नमस्कार मंडळी, आपण नेहमी पाण्याच्या विहिरी बद्दल ऐकले आहे. खाऱ्या पाण्याच्या तसेच गोड पाण्याच्या अनेक विहिरी आपण आजही शेतामध्ये, रस्त्याच्या बाजूने पहात असतो, खाऱ्या पाण्याच्या, गोड्या पाण्याच्या विहिरी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत असतात. तेलाच्या विहिरी बद्दल आपण ऐकून आहोतच.
शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी, पिण्यासाठी अशा अनेक कामासाठी विहिरीच्या पाण्याचा उपयोग केला जातो.
आड, बाव, पावडी, बारवी अश्या अनेक नावानी विहीर परिचित आहे. प्राचीन काळापासून विहिरींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आजही अनेक लोक पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अनेक दुर्ग, किल्ले बांधले त्यामध्ये पाण्याच्या सोयीसाठी म्हणून प्रत्येक किल्ल्यामध्ये विहिरी खो दल्या होत्या.
हे आपल्याला माहित आहेच. दुर्ग अर्थात समुद्रात बांधलेल्या किल्य्यामध्ये सुद्धा गोड्या पाण्याच्या विहिरी असणे हे कोणत्याही आश्चर्यापेक्षा कमी नाही, पण मंडळी आज आपण महाराजांच्या अनेक अचंबित करायला लावणाऱ्या गोष्टींपैकी एका गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत. ती गोष्ट म्हणजे कु जलेल्या तुपाच्या विहिरी. होय मंडळी, महाराजांनी स्वराज्यासाठी प्रा ण पणाला लावणाऱ्या मावळ्यांच्या र क्षणासाठी अनेक प्रयत्न केल्याचे आपल्याला माहित आहेच.
त्यातीलच एक म्हणजे कुजलेल्या तुपाच्या विहिरी. महाराजांनी स्वराज्यात आणलेल्या प्रत्येक किल्ल्यात या अश्या विहिरी पाहायला मिळत असत. तुपाचे अनेक फा यदे आपल्याला माहित आहेतच. आपल्या रोजच्या जेवणात तूप हा अनिवार्य पदार्थ मनाला जातो. शरीराला उर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तूप सर्वात वरच्या क्रमांकाला असते.
आपले हृ दय निरो गी ठेवणे, वजन कमी करण्यासाठी तसेच पोट साफ करण्यासाठी होत असलेला तुपाचा परंपरागत उपयोग सर्वांनाच चिरपरिचित आहे. म्हणूनच अलीकडे सर्वच डॉ क्टर्स आपल्या रोजच्या जेवणात तुपाचा उपयोग आवर्जून करण्याचा सल्ला देत असतात. व्यवस्थित साठवलेले तूप किमान वर्षभर ताजे आणि चांगले राहते, असे हे तूप जखम बरी करण्यासठी देखील तेवढेच गुणकारी आहे. मधात मिक्स करून जखमेवर तूप लावल्यास त्याचा फा यदा होत असतो.
पूर्वीच्या काळी अन्नधान्य, संपत्ती व तूप साठवून ठेवण्यासाठी बंदिस्त विहिरींचा उपयोग केला जात असे. तूप हे जखमेवरील उत्तम आणि प्रभावी औ षध आहे. तूप जितके जुने तेवढे त्यामधले औ षधी गुणध र्म अधिक त्यामुळेच अश्या विहिरी आपल्याला किल्ल्यांवर पाहायला मिळतात. त्याकाळी दुध दुभते भरपूर प्रमाणात असल्याने तूप सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार होत असे.
असे तूप साठून ते अधिक औ षधी आणि टिकावू होण्यासठी त्यावर प्रक्रिया करून हे तूप अश्या विहिरींमध्ये साठवले जात असे. ज्याचा उपयोग स्वराज्याच्या मावळ्यांच्या ज खमा बऱ्या करण्यासाठी वापरले जात असे. त्या काळी इतक्या ल ढाया होत असत त्यामध्ये मावळे ज खमी होत असत, त्यांना बरे करण्यासठी आता सारखे मोठे द वाखाने किंवा डॉ क्टर्स नव्हते. राज वै द्य अश्या मावळ्यांवर उ पचार करत असत.
असे उ पचार करत असताना त लवारीच्या आणि इतर श स्त्रांच्या घा वामुळे झालेल्या ज खमा लवकर भरून येण्यासाठी म्हणून अश्या कु जलेल्या अर्थात खूप दिवस साठवून ठेवलेल्या तुपाचा वापर केला जात असे. कु जलेले तूप हे ज खमेवरचे जालीम औ षध मानले जाई. असे असले तरी हा उ पचार मावळ्यासाठी नकोसा असे. कारण हे तूप जरी औ षधी असले तरी ते लावल्यानंतर भयंकर वे दना होत असत.
या वे दना स हन करणे बऱ्याचदा असह्य होत असे. तरी सुद्धा राजे आपल्या मावळ्यांच्या काळजीपोटी या तुपाचा वापर करण्याचा आदेश देत असत. कु जलेले तूप लावल्याने जखम कोरडी राहत असे. त्यामध्ये पू अर्थात कोणतेही इन्फे क्शन होत नसे. म्हणून या तुपाचा वापर कोणत्याही ल ढाई मध्ये ज खमी झालेल्या मावळ्यांना लवकरात लवकर बरे करण्यास अनिवार्य होता. राजांचा आदेश कोनीही मो डू शकत नाही हे तर आपल्याला माहित आहेच.
म्हणूनच निव्वळ राजांचा आदेश म्हणून सर्व मावळे अश्या प्रचंड वे दना स हन करून सुद्धा या औ षधाचा वापर करत असत आणि राजे सुद्धा आपल्या मावळ्यांच्या प्रकृती सुधारणेसाठी त्यांना होणाऱ्या तात्पुरत्या त्रा साकडे न पाहता त्यांना अश्या औ षधांचा वापर करण्याचा आदेश देत असत. शिवराय जसे स्वराज्य विस्ताराचा विचार करत असत त्याहून जास्त ते आपल्या मावळ्यांचा विचार करत असत. धन्य ते शिवराय!