चीनची भिंत: आणि हीच भिंत बांधताना तब्ब्ल लाखो लोक गाडली होती…कारण जाणून आपले सुद्धा होश उडतील…कारण ते लोक जाणून घ्या रहस्यमय इतिहास

लाईफ स्टाईल

जगभरातील ७ आश्चर्यांपैकी पाहिलं आश्चर्य म्हणजे ‘चीन ची भिंत ‘ अर्थात ‘द ग्रेट वाॅल ऑफ चायना’. हे नाव ऐकल नाही असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक या भिंतीला भेट देण्यासाठी येत असतात. युनेस्कोने सुद्धा या भिंतीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. आणि याचं जागतिक आश्चर्याबद्दलच्या आणखीन काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

तर चीन मध्ये अतिप्राचीन काळात उत्तरेकडील मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबवण्यासाठी दगड, माती आणि विटा वापरून ही भिंत बांधण्यात आली असून विटा जोडण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करण्यात आला आहे. ही भिंत आपल्या समजाप्रमाणे ही भिंत एकसलग नसून अनेक छोट्या मोठ्या भिंती एकमेकांशी जोडून ही भिंत बांधलेली आहे.

तसेच इथे काही ठिकाणी मोकळी जागा सुद्धा आहे. आणि ही भिंत बांधण्याची कल्पना चीनचा पहिला सम्राट ‘किन शी हुआंग ‘ यांची होती. त्याच्या कारकिर्दीत हे काम होऊ शकले नाही. त्याच्या मृ त्यू नंतर शेकडो वर्षांनी या भिंतीचे काम सुरु करण्यात आले. इ.स.पूर्व १५ व्या शतकात चालू झालेले हे काम पुढे १६ व्या शतकापर्यंत चालू राहिले.

यावरूनच आपण या भिंतीच्या भव्यतेचा अंदाज करू शकतो. अर्थातच, हे काम वेगवेगळ्या चीनी सम्राटांच्या देखरेखी खाली पार पडले. तसेच भिंत बांधण्याचा मूळ हेतू हा सुर क्षितता हा होता. मात्र ह्या भिंतीच्या एकूण लांबी बाबत अनेक दावे केले जातात. पुरातत्व सर्वेक्षणानुसार, २००९ मध्ये या भिंतीची लांबी ८८५० कि.मी होती.

परंतु, २०१२ मध्ये चीनमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि, चीनची भिंत सुमारे २११९६ किमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर रुंदीच्या बाबतीत सांगायचे म्हणल्यास एकावेळी पाच घोडेस्वार किंवा १० सैनिक इथे फेऱ्या मारू शकतात एवढी रुंद आहे. या भिंतीची उंची एकसारखी नाही. काही ठिकाणी भिंत ९ फूट उंच आहे तर काही ठिकाणी ३५ फूट इतकी उंच आहे.

चीन मध्ये या भिंतीला ‘वान ली चांग चांग ‘ या नावाने संबोधले जाते. ज्याचा अर्थ ‘चीनची विशाल भिंत असा होतो’. परकीय आ क्रमणे रोखण्यासाठी म्हणून जरी या भिंतीची निर्मिती केलेली असली तरी यामुळे परकीय आक्रमणे पूर्णपणे रोखण्यात चीनी सा म्राज्याला यश आले नाही. ही भिंत पडण्याचा, उ ध्वस्त करण्याचा प्रयत्न अनेकानी केला आहे.

सर्वात आधी इसवी सन १२११ मध्ये चंगेज खान याने एकाच ठिकाणी हि भिंत पाडून तिथून चीन वर आ क्रमण केले. त्यावेळी हा मोठा कारनामा होता. त्यामुळे सर्वांच्या मनात भी तीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण एवढी विशाल भिंत तो डली जाऊ शकते हा विचार करण सुद्धा तेव्हा शक्य नव्हत. मात्र आ क्रमण झाल्यानंतर प्रत्येक वेळी या भिंतीची डागडुजी करण्यात आली आहे.

या भिंतीवरून दुरूनच श त्रूवर नजर ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी मिनार उभे करण्यात आले आहेत. १९७० साली ही भिंत जगभरातील पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. ही भिंत बांधण्यासाठी सुमारे २० ते ३० लाख मजुरांनी अपरिमित कष्ट घेतले आहेत. म्हणून या कलाकृतीला सर्वात मोठी मानवनिर्मित कलाकृती म्हणले जाते. असे असून सुद्धा या भिंतीला जगातील सर्वात मोठी स्म शानभूमी म्हणले जाते. ते का बरे?

भीत बांधत असताना सुमारे २० ते ३० लाख मजूर इथे खपत होते. परंतु त्यांच्यापैकी जे कामगार आपल्या कामात दिरंगाई करतील किंवा कामचुकारपणा करतील त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच या भिंतीमध्ये जि वंतपणी गाडल जात असे. त्यामुळे या पूर्ण भिंतीमध्ये जागोजागी १० लाखांहून अधिक लोकांचे मृ तदेह असल्याचे म्हणले जाते.

आणि म्हणून या भिंतीला जगातील सर्वात मोठी स्म शानभूमी म्हणतात. सन १९६०-७० च्या दशकात लोकांनी या भिंतीच्या विटा चोरून आपल्या घराची बांधकामे करणे सुरु केले होते. मात्र चीन स रकारने यावर बं दी घालून ते एक पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले. चोरी मात्र आजही येथे होतच असते. भिंतीच्या एका विटेला ३ पौंड एवढी किंमत मिळत असल्याचे सांगितले जाते.

चीनच्या भिंतीचा एक तृतीयांश भाग आता न ष्ट झाला आहे. कारण या भिंतीची देखभाल योग्यप्रकारे केली जात नाही. तसेच वातावरणातील होणारा बदल आणि चोरी ही देखील कारणे भिंतीचा भाग न ष्ट होण्यासाठी सांगितली जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *