गांधारीने एकाच वेळी १०० कौरवांना कसा जन्म दिला…यासाठी गांधारीने काय केले होते…रहस्यमय कथा एकदा पहाच

धार्मिक

महाभारत हे महाकाव्य असून, हिं दू ध र्मातील तो एक प्रमुख ग्रंथ मा नला जातो. तसेच आपल्याला माहित असेल कि १८ दिवस महाभारताचे सुद्ध सुरू होते. ध र्म आणि अध र्म या तत्त्वांवर हे यु द्ध लढले गेले. तसेच अनेकांना या यु द्धात प्रा ण देखील गमवावे लागले. महाभारतातील अनेक व्यक्ती आणि घटना अशा आहेत, ज्यांबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही.

कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात तुंबळ यु द्ध होऊन पांडवांचा विजय झाला. तर मूळ महाभारताबद्दल जाणून घेताना सर्व पांडवांच्या नावांचा वारंवार उल्लेख होतो. परंतु सर्वच कौरवांच्या नावांचा उल्लेख होत नाही. महाभारतानुसार राजा धृतराष्ट्र यांना १०० पुत्र होते, हे सर्वांनाच माहिती असेल परंतु यांचा जन्म कसा झाला आणि यांची नावे काय होती. हे फार कमी लोकांना माहिती असावे.

नमस्कार मित्रांनो, गांधारी ही मूळची गांधार (म्हणजे हल्लीचा अफगाणिस्तान) या देशाची राजकन्या होती. (म.आदिपर्व ९०.६१). गांधार देश भारताच्या वायव्य दिशेला होता, त्याची तक्षशिला ही राजधानी होती. आज गांधारचा कंदहार असा अपभ्रंश झाला आहे. बाल्यकाळातच गांधारीने रूद्राची आराधना करून शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते.

हिच्या वरप्राप्तीची ही हकीकत ऐकूनच भीष्मदिकांनी हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी तिला मागणी घातली. कुरुवंशातील संततिहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता (म.आ.१०३. ९-१०). महाभारतातील पितामह भीष्म यांनी गांधारच्या सुबल नावाच्या राजापुढे धृतराष्ट्र आणि कन्या गांधारी यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला.

हा प्रस्ताव गांधार राजपुत्र शकुणीला पसंत पडला नाही. गांधारीला आंधळ्या धृतराष्ट्रासाठी मागणी घालून भीष्मांनी गांधारचा अपमा न केला असे त्याला आयुष्यभर वाटत राहिले. परंतु गांधारीने हा विवाह प्रस्ताव स्वखुशीने मंजूर केला व धृतराष्ट्रा प्रमाणेही स्वतःलासुद्धा दृष्टीची देणगी नाकारली व तिने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून आयुष्य व्यतीत केले.

महाभारतानुसार राजा धृतराष्ट्र यांना 100 पुत्र होते, हे सर्वांनाच माहिती असेल परंतु यांचा जन्म कसा झाला आणि यांची नावे काय होती. हे फार कमी लोकांना माहिती असावे. आज आम्ही तुम्हाला याविषयी खास माहिती देत आहोत. एके दिवशी महर्षी वेदव्यास हस्तिनापुरात आले. गांधारीने त्यांची खुप सेवा केली. महर्षी व्यास यांनी गांधारीवर प्रसन्न होऊन त्यांनी गांधारीला शंभर पुत्र होतील असे वरदान दिले.

काही काळानंतर गांधारी ग रोदर राहिली. महिने जात होते, नऊ महिन्यांचे दहा महिने झाले, अकरा महिने झाले परंतु काहीच झाले नाही. गांधारी अस्वस्थ होत होती. बारा महिन्यांनंतरही गांधारी मुलांना जन्म देऊ शकत नव्हती. गांधारीला वाटले मुलं जी वंत आहे की नाही, असे का होत आहे. शेवटी हताश होऊन तिने पोटावर वा र केले आणि ग र्भ पाडला.

तिच्या पोटातून लोखंडासमान मां साचा एक पिंड बाहेर पडला. महर्षी व्यास यांनी ही पुर्ण घटना दिव्य दृष्टीने पाहिली. यानंतर ते गांधारी जवळ गेले आणि म्हणाले की, मासाचे ते पिंड माझ्याकडे घेऊन ये. त्यांनी गांधारीला सांगितले की, तु तात्काळ शंभर कुंड तयार करुन त्यांना तुपाने भरुन टाक आणि दोन वर्षांसाठी ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था कर..

गांधारीच्या आज्ञेनुसार सेवकांनी सर्व तयारी केली. महर्षी व्यास यांनी त्या पिंडावर जल टाकले तेव्हा त्याचे एकशे एक तुकडे झाले. जे दोन वर्षांसाठी एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्याच मां साच्या पिं डामधून शंभर कौरव आणि एका कन्येचा जन्म झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *