चार मोठ्या मुलांच्या घोळक्यात या मुलीसोबत रेल्वे फ्लॅटफॉर्मवर जे घडले ते पाहून डोळ्यात पाणी येईल..मुंबईतील सत्य घ’टना..

लाईफ स्टाईल

मुंबईमधील रेल्वे स्टेशन वर नेहमीप्रमाणे गर्दी होती. ती स्टेशनवरील लोकांची धावपळ पाहून आपल्याला खूप अजब वाटतं पण. पण ज्यांचा रोजचा प्रवास आणि पोट पाणी त्याच्यावरच चालतं त्यांना त्याच काही नवल नसतं ते फक्त सेकंदाच्या काट्याप्रमाणे धावत सुटतात. परवा योग आला तो मला बघायचा, एका वेगळ्या जगात जाण्याचा, तिथली प्रवाशांची हमालांची धावपळ पाहणाऱ्या लोकांचं दर्शन घेण्याचा.

अगदी लहान वयात बालपण हिरावून घेतलेल्या मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण आपापली कामे करत होती पण ते बघून मला त्यांची कीव येत होती, यातीलच एक डोळे पाणावणारा अनुभव म्हणजे मुलांचा तो घोळका आणि त्यात असणारी ती निरागस, व्यवसाय करणारी एक मुलगी!

रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म माणसांनी नुसता फुलला होता. श्रीमंत, गरीब आणि मध्यम अशा सर्व थरांतील लोक होते. त्यांचे कपडेच ते बोलत होते. काही जणांचे मळकट जुने कपडे काही जणांचे रंगीबेरंगी कपडे तर काहीजण सूटबूट आणि टाई मध्ये होते होते. सगळेजण आपापल्या रेल्वेची वाट पाहत होते आणि आपापली कामे करत होते.

स्टेशनमधील त्या माणसांकडे बघितलं आणि वाटलं की हे जणू माणसांचं म्युझियमच. एवढी माणसं. कशाला प्रवास करत असतील? कुणी कामाला तर कोणी मामाच्या गावाला. कोणी सासरी चालले होते तर कोणी माहेरी चालले होते, कोण औ षध पाण्याला तर कोण नोकरीच्या शोधात चालले होते. एकाच्या डोळ्यात पाणी होते दुसऱ्याच्या ओठी गाणी . हे सर्व दृश्य पाहताना आणखीन एक प्रसंग माझ्यासोबत घडला.

मी दोन पॅकेट्स बो तीच्या कडुन घेतले आणि ती माझ्या समोरुन गेली …माझ्या समोर तशी ती हसत हसत आली होती… दीदी लो ना.. एक तो लो म्हणत… म्हंटल चल दे….नंतर प्लॅटफॉर्मवर फिरत होती कुणी घेईल का याचा अंदाज घेत घेत पुढे जात होती… इतक्यात चार तरुणांचा घोळका तिला दिसला. कुणीतरी ओळखीचं भेटावं असा भाव आणि निखळ हसु तिच्या चेहर्यावर होतं…

मी तिच्या कडे बघतचं होते, ते तरुण कुठेतरी गावाला जाणारे होते तिच्या ओळखीचे असणं शक्यच नव्हतं एवढं तरी त्यांच्या आणि तिच्या पेहरावावरुन कळतं होतं… पण तरीही ति त्यांच्या घोळक्यात आनंदाने सामिल झाली आणि त्यांना विनवणी करु लागली, लो ना एक तो लो… इतका वेळ मी फक्त तिच्याकडे बघत होते

ति त्यांच्या घोळक्यात सामिल झाल्यावर लक्षात आलं त्या चार तरुणांपैकी तिघांनी केस वाढवले होते आणि ते बो ने बांधता येतील इतके मोठे होते… आणि इथं नक्कीच माझा माल खपेल याची तिला त्यांना बघता क्षणी खात्री झाली म्हणुन ती इतक्या खुशीने त्यांच्या कडे आली. आणि त्या तरुणांनी तिच्या कडुन २० रुपयांचे बो घेतले…थँक्यू म्हणत एक गोडं हसु तिच्या चेहर्यावर होतं आणि ती तिथुन निघुन गेली.

तिच्यात माल खपवताना कोणताही अप्रामाणिक पणा किंवा स्वार्थ नव्हता, कोणतीही फसवणूक नव्हती, कोणत्याही प्रकारचा अट्टाहास नव्हता तर मन जिंकून स्वतःच्या निरागसतेने ती व्यवसाय करत होती, तिचं काम करत होती. लोकांकडून दयेची आशा भीक मागून नव्हे तर उदरनिर्वाहाचे साधन वापरून तो छोटासा जी व झटत होता, तिला मदत करणाऱ्यांच अप्रूप नक्कीच होतं.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतके दिवस मोठे केस वाढवणारी आणि बेल्ट्स पोनी हेअर स्टाईल करणारी मुलं बघीतली की का माहीत नाही पण त्यांचा राग यायचा,पण आज राग नाही आला ते चित्र बघुन ! कारण त्यांच्या केस वाढवण्याने कुणाची तरी कमाई होत होती, त्या मुलीची जगण्यापुरती कमाई.

चेहर्यावर निखळ हसु आणणारी कमाई, घरी आईला खारीचा वाटा देण्यापुरती कमाई, खरंच सलाम आहेत त्या छोट्या निरागस मुलीच्या जिद्दीला, मिळकतीला आणि ती करणारा कामाला!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *