जगातील पहिला किनपुरुष कोण होता? पहिला किन्नर कसा जन्माला आला.?..जाणून घ्या यामागील रहस्य

धार्मिक

नमस्कार मित्रांनो, पृथ्वीवर स्त्री आणि पुरुष यांच्या शिवाय अजून एक वर्ग आहे आणि तो म्हणजे किन्नर. स्त्री- पुरुष ज्याप्रमाणे एका स माजात राहतात, त्याचप्रमाणे या जगात किन्नर लोकांचा ही एक वेगळा स माज आहे. किन्नर लोकांचे दोन प्रकार असतात, पहिला प्रकार म्हणजे किन्नर माणूस आणि दुसरी किन्नरी, त्याला किनपुरुष असेही म्हणतात.

मानवजाती मधील स्त्री-पुरुष आपल्याला माहीत आहेत व त्यांचा त्याचा जन्म कसा होतो हेही आपल्याला माहीत आहे. पण कि न्नर लोकांची उत्पत्ती कधी आणि कशी झाली हे फार कमी लोकांना माहीत आहे. आज आपण कि न्नर स माजाच्या इतिहासा बद्दल माहिती घेणार आहोत. कि न्नर लोकांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल माहिती घेऊया?

फार काळापूर्वी प्रजापतीला इल नावाचा मुलगा झाला. मोठा होऊन हा इल अत्यंत ध र्मनिष्ठ राजा झाला. असे म्हणतात की राजा इलला शि कार खेळण्यास खूप आवडत होते. एकदा शि कार करण्यासाठी राजा इल आपल्या सै निकांसह जंगलात गेला. जंगलात राजाने अनेक प्राण्यांची शि कार केली. पण एवढे करूनही त्यांचे मन समाधानी नव्हते.

त्याला आणखी शि कार करण्याची इच्छा होती म्हणून तो जंगलात पुढे पुढे जाऊ लागला आणि शेवटी जिथे भगवान शिव माता पार्वतींसोबत राहत होते त्या पर्वतावर पोहोचला. माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शिव यांनी स्त्रीचे रूप घेतले होते असे म्हटले जाते. ज्या वेळी भगवान शिव यांनी स्त्रीचे रूप धारण केले.

त्यावेळी जंगलातील सर्व प्राणी, झाडे, वनस्पती सुद्धा स्त्री बनले. तेव्हा राजा इल देखील याच जंगलात उपस्थित होता, त्यामुळे राजा इल देखील स्त्री बनला आणि त्याच्यासोबत आलेले सर्व सै निक देखील स्त्रिया बनले. स्वतःला स्त्री रूपात पाहून राजा इल खूप दुःखी झाला. असे कशामुळे घडले त्याला समजत नव्हते.

पण यामागचे कारण त्यांना कळाले की ते सर्व भगवान शिवामुळे स्त्री बनले आहेत. मग राजा इल अधिक काळजीत पडला आणि घाबरला. आणि या भीतीमुळे राजा इल भगवान शंकराच्या चरणी पोहोचला. व त्याने भगवान शिव यांना स्वतःला पुरुष बनवण्याची विनंती केली. पण भगवान शिव राजा इलला म्हणले की तुम्ही पुरुषत्व सोडून दुसरे कोणतेही वरदान मागाल तर ते मी देईन.

पण इलने दुसरे वरदान मागितले नाही आणि तो तेथून निघून गेला. तेथून निघून गेल्यावर राजा इल माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करू लागला. माता पार्वती प्रसन्न झाल्या व राजा इलला वरदान मागायला सांगितले. तेव्हा राजाने आपली सर्व गोष्ट सांगितली आणि माता पार्वतीला आपले पुरुषत्व परत करण्याचे वरदान मागितले.

पण माता पार्वती राजाला सांगू लागल्या की, महादेव हेच पुरुषत्वाचे अर्धे दाता आहेत. मी फक्त अर्ध देऊ शकते. म्हणजेच तुम्ही तुमचे अर्धे आयुष्य स्त्री म्हणून आणि अर्धे आयुष्य पुरुष म्हणून घालवू शकता. तेव्हा तुला कधी स्त्री म्हणून राहायचे आहे आणि कधी पुरुष म्हणून रहायचे आहे, याचा विचार कर आणि मला सांग.

तेव्हा राजाने खूप विचार करून माता पार्वतीला सांगितले की “हे माते, मला एक महिना स्त्री म्हणून आणि एक महिना पुरुष म्हणून जगायचे आहे.”यावर माता पार्वतीने राजा इलला सांगितले की, तू जेव्हा पुरुषाच्या रूपात असशील तेव्हा तुला तुझ्या स्त्री रुपाबद्दल काहीही आठवणार नाही आणि जेव्हा तू तुझ्या स्त्री रूपात असशील.

तेव्हा तुला तुझ्या पुरुष रुपाबद्दल काहीच आठवणार नाही. अशा रीतीने राजा इल याला माता पार्वतींकडून एक महिना न र आणि एक महिना स्त्री म्हणून जगण्याचे वरदान मिळाले. पण राजाचे सर्व सै निक मात्र स्त्री रूपातच राहिले. असे म्हणतात की एके दिवशी ते सर्व सै निक स्त्री इला सोबत जंगलात फिरत असताना चंद्रपुत्र महात्मा बुद्धांच्या आश्रमात पोहोचले.

तेव्हा चंद्रपुत्र महात्मा बुद्धांनी या महिला सै निकांना सांगितले की तुम्ही सर्व स्त्री पुरुषांनी या पर्वतावर आपले निवासस्थान बनवा आणि पुढे तुम्हा सर्वांना वेगवेगळे पुरुष पती मिळतील. अशा प्रकारे कि न्नरांची उत्पत्ती झाली आणि याबद्दल सर्व माहिती वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडमध्ये स्पष्टपणे लिहिली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पे ज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *