नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला जी जमीन खरेदी करायची आहे त्या जमिनीचे मागील पन्नास वर्षापर्यंतचे सातबारे काढून घ्यावेत. त्यानंतर त्यावरील सर्व फेरफार नोंदी तपासून पहाव्यात. मग चालू सातबऱ्यातील इतर हक्कामध्ये अन्य कोणाची नावे आहेत का हे तपासून घ्यावे. इतर हकामध्ये जर जमीन मालकाव्यतिरिक्त इतर कोणाचे नाव असेल तर ते सातबाऱ्यावर का आले? कसे आले?
या जमिनीमध्ये त्या व्यक्तीचा काय हक्क आहे याची माहिती घ्या. त्याचबरोबर सातबर्यावरील भोगवटादार वर्ग अथवा धारणा प्रकार कोणता आहे तो नीट बघून घ्यावा. आपण जी जमीन विकत घेणार आहोत ती वडिलोपार्जित आहे किंवा खरेदी घेतलेली आहे ते बघावे. जर समजा ती जमीन वडिलोपार्जित असल्यास वारस पडताळणी करावी व जर खरेदी घेतलेली असेल.
तर रजिस्टर खरेदी केलेले सर्व पेपर दस्त एखाद्या चांगल्या वकिलाला अथवा तज्ञाला दाखवून व्यवस्थित तपासून घ्यावे. जमीन वडिलोपार्जित म्हंजेच एकत्र कुटुंबाची असेल तर त्यामधील वारस बहिणींना जाणून बुजून डावलण्यात आले आहे किंवा नाही त्याबाबत चौकशी करावी. बहिणीचे हक्कसोडपत्र घेतलेले आहे किंवा नाही व वाटणीपत्र योग्यरीत्या केलेले आहे किंवा नाही या गोष्टींची चौकशी करावी.
जमिनीचे सर्च रिपोर्ट दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयमधून घेतल्यास आपणास मागील 50 ते 60 वर्षांचे सर्व माहितीचे रेकॉर्ड बघायला मिळतील. जमीन वडिलोपार्जित अथवा वारस हक्काची असल्यास वारसाच्या नोंदी या कुटुंबातील वंशावळ पद्धतीने व्यवस्थित केलेल्या आहेत किंवा नाहीत कोणता वारस चुकलेला अथवा राहिलेला नाही ना याची खात्री करून योग्य पडताळणी करून घ्यावी.
महाराष्ट्र प्रदेश नगर रचना कायद्यातील तरतुदीनुसार प्रमुख शहरांसाठी विकास आराखडे तयार केलेले असून त्यानुसार आपले क्षेत्र कोणत्या झोनमध्ये आहे याची खात्री करून घ्यावी ( उदा. शेती झोन, औद्योगिक झोन, निवासी झोन व इतर झोन) 7/12 उताऱ्यामध्ये जेवढे क्षेत्र नोंद केलेले आहे.
तेवढे क्षेत्र त्या व्यक्तीच्या उताऱ्यावर आहे किंवा नाही हे तपासून तेवढ्या क्षेत्राची पहाणी करावी व शक्य असल्यास ती जमीन मोजणी करून नंतरच त्या संदर्भात व्यवहार करावा. जमीन जर रस्त्यालगत असल्यास सार्वजनिक बांधकाम या विभागाकडून माहिती घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागानुसार रस्ता कोणत्या प्रकारचा आहे.
यावर रस्ताच्या मध्यभागापासून क्षेत्र बाजूने सोडावे लागते म्हणजे आपण जमीन विकत घेतल्यानंतर रस्ता सोडून आपल्या ताब्यात एकूण क्षेत्रापैकी किती क्षेत्र येईल याची माहिती मिळू शकेल. जमीन खरेदी करण्यापूर्वी वर्तमाणपत्रामध्ये वकिलामार्फत जाहीर नोटीस दिल्यामुळे सदरच्या जमिनीवरील केलेला कोणताही व्यवहार/ स्टॅम्प/ नोकरी करार/ प्रतिज्ञापत्र, काही हित सं बंध, बोजे याबाबत खुलासा होतो.
त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी वर्तमानपत्रात जाहीर नोटीस द्यावी व नोटीसची मुदत संपल्यानंतरच जमिनीचा व्यवहार करावा. वकिलाने बनवलेला द स्त व्यवस्थित वाचून मगच त्यावर हस्ताक्षर करावे. जमिनीचा व्यवहार हा स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन शुल्क भरूनच रजिस्टर खरेदी खतामार्फत करावा.
जमीन खरेदी करण्यापूर्वी आपल्या माहितीकरिता तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, नगर रचना कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग हे सर्व शासकीय विभाग कार्यालय आपल्या मदतीसाठी कार्यरत आहेत. त्या कार्यालयामधून आपण जमिनिविषयी सर्व माहिती मिळवावी व मगच जमिनीचा रीतसर व्यवहार करावा, म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आमचे पेज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.