चाळीत राहणाऱ्या सासू सासऱ्यासोबत सुन असे काही वागते की ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!!

लाईफ स्टाईल

हातामधला आईस्क्रीमचा बॉक्स काकूंकडे देत सानेकाका कोचवर धपकन बसलेच. उन खूप आहे ना, त्यांना पाणी देत काकू बोलू लागल्या. बोलता बोलता त्याचं लक्ष खिडकीबाहेर गेल. झाडाचं पान देखील आज हलताना दिसत नव्हत. हताश होत त्या देखील काकांच्या बाजूला येऊन बसल्या.

आज अचानक आईस्क्रीम का आणायला सांगितलं बाईनी डोळे मिचकावत काकांनी त्यांना विचारलं. वणा ऐवजी फक्त आईस्क्रीम खाऊन ढेकर द्यायचा विचार तर नाही ना? काय माणूस आहात हो तुम्ही! वय वाढत चाललंय तशी स्मरण शक्ती सुद्धा, कमकुवत क मजोर होत चाललीय तुमची! आज तारीख काय? आठ मे ना? आहो! मदर्स डे आहे आज? विसरलात?

गेल्या वर्षी असाचं येताना आईस्क्रीचा फॅमिली पॅक आणला होता तुम्ही, मातृदिन म्हणुन, सुनबाई मुलगा नातू मिळून मस्त एन्जॉय करायचा बेत होता तुमचा.. पण त्याचं दिवशी सुनबाईंनी आपली फॅमिली ब्रेक करायचं वेगळंच एक पॅकेज जाहिर केलं.. वेगळं व्हायचंय मला!काय तर म्हणे ह्या चाळीत मुलावर चांगले संस्कार होत नाहीये.. सगळे मध्यमवर्गीय..

कोणाला बोलायची पद्धत नाही. ना वागायची रीत. सारंच मिडल क्लास!नाही नाही ते शिकून येतो मुलगा!म्हणुन दुसरीकडे राहायला जायचं ठरवलं त्यांनी… काय गं? ह्याचं चाळीत राहून शिकला ना तुझा मुलगा? मोठा झाला! चांगल्या जॉबला लागला. आणि आता त्याला त्याच्या बायकोला. हींच चाळ मिडल क्लास वाटते? जावू दे! गेलं वर्षभर ह्या बद्दल एक शब्दही काढला नव्हता मी ! बघू बघू त्यांच्या हाय सोसायटीत किती.

कसे संस्कार होतात नातवावर! हो.. कसले संस्कार? कधीपण फोन करा. मेड का काय म्हणतात ना. ती बाईच फोन उचलते. साहेब मॅडम बाहेर गेल्याचं सांगते. नातवाशी बोलावं तर तो म्हणतो! आजी ! आजोबांना घेऊन ये ना गं इथं राहायला! मी एकटाच राहतो दिवसभर! ऐकून. पाणी येत हो डोळयांत! आज सुद्धा सकाळपासून कितीदा फोन केला! तर कळालं.

सुनबाई सुपर मॉम कॉ म्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी गेल्यात म्हणे. नवऱ्याला मुलाला घेऊन. खरंतर सुनबाईला आधीपासूनच चाळीत राहणं आवडत नव्हतं. आज ना उद्या नवऱ्याला पटवून जाणारच होती ती. माहेर जरा श्रीमंत आहे ना तिचं. त्यांनी फक्त आपल्या मुलाचा कॉर्पोरेट कंपनीतला जॉब पाहिला. खरंच जावू दे! मी तर म्हटलंच होतं तुला!तरी पण एक प्रश्न उरतोच!

आईस्क्रीमचा फॅमिली पॅक कशासाठी आणायला लावलास? फार विशेष काही नाही हो!गेल्या मदर्स डे च्या दिवशी तुम्ही इतक्या प्रेमानं सर्वांसाठी आईस्क्रीमचा फॅमिली पॅक आणला. परंतु घरातदारात पाय. सुनबाईनं वेगळं निघायचा विषय काढला आणि आपण दोघे स्तब्ध झालो. आल्या आल्या तुम्ही हातात दिलेलं आईस्क्रीमचं पार्सल. चि त्त थाऱ्यावर नव्हतं म्हणुन. फ्रिज मध्ये ठेवण्या ऐवजी गडबडीत माझ्याकडून फ्रिजवर ठेवला गेलं.

सुनबाईचा इरादा. त्याला आपल्या मुलाची मुक संमती. तुम्ही जणू उन्मळून पडला होतात. जेवलाही नाहीत. तसेंच झोपी गेलात. त्यापाठोपाठ मीपण तशींच झोपले. तहान लागली म्हणुन रात्री केव्हातरी जाग आली. किचनमध्ये गेले तर फ्रिजवर तसाचं राहिलेला आईस्क्रीमचा फॅमिली पॅक दिसला. पूर्णपणे वितळून गेला होता. बऱ्याच वेळ मी त्याकडे एकटक पाहत होते.

मनात एकंच विचार थैमान घालत होता. इतक्या दिवस जपलेला आपला ‘फॅमिली पॅक’ सुद्धा आज असाचं वितळला. तिथं उभं राहून खूप र डले. फ्रिजवरचं सगळं आईस्क्रीम साफ केलं. विरघळलेला तो फॅमिली पॅक डस्टबिन मध्ये टाकला. झाकण टाकलं. डस्टबिनचं आणि आक्रोश करणाऱ्या माझ्या मनावर सुद्धा. ठरवलं! बस्स जाताहेत तर जावूदेतं वाईट वाटून घ्यायचं नाही.

आपण दोघेचं मस्त जगायचं. आज पुन्हा तोचं मातृदिन उजाडला सगळं आठवलं! शेवटी आई आहे ना मी! म्हटलं गेल्या वर्षी वितळलेला फॅमिली पॅक या वर्षी नाही वितळू द्यायचा. मदर्स-डे आणि मुलगा घर सोडून गेल्याचा दिवस मस्त एन्जॉय करायचा म्हणुन हा आईस्क्रीमचा फॅमिली पॅक आणायला सांगितला. बोलता बोलता काकूंचा कंठ दाटून आला होता. चेहेऱ्यावरचं उसणं अवसान गळालं होतं. डोळ्यांतले विशन्न भाव जणू प्रश्न विचारीत होते. का? अशी वागतात हि मुलं. का? का? का?

Leave a Reply

Your email address will not be published.