जगातील एकमेव मंदिर ज्याठिकाणी आहे सोंड नसलेली गणपतीची मूर्ती…मानवी रूपातच केली जाते पूजा कारण..तिथे शिव शंकर आणि श्री राम यांनी..

लाईफ स्टाईल

गणपती बाप्पा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ते त्यांचे मनोहर स्वरूप, मोठे कान, लंबोदर, चतुर्भुज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोठी सोंड, वाहन उंदीर आणि हा आपला बाप्पा विघ्नहर्ता, सुखकर्ता म्हणवला जातो. त्याची अनेक विविध रूपे आपल्याला मोहित करतात. अगदी बालगणेशापासून विविध रुपात त्याची पूजा केली जाते अनेक मंदिरात त्याचे अनोखे स्वरूप आपल्याला पाहायला मिळत असते.

अश्या विविध रूपांनी नटलेले बाप्पा आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. पण कोणतेही रूप असले तरी त्याचे स्वरूप मात्र एकच असते, जे कि शूर्पकर्ण, लंबोदर, मुशकवाहक, एकदंत आणि सोंड असलेला बाप्पा. सर्वांचा प्रिय, पण जर आज आपल्याला समजले कि सोंड नसलेल्या बाप्पाची पूजा सुद्धा केली जाते तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना ?पण हे खर आहे.

जगात एकच ठिकाण असा आहे जिथल्या मंदिरात सोंड नसलेल्या बाप्पाची मूर्ती आहे. चला तर मग पाहुयात कोणत आहे ते ठिकाण. तर आपल्याला माहित आहे कि गणपती ही वैश्विक देवता आहे. भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा गणेशाची आराधना केली जाते. आफगाणिस्तान पासून जपान पर्यंत गणपतीची अनेक रुपात आराधना केली जाते.

सुमारे पाच हजार वर्षांपासून घरोघरी गणपती पूजन केले जाते. हजारो वर्षे, हजारो आख्यायिका, इतक्या प्रचंड प्रसारामुळे गणपतीची अनेक रूपे आपल्याला पाहायला मिळतात. हातात मुळा घेतलेला, स्त्री रूपातील गणेश , विनायकी, कांगीतेन अशा विविध रुपामध्ये गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळतात.

गणपतीच्या विविध रुपामध्ये गणपतीचे गजमुख शी र मात्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र शी र नसलेल्या गणपतीची मूर्ती पाहायला मिळणे हे आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट मानली जाईल. मंडळी आपल्या सर्वांनाच माहित आहे कि, बाप्पाला गजमुख का लावले गेले? पण हे गजमुख लावल्यापुर्वी मानवी म स्तक असलेल्या रूपातील गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे भारतातच.

दक्षिण भारतात गणेशाला शी र लावण्यापूर्वीचे मानवी म स्तक असतानाची मूर्ती असलेले मंदिर आहे. हे मंदिर मानवी रूपातील गणेशाचे एकमेव मंदिर मानले जाते. तामिळनाडू मधील कुथनुरू पासून जवळ असणाऱ्या तीलतपर्णपुरी जवळ हे मंदिर आहे. ‘आदी विनायक’ असे या मंदिराचे नाव आहे. गजमुखी अवतारापुर्वी असलेल्या मानवी अवतारातील मूर्ती येथे असल्यामुळे त्याला आदि असे म्हणले जाते.

या भागाला तीलतपर्णपुरी म्हणण्याचे सुद्धा एक खास कारण आहे. जे प्रभू रामचंद्रांशी निगडीत आहे. एका पौराणिक कथेनुसार, प्रभू रामचंद्र हे आपले पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले असता पिंडदाना नंतर त्यांना त्या जागी किडे दिसू लागले. म्हणून प्रभूनी पुन्हा पिंडदान केले, पुन्हा त्या जागी किडे दिसू आगळे, असे अनेकदा झाले. म्हणून त्यांनी शिव शंभू महादेवाची आराधना केली.

अराधणे नंतर साक्षात महादेव तेथे प्रकट झाले आणि त्यांनी मंथरावन येथे जाऊन आपल्या पित्याचे श्राद्ध करण्यास श्रीरामास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार प्रभूनी मंथरावन येथे पिंडदान केले. आश्चर्य म्हणजे प्रभूनी ज्याठिकाणी पिंडदान केले तेथे चार शिवलिं गे प्रकट झाली. आजही ती शिवलिं गे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच या भागाला लोक मु क्तीश्वर म्हणून ओळखतात.

आणि आजही अनेक लोक आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून येथे येऊन पिं डदान करतात. तीलतर्पणपुरी तीर्थाजवळ हे विशेष असे आदिविनायकाचे मंदिर आहे. महादेवाने गणेशाचे मानवी शी र भं ग करण्यापूर्वीचे हे गणेश रूप असल्याने याला न रमुख गणेश असेही म्हणतात. गणेशाची मूर्ती चतुर्भुज असून त्याचा चेहरा भाऊ कार्तिकेय याच्याशी मिळता जुळता आहे.

आपला उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसलेल्या रूपातील हि मूर्ती विलोभनीय आहे. खुद्द अगस्ती ऋषी दर संकष्टीला या गणेशाची आराधना करत असत. गणेशा सोबतच येथे भगवान महादेवाची सुद्धा पूजा केली जाते. या अनोख्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून लोक येथे येत असतात. तर मग मंडळी तुम्ही कधी घेताय आदी विनायकाचे दर्शन?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *