आपल्याला माहित आहे कि स्व तंत्र सा म्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वरा ज्य संस्थापक ‘श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले’ हे एक थोर क र्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वरा ज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वरा ज्य का रभा र करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छ त्रपती आहेत. पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकीकडे आपण राज्याभिषेक उ त्सव अतिशय उत्साहात साजरा करतो.
पण दुसरीकडे राजांची एक अमूल्य गोष्ट आपण ग मा वण्याच्या मार्गावर आहोत. काय आहे ती गोष्ट ? ज्या शिवरायांनी अनेक कि ल्ले, जलदु र्ग उभारले त्याकडे आपल्या कुणाचंच फारसं लक्ष नाही. त्यामुळे हा अमू ल्य ठेवा हळूहळू न ष्ट होतोय. पण यापेक्षाही एक अमू ल्य आणि एकमेव अशी एक गोष्ट आहे की जी न ष्ट झाली तर आपल्याला आपल्या पुढील हजारो-लाखो पि ढ्या या कधीही मा फ करणार नाहीत.
राजे म्हणजे महाराष्ट्राचा श्वा स आणि ध्यासही, ज्या राजाने कायम रयतेसाठी आपलं आयुष्य प णाला लावलं अशा राजाची एक छोटी गोष्ट आपल्याला सांभाळता येऊ नये हेच आपलं दु र्दै व आहे. राजे म्हणजे निश्चयाचा महामेरु… जे-जे म नी ठरवलं ते-ते करून दाखवलं. मग ती स्वरा ज्य निर्मिती असो वा भर समु द्रात बांधलेला सिंधुदु र्ग असो दोन्ही गोष्टी या एकमेव द्वितीयच!
शिवाजी राजांनी मुरुड जवळील समु द्रातील जलदु र्ग ‘जं जिरा’ जिंकण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण प्रत्येक वेळेस नशीबानं साथ न दिल्यानं महाराजांना तो जिं क णं शक्य झालं नाही. अशा वेळी ‘जं जिराच्या उ री दुसरा जं जिरा बांधू’ असं म्हणत महाराजांनी जलदु र्ग बांधण्याचं निश्चित केलं. साधारण साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजे कोणतीही अत्याधुनिक साधन सामुग्री नसतानाही राजेंनी केलेला हा प ण फारच मोठा होता.
राजेनी जेव्हा सू रते वर छा पा घातला त्यावेळी त्यांना स्वरा ज्यासाठी फार मोठं ध न लाभलं. स्वरा ज्याचं हे धन स्वरा ज्यासाठीच खर्च होईल याची पुरेपूर काळजी राजेनी घेतली. सूरतेच्या छा प्या नंतर राजे काही दिवसांनी तळ कोकणाच्या स्वा रीवर गेले. याच वेळी ते मालवण नजीक थांबले होते. तिथेच राजेना मालवणच्या किनाऱ्यावरुन एक मोठं बेट दिसलं. राजेनी तात्काळ जवळच्या म च्छिमा रांना बोलावून बेटाची माहिती मागवली.
म च्छिमा रांनी दिलेली माहिती महाराजांना थक्क करुन टाकणारी होती. कारण भर मध्य समुद्रात असलेल्या या बेटावर चक्क गोड्या पाण्याचे झरे होते. इथेच राजेनी दुसरा जंजिरा बांधण्याचं ठरवलं. यथा सांग पूजन करून महाराजांनी किल्ल्याचा पहिला चि रा मांडला आणि समुद्राच्या मधोमध किल्ल्याचं बांधकाम सुरु झालं. महाराजांना सूरते वरील छा प्यात जे धन मिळालं होतं ते त्यांनी या किल्ल्यासाठी वापरलं असल्याचं काही अस्सल पत्रांवरुन समजतं.
किल्ल्याचं काम हळूहळू सुरु झालं, पण त्याच वेळेस राजा जयसिंग मि र्झा याने स्वरा ज्यावर आ क्र म ण केलं. राजांनी वेळ ओळखून मि र्झाशी त ह केला. त्याला आपल्या ता ब्यातील काही किल्ले देऊ केले तर काही स्वत: जवळ ठेवले. याचवेळी त्यांनी मालवण मधील सुरु असलेल्या किल्ल्याचे बांधकामही चालूच ठेवले होते. मि र्झामुळे राजांना दिल्ली वारी करावी लागली होती. यावेळी औ रंगजेबाने तब्बल सहा महिने त्यांना कै देत ठेवल्याचं म्हटलं जातं.
दिल्ली वारीमुळे राजांची महाराष्ट्रातील अनेक कामं अ डकून पडली होती. पण तरीही काही कामं महाराजांनी खास नेमून दिली होती. त्यापैकी एक म्हणजे मालवणचा किल्ला. महाराज दिल्लीतून सु खरूप परतल्यानंतर त्यांनी सर्वात आधी मालवणचा किल्ल्याची पाहणी केली. यावेळी किल्ला जवळपास पूर्णत्वास आला होता. त्यानंतर काही दिवसांमध्येच किल्ला पूर्ण झाल्याचं महाराजांना समजलं आणि तेव्हा स्वत: राजे किल्ला पाहण्यासाठी येथे आले.
आणि मग त्यांनीच किल्ल्याचं नाव ‘सिंधुदु र्ग’ असं ठेवलं. किल्ला पाहून राजेना प्रचंड आनंद झाला. यावेळी राजेनी किल्ल्याचं बांधकाम करणाऱ्य मजुरांना विशेष बक्षीस देण्याचं ठरवलं. राजेनी या कामगारांना तशी विचारणाही केली. पण यावेळी या मजुरांनी आणि कामगारांनी जे काम केलं ते आपल्या हजार पि ढ्यांना पुरेल असं होतं. ते म्हणजे त्यांनी स्वत:ला काही मागण्याऐवजी किल्ल्याजवळ राजांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताच्या पं जाचा ओल्या चुन्यात ठ सा घेतला. केवढी ही मोठी गोष्ट..
राजे कसे दिसत असतील… याचा आपण आजवर फक्त अं दाजच बां धत आलोय. पण आजही आपल्याला सिंधुदु र्ग किल्ल्यावर राजांच्या हाताचा आणि पायाचा ठ सा पाहायला मिळतो. आजवर अनेक किल्ल्यांची आपल्या उ दा सिनतेमुळे दु र्दशा झाली आहे. पण हे होऊ नये याची का ळजी आपण घेतली पाहिजे. सिंधुदु र्गावरील राजांच्या हाताच्या आणि पायांचा जो ठ सा आहे तो जपला पाहिजे.
काही दिवसांपूर्वी सिंधुदु र्ग किल्ल्यावर जाणं झालं होतं. यावेळी किल्ला फिरत असताना राजांच्या पायाचा आणि हाताचा ठ सा पाहून म न अगदी भरून आलं. पण याचवेळी एका गोष्टीचं फार वा ईट ही वाटलं. सिंधुदु र्ग किल्ला तसा मजबूत आहे. पण आता हळूहळू त्याचीही प डझ ड होत आहे. याच प डझ डी सोबत राजांच्या हाता-पायाचा ठ सा देखील न ष्ट होण्याची भी ती निर्माण झाली आहे.
राजांच्या पायाचा ठ सा जिथे घेण्यात आला तिथे एक अगदी छोटीशी देवळी करण्यात आली आहे. पूर्वी याला एक काचेचा दरवाजा असावा. पण आता फक्त दरवाज्याची चौकट आहे. इथे पावसात आत बरंच पाणी जात असावं. यामुळे राजांच्या पायाचा ठ सा हळूहळू धु सर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा ठ सा पुसला जाणार नाही याची काळजी स र का रने तात्काळ घ्यावी. तेवढं जमल्यास आपण आपल्या पुढच्या पि ढ्यांसाठी खूप मोठी गोष्ट देणार आहोत हे लक्षात घ्यायला हवं.
जिथे राजांच्या पायाचा ठ सा आहे. त्यापासून अगदी जवळ पण थोड्याशा उंचावर राजांच्या हाताचाही ठ सा आहे. पण आता हा ठ सा जवळजवळ पु सट होत चालला आहे. पायाच्या ठशासाठी जशी देवळी बांधली आहे तशीच हाताच्या ठशासाठी देखील देवळी बांधली आहे. पण याची अ व स्थाही फारच वि चि त्र आहे. एक लाकडी दरवाजा पण काचेचं आवरण नाही.
त्यामुळे राजांच्या पंजाचा ठ सा सततच्या पाण्यामुळे आणि वा ता वरणामुळे पु सट होत चालला आहे. तो न ष्ट होऊ नये याची काळजी आपणच घ्यायला हवी. ज्या राजाने आपल्याला जगण्याचा स्वा भिमा न शिकवला. ज्या राजाने आपल्याला स्वत:ची ओळख करुन दिली. त्या राजाचं आपण काही तरी देणं लागतो हे अजिबात विसरता कामा नये. स र का रने आणि आपण देखील. या लेखाच्या माध्यमातून स रका रपाशी एकच विनंती आहे की, याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्याची योग्य ती तजवीज करावी…