घराची विभागणी झाली आणि आई-वडिलांची वाटणी होताच या दोन्ही सुनांनी केले असे काही… विश्वास बसणार नाही हे पाहून…, पुढे काय झाले ते पाहून धक्का बसेल…

लाईफ स्टाईल

पहाटेच्या थंड गारव्या मधे दुर्पा मावशी चुलीसमोर बसून त्यात चिपाड ढकलत बसली होती, पण गारव्या मुळे चिपाड ओली झाली होती आणि ती काही ज ळत नव्हती, सगळीकडे धूर होत होता. नाका-तोंडात गेलेल्या त्या धुराचा तिथे बसलेल्या म्हातारीला त्रास झाला आणि तिला खोकला येऊ लागला. तिचा आवाज ऐकून ओसरी मधे कलंडलेला शिवा उठला आणि कोपऱ्यातला एक कागद आणि फा टलेले कापड घेऊन दुर्पा कडे चालून जाऊ लागला.

त्याने आणलेला कागद लगबगीने चुलीत घालत दुर्पा फुंकणीने धूर कमी करू लागली ,त्याच वेळी आपल्या किलकिल्या डोळ्यातून तिने शिवाचा पडलेला चेहरा पहिला,”काय ओ धनी ,कालच्यान बघत्या मी तुमी नीट खात पीत न्हाइसा, झोपेतपन सारकी कूस बदलत व्हता रातच्यालाकाय झालंय?” “काय न्हाई.”असा म्हणून शिवा मिसरी हातावर घेऊ लागला.

तुम्ही अशी रात्र जागून, काय होणार आहे का..?, आज घराच्या होणाऱ्या वाटण्या काय थांबणार हाय का? पण आपली पोरं भावकीसमोर आणि चार पाच पंच मंडळांसमोर अंगणात जो काही तमाशा करणार आहेत तो काही अशाने थांबणार आहे का? “तुमी कितीबी इचार केला, अनपानी सोडला तरीबी काय फरक पडणार न्हाई, आज काय तमाशा व्हायचा त्यो हुनारच कि ओ.

आपल्या पोरांनी ठरवल्या परमान आपल्या घराची वाटणी हुनारच. आपण निसत बघत रहायचं.” दुर्पा म्हणाली “त्याबिगर दुसर हाय तरी काय हातात आपल्या?” शिवा कसनुस हसत म्हणाला. त्याला दुपारी आपल्या घरात नेमक काय होणार याच चित्रच दिसत होत जणू. तेवढ्यात दुर्पा म्हणाली,”वरच्या आळीतल्या इठ्ठल भाऊंच्या पोरांवानी आपल्या पोरांनी बी आई बाची वाटणी केली तर ओ?

उद्यापासून चुलीत घालायला चिंध्या कोण आणून देणार मला…” दोघे सुद्धा एकमेकांकडे बघतच राहिले होते आणि त्यानंतर दुपारी एक बैठक झाली आणि सर्व पंच मंडळेही तेथे जमली, सर्व शेजारी सुद्धा एकत्र जमले होते. आणि एका कोपऱ्यात म्हातारा पण उभा होता. आणि आत म्हातारी डोक्यावर पदर झाकून चुली जवळ बसली होती, आणि येणारे हुंदके मूकपणे गिळत होती होती.

बाहेर त्यांचे मुलं बोलत होते आणि ऐकायला बाकीचे तर होतेच बाहेर. पण त्यांना त्यांची धाकटी सून मात्र कुठेच दिसली नाही आणि त्यांची मोठी सुन मात्र हातात एक गोळी आणि पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली होती आणि ती म्हणाली, जरा वेळ थांबता का.” आमच्या दादांना साखर आहे, आधी त्यांना गो ळ्या घेऊ दे, मग काय मी तुम्हाला अडवायला मधे येणार नाही.

मोठीच्या डोक्यावरचा पदर तसच होता आणि तिने तिचे हात तिच्या सासऱ्या समोर नेत त्यांना गोळ्या दिल्या. त्यांच्या डोळ्यांत बघून तिला सुद्धा वाईट वाटल पण ती सुद्धा तिच्या नवऱ्यासमोर हतबल झाली होती. तिथे जमलेल्या सर्व पंचमंडळींनी आपल्या मोठ्या सुनेचे खूप कौतुक केले, पण त्यांचे हे दोन्ही मुल मात्र कोणाचं काहीच ऐकत नव्हते. दोघेही एकमेकां च्या अंगावर धावून जात होते.

बापाचे झालेले मोतीबिं दूचे ऑ प रेशन व आईला आलेला झटका आणि त्यासाठी खर्च केलेला पैसा या दोघांनी सुद्धा बोलून दाखवला होता. दुर्पा आणि शिवा दोघेपण र डत होते. मनातल्या मनात स्वतःलाच कोसत होते का देवा हाच दिवस बघायचा म्हणून जि वंत ठेवलास अजूनपर्यंत. मोठी सून आळीपा ळीने दोघांकडे बघत राहिली तिला सुद्धा अश्रू थांबवता येत नव्हते. दोघे भाऊ एकमेकांच्या अंगावर धावून जात होते.

बापाचे झालेले मोती बिं दूचे ऑ परेशन व आईला आलेला झ टका आणि त्यासाठी खर्च केलेला पैसा या दोघांनी सुद्धा बोलून दाखवला होता आणि हे सर्व ऐकून म्हाताऱ्या दुर्पा आणि शिवाचा जीव तीळ तीळ तुटत होता आणि त्यानंतर धाकला मुलगा बोलू लागला, माझ्याकडे आई असुदेत, त्याने माझ्या पत्नीला थोडी मदतच होईल. मी पण हेच बोलणार होता मोठा मुलगा म्हणाला.

माझ्याकडे बा असूदेत, मी कामाला गेल्यावर चिन्या आणि पिंकीला शाळेत तरी सोडतील, येताना काहीतरी कालवण करायला घेऊन येतील आणि दळण पण आणतील. धाकट्या मुलाने आई आणि मोठ्या मुलाने बाप असे वाटून घेतले होते, त्यांचं बोलणं ऐकून तर दुर्पा मोठ्यानेच र डू लागली होती. आता शिवा पण हळवा झाला होता, एव्हढा वेळ धरलेला संपूर्ण धीर सुटला होता. तो अधिकच मोठ्याने र डू लागला.

आत उभी असलेली मोठी सून लगेच बाहेर आली आणि तिच्या सासऱ्याचे पाय धरून खूप रडू लागली. सर्व काही वाटण्या झाल्या आणि त्या नंतर सरपंचाचा निर्णय आला, जस पोरांनी सांगितल आहे तसेच होईल, ते पुढे बोलतच होती की कुठूनतरी लहान सून येऊन त्यांच्या समोर उभी राहिली, ती अतिशय रा गात दिसत होती, तिला बघून सगळेच अवाक झाले होते.

ती रागानेच सगळ्यांना म्हणाली आई वडील म्हणजे काय वस्तू आहेत काय त्यांच्या वाटण्या करायला? तुम्हाला त्याच्यासोबत राहायचे नसेल तर तुम्ही दोघे खुशाल बाहेर व्हा मी आणि जाऊबाई दोघी आमच्या सासऱ्यांना सोडून कोठेही जाणार नाही. आम्ही लग्न करून आल्यापासून त्यांनी आम्हाला त्याच्या लेकी सारखीच माया लावली आहे.
त्यामुळे आम्ही आमच्या आई-बाची वाटणी होऊ देणार नाही.

असा म्हणून तिने आणि मोठ्या सुनेने आपल्या नवऱ्यानसमोर घटस्फो टाचा कागद धरला. ते पाहून तिथे असलेली सगळीच मंडळी आवक झाली. असा प्रसंग आजपर्यंत कधीच कोणाला बघायला मिळाला नव्हता. त्यामुळे सगळेच ताडकन उठून उभे राहिले. आम्ही आमच्या आत्या आणि मामांच्या चरणीच सदैव राहणार आहोत, ती अस म्हणाली आणि त्याचं क्षणी आत बसलेली तिची सासू लगबगीने बाहेर आली आणि तिने या दोघींनाही जवळ घेत कुरवाळल.

तुम्ही आमच्या सूना नाहीत लेकीच आहात. आज त्या दोन्ही सुनांच्या डोक्यावरून हात फिरवत असतानाच म्हातारीच्या थकलेल्या पापण्यांमधून अलगद अश्रू तरळले. आणि मोतीबिं दू झालेले त्यांचे सुंदर डोळे मात्र आनंदाने भरले होते. दुसरीकडे बराच वेळ आपल्या मर्यादा ओलांडून आपापसात वा द घालणारे दोन्ही भाऊ आपली मान खाली करून शांतपणे एका बाजूला उभे राहिले होते.

आज त्यांच्या दोन्ही सुनांनी मिळून ही गोष्ट सिद्ध केली होती की भूतकाळातील काही गृहीतके चुकीची सुद्धा असू शकतात. सूनांमुळेच अनेक कुटुंबे तु टतात आणि विभक्त होतात, हा समज आज या दोन्ही सुनांनी साफ खोटा ठरवला आहे. दोन्ही पोरांचे चेहे काळवंडले होते. दुर्पा मावशी मात्र आपल्या दोन्ही सुनांना कुशीत घेऊन हमसून हमसून र डत होती, म्हातारा शिवा आपल्याला हा दिवस बघायला मिळाला म्हणून आभाळाकडे बघत देवाचे आभार मानु लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *