खट्याळ सासूची खोड सुनेने कशाप्रकारे जिरवली बघा..सुनेला सारखी विचारत असे माहेरून काय आणलं? एक सत्य घटना !

लाईफ स्टाईल

उद्या रक्षाबंधनासाठी माहेरी जाण्यासाठी शितल लगबगीने आवरू लागली. संध्याकाळी ती माहेरी पोहोचली. रक्षाबंधनाचा दिवस उजाडला. शीतल ने आपल्या भावाला ओवाळले. आणि जेवण करून निघणारच इतक्यात तिने आईला उसने पैसे घेताना पुन्हा पाहिले. ते पाहून तिचा पारा वर चढला. सणासाठी माहेरी आलेल्या पोरीला त्या आईला भरल्या हाताने माहेरी पाठवायचं होतं.

पण पैशांची अडचण, घरची परिस्थिती जेमतेमच. काय करणार? उसने घेण्याशिवाय पर्यायच नव्हता. मागच्यावेळी सासरी घेऊन गेलेल्या साडी वरूनचा वा द शितलच्या मनात आजही घुमत होता. सासरी गेल्यानंतर माहेरून काय आणले हा प्रश्न आजही तिला हमखास विचारला जायचा! या सर्वांना वैतागलेल्या शितलचा पारा आणखीनच चढला होता.
आईने दिलेले पैसे परत तिच्या हातात ठेवत शीतल म्हणाली, यावेळी पासून मी तिकडे काहीही नेणार नाही. एखादा कापडाचा तुकडा सुद्धा मी नाही नेणार. आई म्हणाली, अग पोरी असं करू नको. तिकडे गेल्यावर सगळेजण हेच विचारणार काय आणले म्हणून? त्यावेळी तू काय सांगणार? आणि हे सर्व रितीरिवाज करणे आमचे कर्तव्य आहे.

हे करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तू काहीही काळजी करू नकोस. तू जर हे पैसे नेले नाहीस तर तुला तिकडे सगळी नको नको ते बोलतील. आईच्या डोळ्यात पाणी आले होते. शीतल म्हणाली, अग आई तू काळजी करू नकोस. मी जे सांगायचं ते सांगेन योग्य पद्धतीने. तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही कर्ज काढून माझी हौस मौज करणार हे मला तरी पटेल का? मलाच हे योग्य वाटत नाही.

घरात एवढी पैशांची अ डचण आणि चणचण असताना तुम्ही मला उसने पैसे आणून देता. मला हे अजिबात पटत नाही. हे सर्व सांगून शीतलने आई-वडिलांचा आणि भावाचा निरोप घेतला. आता सासरी आल्यावर पुन्हा तेच. घरात पाउल ठेवते का नाही तोच सासूने प्रश्न केला, काय आणले? शितल शांतपणे घरात आली. येऊन पहिला पाणी पिले. रूम मध्ये बॅग ठेवून खुर्चीमध्ये शांतपणे बसली.

ती सासूला म्हणाली, यावेळी मी खूप काही आणले आहे. खूप सार्‍या मौल्यवान वस्तू आणले आहेत. हे ऐकून सासू खूपच खुश झाली. आणि उत्सुकतेने लवकर दाखव असे शितलला म्हणू लागली. आता शीतलने बोलायला चालू केले. इतके दिवस आत मध्ये दबलेले शब्द आणि राग आता बाहेर पडू लागला होता. ती सासूला म्हणाली, मी या मौल्यवान गोष्टी तर लग्न करून या घरात आले तेव्हाच आणल्या होत्या.

सासूला काही समजले नाही. ती विचार करू लागली, हिने त्यावेळी जर काही आणले तर मला का दाखवले नाही? कुठे लपवून ठेवली असेल का तिने? सोने असेल का? काही दागिने असतील का? असे बरेच प्रश्न सासूच्या डोक्यात येत होते. सासूचा विचार भं ग करत शितल म्हणाली, मी जे आणलं ते तुम्हाला दुर्दैवाने कधीच दिसलं नाही. तर ऐका, मी आणले सुसंस्कार. जे पुढच्या पिढीला चांगले घडवतील.

मी आणले माझ्या आई कडून सुगरणीची कला, आजीकडून कष्टाळू आणि अनुभवाची खान, वडिलांकडून सत्यनिष्ठा, भावाकडून सेवावृत्ती. हे सर्व संस्कार सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांपेक्षा कितीतरी मौल्यवान आहेत. आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे ही. जी कोणत्याही वस्तू पेक्षा श्रेष्ठ आणि वरचढ आहे. असे हे मोत्याहून सुंदर संस्कार, ज्याची कोणत्याही वस्तूशी तुलना होऊ शकत नाही.

हे सर्व आणले आहे मी माझ्या माहेर कडून. हे सर्व ऐकून शितलच्या सासूची बोलतीच बंद झाली. तिने शीतलला फिरून परत कधीही प्रश्न विचारला नाही की माहेरहून काय आणले? सासूने शीतलची माफी मागितली. आणि तिला माहेरून वस्तू आणण्याबद्दल कधीही जोर जबरदस्ती आणि त्रा स केला नाही. स्त्री आपले आई वडील, आपले माणसे, सोडून सासरी येते.

केवळ सासरच्या माणसांसाठी. आपले सर्वस्व सोडून येते. आपली सर्व स्वप्ने, इच्छा-आकांक्षा, यांचा त्याग करून कशाचाही विचार न करता केवळ सासरच्या लोकांसाठी ती आई-वडिलांना परकी होऊन जाते. या सर्व गोष्टीं पुढे कोणतीही वस्तू अतुलनीय आहे. यापेक्षा मोठं काय हवय आपल्याला? आणि हे लक्षात ठेवा सासू देखील एकेकाळी सून होती. त्यामुळे सासुंनी सुनेशी अगदी मुली प्रमाणेच वागावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *