खूप वर्षांनी मुलाला भेटायला आई शहरात गेली, पण मुलासोबत जे घडले ते पाहून…प्रत्येक व्यक्तीने वाचावा असा लेख..

लाईफ स्टाईल

सुरेश विमलाबाई म्हणजे आपल्या आईला बस मध्ये बसवून नुकताच घरी आलेला. तिच्या जाण्याने घर कसे अगदी सुने सुने वाटत होते जणू घरचा प्रा णच निघून गेला. माय दुपारी आली काय थकल्या भागल्या श रीराने आपल्याला जेऊ खाऊ घातले काय, रात्रभर आपण तिच्याशी गप्पा काय मारल्या आणि आज पहाटेच ती गावाकडे गेली सुद्धा.. हे सगळेच त्याच्यासाठी एका स्वप्नापेक्षा कमी नव्हते.

शनिवारची निवांत दुपार सुरेश एकटाच घरात ऑफीस काम करत बसला होता. शुभदा, सकाळीच तिच्या आईकडे गेली होती तिच्या आईची त ब्येत अचानक बिघडल्यामुळे..अचानक दारावरची बेल वाजली, एवढ्या दुपारी कोण आल असेल असा विचार करतच सुरेशने दरवाजा उघडला, तर दारात समोर चक्क त्याची माय उभी होती. तिला बघून त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिच्या हातातली पिशवी घेत त्याने तीला विचारलेच.

माय त? आत्ता इथे कशी काय? बापूने तुला एकटीला सोडलच कस ? आणि तुला घर सापडलं कस? कधी निघाली होतीस ? आणि मला फोन का नाही केला? या सगळ्या प्रश्नांच्या सरबत्तीला तिने फक्त एक छान गोड स्मितहास्य केलं. सुरकुतलेल्या चेहऱ्याची माय हसताना जरा जास्तच सुंदर वाटली आज त्याला. त्याने हसून मायला मिठी मा रली. तिने देखील लेकराला छातीशी घटत कवटाळले. असेच काही क्षण निघून गेल्यावर मायने आपल्या पोराच्या गालावरून बोटे फिरावून कडकडा मोडली.

पाणावलेल्या डोळ्यांनी माय लेक एकमेकांना बघत राहिले. सुरेश तिच्याकडे पाहता पाहता त्याच्या भूतकाळात गेला. त्याचा बापू फार कडक स्वभावाचा होता. माय जर खं बीर नसती तर आज सुरेशच आयुष्य खूप वेगळ असत. त्याच्या प्राथमिक शिक्षणानंतर त्याला शिकायला मुंबईला मामाकडे मायने पाठवले होते. त्याची मायला सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तिने सांगितले इथे राहशील तर वा ईट संगतीत राहून बि घडशील, त्यापेक्षा शिकून मोठा साहेब झालास तर माझ्या आयुष्याच सार्थक होईल.

सुरवातीला सुट्टीत तो गावी जात असे. बापूचे दा रू पिणे, जु गार खेळणे, त्यामध्ये पैसे हरणे सगळे तसेच चालू होते, माय आपली हाती लागतील त्या पैशातून आपला संसार कसाबसा रेटत होती. पुढे त्याने गावी जाणे बंद केल, मामा मामीनी शिकायल खूप मदत केली. पुढे कॉलेज करत असताना छोटी मोठी नोकरी करत स्वतःच्या पायावर उभा राहू लागला. पुढ एका चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळाली. तिथेच शुभदाशी त्याची ओळख झाली.

साधी सरळ सिंधी मुलगी. दोघेही सारख्याच परिस्थितून पुढे आलेले. त्यामुळे दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याच ठरवलं. गावी गेल्यावर सुरेशने आपल्या मायला हे सगळ सांगितलं. मायने तेंव्हाच सांगितलं, बापु जवळ हा विषय नको काढू त्याने तुझा सौ दा करायचा ठरवला आहे. बडी बडी पैशेवाल्या पोरींची स्थळे त्याने तुझ्यासाठी बघून ठेवलेत. सुरेश काय समजायचं ते समजून गेला.

त्याने शुभादशी को र्ट मॅरेज करूनच गाव गाठल. त्याच्या बापूला हे समजताच त्याने दंगा केला. गावातापली इज्जत घालवली म्हणून आरडा ओरड केली. मायने आपल्या सुनेला डोळेभरून पहिले देखील नाही, तोच बापूने दोघांना बाहेर हाकलून दिले. नवी नवरी आल्या पावली परत गेली. सुरेश अधून मधून बापूला भेटून बोलायचा प्रयत्न करत असे, पण बापू कधीच ऐकला नाही. तो स्वतः तर कधी सुरेश कडे आला नाहीच त्याने मायला सुद्धा शपथ घालून ठेवली तिने त्याच्याकडे जाऊ नये म्हणून.

नंतर सुरेश कधीच गावी गेला नाही. गावचा मुलगा रामू त्याच्या घराजवळच राहत होता, त्याच्याकडून माय्साठी एक फोन पाठउन दिला बापूला न कळत मी त्याच्याशी बोलत असे. तेव्हा प्रत्येक वेळी तिला इकडे येण्यासाठी मनवित असे, पण बापूच्या धाकाने ती मनात असून सुद्धा ती कधीच तयार होत नसे. असे असताना आज अचानक माय आपल्याकडे आली, याचा त्याला प्रचंड आनद झाला होता. रात्रभर माय लेकरु गप्पा मा रत बसले होते.

सुरेश मायच्या मांडीवर डोकं ठेऊन शांत झोपला होता. पहाटे केंव्हातरी त्याला झोप लागली. सकाळी घड्याळाच्या गजराने तो अचानक जागा झाला. पाहतो तर माय आवरून बसली होती, त्याला आश्चर्यच वाटल, आल्यासारखी चार दिवस राहा तरी, लेकाचा संसार बघून तर घे म्हणून तो तिला थांबण्यासाठी मनवू लागला, पण ऐकेल ती माय कसली? तिने सांगितले बापूला माहित नाही मी इकडे आलेली, एका लगीनघरी कामाला चालली आहे असा सांगून आले आहे.

आज घरी पोचले नाही तर बापू अख्खा गाव डोक्यावर घेईल. असा म्हणून ती चप्पल पायात चढवून निघाली सुद्धा. तिला बस मध्ये बसवायला सुरेश तिच्या मागोमाग गेला. मायला बस मध्ये बसवून सुरेश घरी येताच त्याला गजू काकांचा फोन आला, अरे सूरयाकुठे आहे तू? मी कधीचा तुला फोन करत आहे? त्यांचा आवाज ऐकून सुरेश थोडा गोंधळला. मायला बसमध्ये बसवून आत्ताच घरी आल्याचे त्याने सांगितले,

तसे काकांचा आवाज एकदम बदलला. अरे वेडा आहे का तू? काल तुझ्या घरासमोरून जात होतो, दरवाजा उघडा दिसला म्हणून आत गेलो, तुझा बापू पि ऊन पडला होता, बाजूला माय पडलेली दिसली म्हणून बापूला उठवलं, त्याने सांगितल तुझ्याकडे यायचं म्हणून दोघात लई भां डण झाल, शेवटी शपथ घालून बसवलं तेंव्हा शांत बसली, मला वाटल झोपली असेल म्हणून मी पण लक्ष नाही दिल. आता मी गावातल्या डॉ क्टरला बळावल तर त्याने सांगितलं काल दुपारीच ती गेली.

सुरेशला त्याच्या पुढच काहीच ऐकू आल नाही. त्याच्या डोळ्यासमोर आता अंधारी आली होती. त्याला आता सर्व जाणवायला लागले, माय दुपारी एकटी आली, माझ्याशी बोलली हे सगळे भास होते, तिची भेटण्याची इच्छा तिने आपले श रीर सोडल्यावर पूर्ण गेली आणि आता बसमध्ये बसून ती अखेरच्या प्रवासला निघून गेली, पुन्हा कधी परत न येण्यासाठी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *