पेंट करुन वीटांचं नैसर्गिक सौंदर्य खुलवलं जातं. भाजलेल्या मातीच्या लाल वीटा वापरण्याऐवजी सॉलीड कॉक्रीट ब्लॉ क वापरल्याने किंमतीत फरक पडत नाही पण ते इको-फ्रेंडली नक्कीच ठरतं. आऊटर वॉलचं नऊ इंची वीटकाम करण्याऐवजी सहा इंच वीटकाम केल्याने पैसे वाचतात, आतल्या भिंतीसाठी चार इंची वीट वापरावी. त्याने रुम साईज वाढतो आणि डे ड लो ड कमी झाल्याने सळईचीही बचत होते.

नऊ इंच वीटकाम करायचेच झाल्यास, परंपरागत पद्धतीने भिंत बांधण्याऐवजी रॅ ट ट्रॅप बॉंडची पद्धत वापरावी. ह्या पद्धतीने वीटकाम केल्यास पंचवीस टक्के बचत होते, या भिंतीत कॅ व्हीटी तयार होते व त्यात हवा खेळती राहते त्यामुळे साध्या बांधकामापेक्षा ही रुम उन्हाळ्यात अधिक थंड आणि हिवाळ्यात अधिक गरम राहते. दरवाजे खिडक्यांच्या वर जे आरसीसी लिंटेल टाकले जाते त्याऐवजी ब्रिक आर्चेस बनवाव्यात, स्वस्त पडतात आणि त्या दिसायलाही खुप सुंदर दिसतात.

दरवाजे आणि खिडक्या:- यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या आकाराच्या खिडक्या डिझाईन केल्या जातात. तसंच एकापेक्षा अधिक खिडक्या सोडुन क्रॉस व्हें टेलेशनद्वारे खेळती हवा ठेवण्यावर भर असतो. ज्यामुळे दिवसा ट्युब किंवा फॅन लावण्याची गरज भासु नये. लाकडी दरवाजे किंवा भिंतीऐवजी प्रिकास्ट सिमेंट किंवा स्टील सेक्शनच्या चौकटी वापरल्यास २५ % बचत होते.

दरवाजे खिडक्यांच्या वर जे आरसीसी लिं टेल टाकले जाते त्याऐवजी ब्रिक आर्चेस बनवाव्यात, स्वस्त पडतात आणि त्या दिसायलाही खुप सुंदर दिसतात. हा स्लॅब आकर्षक, लक्षवेधुन घेणारा असतो आणि यासोबतच प्ला स्टर, पिओपी, कलर आणि फॉल्स सिलींग करण्याचा खर्च वाचतो.

स्लॅब:- आपण सर्वजण सरसकट ५” जाडीचा कॉन्क्रीट स्लॅब भरतो. खरे तर स्लॅबचा खालचा अर्धा भाग जो टेंशन पोर्शन असतो, त्या भागात, वीटा, टाईल्स किंवा सेल्युलर कॉन्क्रीट ब्लॉक वापरु शकतो. यांचा वापर सुरक्षित आहे, आणि हा स्लॅब आकर्षक, लक्षवेधुन घेणारा असतो आणि यासोबतच प्लास्टर, पिओपी, कलर आणि फॉल्स सिलींग करण्याचा खर्च वाचतो.

ह्या आणि अशाच खुप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स वापरुन बांधकाम कॉस्ट २५% पर्यंत वाचवली जावु शकते. आर्कीटेक्ट इंजिनीअरची फीज ही बिल्डींग कॉस्टच्या तीन ते पाच टक्के असते, जितकी बांधकाम कॉस्ट जास्त तितकी फीज जास्त, ह्या समीकरणामुळे की काय, कॉस्ट कमी करण्याबाबत फारसा उत्साह दिसत नाही.

तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे १००० चौरस फूट घर बाधण्यासाठी येणारा खर्च, तर आजकाल सुमारे १२०० रुपये प्रति चौ. फूट ते रू. १५00 प्रति चौ. फूट पर्यंत आपल्याला संपूर्ण घराचे काम करून मिळू शकते. म्हणजेच आपण ठरवलेल्या दरामध्ये आपल्याला घराचा पायापासून ते छतापर्यंत संपूर्ण काम करून मिळते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *