चिंचेच्या पानांचे हे उपाय आपल्याला ट्यूमर सारख्या ७ आजरांपासून ठेवतात दूर…जाणून घ्या आश्यर्यकारक असे फा यदे…म्हतारा माणूस सुद्धा पळायला लागेल

आरोग्य

आपल्यातील प्रत्येकाने चिंच ही खाल्लीच असेल, तिखट मीठ लावलेली गाभूळलेली चिंच पहिली की प्रत्येकाच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटते, तसेच चिंचेचे झाडही एवढे डेरेदार असते, की त्याच्या सावलीत बसण्याची सुद्धा एक वेगळीच मजा आहे. आपल्या प्रत्येकाचे बालपण हे त्याच सावलीमध्ये गेलेले आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी चिंचा पाडून खाल्ल्या असतील.

तो जो आनंद होता तो काही वेगळाच होता. पण आपल्याला माहित आहे का कि चिंच आपल्या शरीराला किती गुणकारी आहे. पण चिंचेप्रमाणेच चिंचेची पाने सुद्धा तितकीच उपयोगी आणि आपल्या शरीराला लाभदायक अशी आहेत आणि आज आपण याच चिंचेच्या झाडाच्या पानाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या पानांचे आरोग्यदायी फायदे.

मित्रांनो, आपल्यातील प्रत्येकाने लहान असताना चिंचेची पाने अगदी आवडीने खाल्ली असतील मात्र आजपर्यंत आपल्याला त्या पानांचा असलेला उपयोग कळलाच नाही. अगदी चिंचेप्रमाणेच चिंचेच्या झाडांची पानेही शरीराला अतिशय लाभदायक आहेत आणि या पानांचा उपयोग करून आपण अनेक विकरांपासून दूर राहू शकतो.

अगदी लहान-मोठ्या आजारापर्यंत अनेक रोग बरे करण्याची क्षमता या चिंचेच्या पानांमध्ये आढळते. तसेच चिंचेची पाने खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा गर्भवती महिलांना होतो. कारण जेंव्हा महिला आपल्या बाळाला जन्म देतात तेंव्हा सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे दुधाची आणि या दुधाची गुणवत्ता वाढवण्याचं काम हे चिंचेची पाने करत असतात त्यामुळे जर दुधाची गुणवत्ता आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी गर्भवती महिलांनी गर्भावस्थेत चिंचेची पाने नक्की खायला हवीत.

तसेच जर आपल्याला एखाद्या जागी गंभीर जखम झाली असेल तर चिंचेच्या पानाचा उपयोग आपल्याला सूज तसेच वेदना कमी करण्यासाठी अगदी उत्तम रित्या होतो. शिवाय जर का आपल्याला एखादा संसर्ग झाला असेल जसे कि गजकर्ण, पांढरे डाग, तर अशावेळी सुद्धा चिंचेच्या पानांचा लेप आपल्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. तसेच या झाडांची साल लकवा किंवा शरीराच्या अवयवाची संवेदना कमी झाली असल्यास या झाडांच्या सालीचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये आज सुद्धा तितक्याच प्रमाणत केला जात आहे.

तसेच सालीचा उपयोग हा अल्सर, स्त्रीरोग, लघवी करताना जळजळ होणे यावरील औषधांमध्ये होतो. तसेच आजकाल बऱ्याच लोकांची हाडे कमजोर झालेली आहेत. त्यामुळे जर एक आपल्याला आपल्या शरीरातील कॅल्शिअमची क्षमता भरून काढायची असेल तर चिंचेची पाने आपल्यासाठी वरदान ठरू शकतात, तसेच या पानांमध्ये कॅल्शिअम बरोबरच जीवनसत्व ‘क’ सुद्धा मोठ्या प्रमाणात असते.

तसेच जर का आपले पोट साफ होत नसेल तर चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित सेवन केल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी त्वरित थांबते. तसेच ज्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमी आहे ज्याला आपण ॲनिमिया असं म्हणतो पण जर का आपण काही दिवस चिंचेची कोवळी पाने खाल्ली तर आपली रक्ताची कमतरता त्वरित भरून निघते. कारण या पानांमध्ये लोह मोठ्या प्रमाणत असते.

तसेच जर आपले रक्त अशुद्ध असेल तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर बारीक बारीक फुटकुळ्याच्या स्वरूपात आपल्याला दिसतो ज्याला आपण मुरूम म्हणतो पिंपल्स असे म्हणतो. पण जर आपण ही पाने खाल्ली तर पिंपल पासून चांगला बचाव होतो. रक्त शुद्ध करणारे रक्ताचा विकार कमी करणारे अशी ही पाने आहेत.

तसेच ज्यांना दात-दुखीचा त्रास आहे त्यांनीही ही पाने चावून चावून खा, आपल्याला काही वेळातच याचा परिणाम आपल्याला दिसेल. आपली हाडं आपले दात मजबूत ठेवण्यासाठी फोस्पोरसचे फार मोठे योगदान आहे. तसेच आजकाल ट्यूमर चे प्रमाण खूप वाढत चालले आहे. मित्रांनो ट्यूमर पासून सुद्धा बचाव करणारी अशी ही चिंचेची पाने आहेत. तसेच सांधेदुखी सारखा त्रास कमी करण्यासाठी देखील या पानांचा उपयोग होतो.

एकंदरीत हे आपले आरोग्य सुधारणारी पाने आहेत, त्यामुळे आपल्याला चिंचेची कोवळी पाने खाण्यास काय हरकत नाही. तसेच जर आपल्याला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली असेल तर आपल्या प्रियजनांना देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचे फा य दे कळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *