छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या ह ल्यानंतर शाहिस्तेखानाचे पुढे काय झाले?…तर आज सुद्धा बांगलादेश मध्ये त्यांचे..जाणून

लाईफ स्टाईल

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच अंगात असे चैतन्य सळसळून भरते. त्यांच्या धा डसाच्या, शौर्याचा एक एक कथा ऐकून स्फुरण चढते. प्रत्येक महाराष्ट्रीयांची मान, मराठ्यांची मान अभिमानाने उंचावते. अंगावर शहारे आणणारा तो अफजलखानाच्या व धाचा प्रसंग. असे अनेक कितीतरी प्रसंग आहेत. असाच महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तो डलेला एक प्रसंग.

शाहिस्तेखान उर्फ मिर्झा अबू-तालिब हा तुर्कस्तानचा नवाब होता. शाहिस्तेखान हा मुगल सम्राट औरंगजेब याचा मामा होता. मिर्झा अमीर उल् उमरा हायबतजंग नवाब शाहिस्तेखान अबू तालिब अशा शाहिस्तेखानाच्या पदव्या आणि पूर्ण नाव होते. शाहिस्तेखान दख्खनचा सुभेदार असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करण्यासाठी तो पुण्यामध्ये आलेला होता.

दक्षिणेत आल्यानंतर त्याच्या एक लाख बलाढ्य फौजेने तब्बल 55 दिवस ल ढून चाकणचा भुईकोट किल्ला मिळवला होता. पुण्यात आल्यावर शाहिस्तेखान स्वराज्याच्या रयतेवर प्रचंड अन्याय आणि अ त्याचार करू लागला. बघावे तिकडे लू टपाट आणि लू टमार चालू झाली. म्हणूनच त्याला धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महाला मध्ये घु सून खानाची तीन बोटे छा टली होती.

महाराजांनी आज आपली तीन बोटे का पली उद्या आपले शी र ध डावेगळे करतील या भीतीने खान लाल महाल आणि पुणे सोडून गेला. आपल्या सर्वांनाच वाचायला उत्सुकता असेल की, शाहिस्तेखानाचे पुढे काय झाले? शिवाजी महाराजांना घा बरून तो कुठे पळून गेला? त्याचा मृ त्यू कुठे आणि कसा झाला? वाट कसली बघताय चला मग जाणून घेऊया!

आजूबाजूला तब्बल एक लाखांचे मुघल सै न्य असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची तीन बोटे छा टली. परंतु ती फक्त शाहिस्तेखानाची बोटेच नव्हती तर अख्ख्या मुगल सल्तनतचे महाराजांनी नाकच का पले. या सर्व घटनेने सं तापलेल्या औरंगजेबाने शाहिस्तेखानाला शिक्षा म्हणून त्याची रवानगी थेट बंगाल प्रांतामध्ये केली.

शाहिस्तेखानाला बंगालचा सुभेदार बनवले. त्यानंतर पुढे शाहिस्तेखान हा शेवटपर्यंत बंगालचा सुभेदार राहिला. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, छत्रपती शिवाजी महाराजांकडून नाक का पले गेल्यानंतर शाहिस्तेखानाने बंगाल प्रांतात जाऊन चांगली कामगिरी केली. बंगाल मध्ये त्याने इंग्रजांना बंदी आणली होती, त्याने इंग्रजांवर निर्बंध ठेवले होते.

इंग्रजांना आपल्या ताब्यात ठेवले होते. शाहिस्तेखान बंगालचा सुभेदार असताना त्याने बंगालमध्ये मुघल सै न्याचे नौदल स्थापन केले होते. त्याने बंगालच्या खाडीत जहाज बांधणीचे काम सुद्धा सुरू केले. तो 1664 ते 1688 च्या दरम्यान बंगालचा सुभेदार होता. या काळात बंगालमध्ये शाहिस्तेखानाने अनेक चांगली कामे केली.

पण या काळात त्याने एकदाही स्वराज्याकडे मान वर करून पाहण्याचे धाडस केले नाही. आणि स्वराज्यावर चाल करून जाण्याचे त्याचे धाडस ही झाले नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला असा धडा शिकवला होता की आयुष्यभर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची द हशत बसली होती. पुढे 1693 ते 1694 च्या दरम्यान त्याचा मृ त्यू झाला. शाहिस्तेखान जवळपास 93 वर्षे जगला. पण त्याचा मृ त्यू नैसर्गिकरीत्याच झाला.

सध्याच्या बांगलादेश मध्ये ढाका या शहरात त्याचे थडगे आहे. शाहिस्तेखान 93 वर्षे जगला पण छत्रपती शिवाजी महाराजांची त्याने इतकी धा स्ती घेतली होती की, आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेला जाण्याची त्याची हिंमत झाली नाही. असे शूर वीर होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवराय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *