घटस्फो ट घेऊन वेगळी राहिलेली या बाईचे झालेले हाल पाहून धक्का बसेल!…रोज रात्री तिची अवस्था..त्यामुळे ती

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, भावाने सिमेंटची एजन्सी घेऊन दिली त्यातून महिन्याला पाच साडेपाच लाख निघतात. नगर हायवेला पाच गुंठे जागा आहे. तिथं चाळीस फ्लॅटची स्कीम सुरु केलीये. शिवाय मगरपट्ट्यात थ्री बीएचके फ्लॅट घेतलाय. सातारा रोडवर दोन गाळे आहेत एक गाळा टुव्हीलरच्या शोरुमला दिलाय, दुसरा गाळा ज्वेलर्सला दिलाय त्याचे पण महिन्याला लाख दीड लाख रुपये मिळतात.

असं सांगत स्नेहानं चहाचा घोट घेतला आणि रिमझिम पावसाच्या थेंबाकडं शांत पाहू लागली. काल संध्याकाळी कॉलेजची मैत्रीण भेटली होती. नऊ वर्षापूर्वी तिचा घट स्फो ट झाला तेव्हापासून एकटीच. पोटगीतून मिळालेले पैसे आणि भावाच्या पैशातून पैशाचं अफाट सा म्राज्य उभं झालं. काल अचानक फोन आला आणि म्हणाली भेटायचय. कॉलेजमध्ये असताना आम्ही कॉलेज समोरच्या टपरीवर चहा प्यायचो तिथं जाऊन थांबलो.

तीस लाखाच्या आलिशान गाडीतून आली आणि टपरी शेजारच्या बाकावर बसली. घ टस्फो ट झाल्यानंतर उभे केलेले पैशाचे किस्से तिने अभिमानाने सांगितले आणि शांत झाली. त्यापुढं तिच्याकडं सांगण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणाली, ‘प्रितीचं काय सुरु आहे ?’ म्हटलं, तिचा नवरा एमआयडीसीत जॉब करतो. दोन मुलं आहेत तिला.’ ‘ज्योती कशी आहे ?’

म्हणलं, ‘तिचा नवरा एलआयसी पॉलिसी विकतो. धनकवडीत वनरुम किचनमध्ये राहते. एक मुलगी आहे तिला.’ ‘रोहित कसा आहे ?’ ‘त्याचा अपघा त झालता मागच्या महिन्यात, पाय मोडला. पण, बायको चांगली भेटलीये त्याला बिचारी जॉब करत सांभाळतीये त्याला.’ ‘मायाचाही संसार छान सुरु आहे ना ?’

म्हणालो, ‘हो. म्हणजे तिचा झाला होता घ टस्फो ट. पण, नंतर तिने दुसऱ्या जातीच्या मुलासोबत लग्न केलं. आता सुखाने सुरु आहे सगळं.’ घट स्फो टाचा विषय निघाला तशी तिच्या ज खमेवरची धपली निघाली. आवाज गहीवरला. म्हणाली, ‘मी घ टस्फो ट घेऊन चुक केली का रे ? पण, माझं नव्हतं पटत नवऱ्यासोबत. मी घट स्फो ट घेतला तेव्हा मला मुक्त झाल्यासारखं वाटलं. भाऊ म्हणाला बिझनेस कर.

मी केला. आई म्हणाली जातीतला मुलगा शोधू. मी थांबले. वडील म्हणाले पैशावाला पोरगा शोधू. मी थांबले. पण, जातीतला श्रीमंत पोरगा शोधायच्या नादात आयुष्याची वाळू हातातून निसटून चाललीये याचा अंदाजच आला नाही. माझ्या भावाचं लग्न झालं, चुलत भावांची लग्न झाली. चुलत बहीणींची लग्न झाली. आता तर मोठ्या बहिणीच्या पोरी लग्नाला आल्या, तरी माझ्या आयुष्याचं गणित मला उलगडलं नाही.’

डोळे टिपत तिने दीर्घ उसासा टाकला आणि म्हणाली, ‘खर सांगू नितीन, मी पैशांच्या घोंगडीत स्वतःला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतीये रे. अफाट पैसा दाखवत मी किती सुखी आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतीये. पण माझं मन वे दनांनी किती भुसभुशीत झालय, हे मलाच माहिती. अरे मी नवऱ्याला घ टस्फो ट दिला त्यानंतर त्यांन वर्षभरात लग्न केलं आणि तो आता सुखाने राहतोय.

तो एमआर म्हणून जॉब करतोय, त्याची बायको कंपनीत अकाऊंटट म्हणून काम करतीये. ते दोघं नवराबायको महिन्याला जेवढे पैसे कमावतात, तेवढा पैसा मी दिवसाला कमावते. तरीही मी समाधानी का नाही ?’मी काहीच बोललो नाही. तीही शांत झाली. तिच्या मनातली सगळी मळमळ बाहेर पडली. बहुतेक तिला हलकं वाटलं. म्हणाली, चल मी तुला घरी सोडते. तीस लाखाच्या गाडीत बसायचं म्हणजे सुख असतं.

मी बसलो, पुन्हा ती तिच्या आर्थिक यशाची कहाणी सांगू लागली. तिच्या पैशांच्या लाटांवर मीही स्वार होऊ लागलो. एवढा पैसा स्वप्नवत वाटत होता, घरापशी आलो बायको जेवणासाठी थांबली होतीच. बायकोची आणि तिची ओळख करुन दिली. दोघींनी पंधरा मिनिट छान गप्पा मारल्या. अखेर स्नेहा तिच्या घराकडं निघाली.

ती गेली तसे आम्ही नवरा बायको अवाक होऊन तिच्या पैशाविषयी बोलू लागलो. ‘लाईफ हो तो ऐसी हो’ असं म्हणत असतानाच तिचा फोन आला. अन म्हणाली, नितीन छान चाललय रे तुझं. ‘लाईफ हो तो ऐसी हो’ मी काही न बोलता फोन ठेऊन दिला. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणिशे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *