कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी या ”दहा” गोष्टी घ्या पहिला जाणून…अन्यथा भविष्यात कराल खूप मोठ्या अडचणींचा सामना

लाईफ स्टाईल

आपल्याला एखादी जमीन खरेदी करायची आहे तर त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी आपल्याला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर नंतर त्यात खूप अ डचणी येऊ शकतात. आपल्यावर पश्चातापाची वेळ येण्याआधीच जाणून घ्या या काही महत्त्वाच्या गोष्टी….

आज सुद्धा जमीन खरेदी-विक्री चा व्यवहार गु प्तपणे आणि अगदी पटकन करण्याचा दोन्ही पक्षाचा हेतू असतो. आपल्याला जमिनीचा चांगला भाव मिळत आहे, जमीन घेणारी व्यक्ती व्यवहारात नवीन आहे त्यामुळे त्याला हक्क व वारस यांची फारशी माहिती नाही अशा बर्‍याच कारणांमुळे हे व्यवहार गु प्त आणि झटपट केले जातात.

पण प्रत्यक्षात जमीन मालकी ह क्काची नोंद होते त्या वेळी अ डचणी निर्माण होऊ शकतात. आणि मग त्यामध्ये वारसा ह क्क, कायदेशीर व्यवहार न होणे, द बावाने होणारी विक्री, पैसे कमी मिळणे ,ठरलेल्या व्यवहारापेक्षा नंतर पैसे जास्त मागणे तसेच राजकीय आणि सा माजिक कारणांमुळे नोंद करण्यामध्ये अडवणूक असे बरेच प्रकार घडू शकतात….

तर असे आपल्या बाबतीत देखील घडू नये यासाठी खाली दिलेल्या गोष्टी काळजीपुर्वक वाचा आणि मगच व्यवहार करा. जमीन खरेदी करण्यापूर्वी कोण कोणत्या गोष्टी तपासून पहाव्यात? 1-जी जमीन खरेदी करायची आहे तिथला चालू सातबारा उतारा काढावा. त्यावर नोंद असणाऱ्या जमीन मालकांची नावे पहावीत. जमीनीच्या इतर हक्कातील नोंदी तपासून घ्याव्यात. जमिनीवर बँकेच्या सोसायटीचा कर्जाचा बोजा आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

2- सदर जमीन विक्री करणाऱ्याच्या नावावर कशी झाली आहे हे पाहण्यासाठी किमान तीस वर्षापासून च्या सर्व फेरफार नोंदी तपासाव्यात. 3- जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का? जमीन ही प्रत्यक्ष मालकाच्याच वहिवाटीत आहे का? जमीन नावावर असलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष ताब्यात असलेले क्षेत्र यांच्यामध्ये त फावत आहे का? हे सर्व तपासून पहावे.

४- सातबारा उताऱ्यावर असलेली किंवा तोंडी सांगितलेली विहीर, झाडे इत्यादींबाबत प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करून घ्यावी. 5- जमीनीच्या इतर हक्कांमध्ये कुळ किंवा अन्य व्यक्तींचा ह क्क आहे का? जमिनीच्या व्यवहारामुळे इतर लागू असलेल्या का यद्यांचा भं ग होतो का? हे सर्व पाहून घ्यावे. 6- वहिवाट रस्ता, झाडे, पाट, पाणी पाईप लाईन. हे सर्व हक्क कसे आहेत याची खात्री करून घ्यावी.

7- भारतीय का यद्यानुसार 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मिळकतीबाबत व्यवहार हा रजिस्टर असावा लागतो. म्हणजे जमीन व्यवहार रजिस्टर असला तरच तो का यदेशीर ठरतो. 8- खरेदीखत लिहिते वेळी त्यातील मजकूर हा तज्ञ, व कील किंवा माहितीगार यांच्यामार्फत केल्यास भविष्यात अ डचणी येत नाहीत. 9- खरेदीखतामध्ये सामायिक विहीर, झाडे, वहिवाट, पाण्याचा साठा, फळझाडे, बांधावरील झाडे, रस्ते, घर इत्यादींबाबत स्पष्ट उल्लेख नाही हे तपासून घ्यावे.

10- व्यवहाराने ठरवलेली जमिनीची रक्कम कशी दिली जाणार आहे त्याप्रमाणे व्यवहार व त्याचा उल्लेख खरेदीखतात यावा. 11- खरेदी वेळी असणारे साक्षीदार हे खात्रीचे आणि नंतर न पलटनारे असावेत. दिलेला शब्द पाळणारे असावेत. त्या साक्षीदारांचा ओळखीचा पुरावा म्हणून त्यांच्या म तदान ओळखपत्राचे झेरॉक्स बरोबर असावे.

12- व्यवहार रजिस्टर करण्यासाठी शा सन नियमांचे स्टॅ म्प ड्युटी व नोंदणी फी भरावी. 13- प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मागील महिन्याच्या झालेल्या व्यवहाराची माहिती रजिस्टर कार्यालयातून तहसीलदार व नंतर तलाठ्याकडे जाते. समजा जर तलाठ्याकडे ही माहिती आली नसेल तर स्वतःहून त्यांच्याकडे खरेदीखताची प्रत जोडून अर्ज करावा.

14- तलाठी यांच्याकडे अर्ज सादर करताना खरेदीखता सोबतच खरेदी केलेल्या जमिनीचे सातबारा 8. अ. चे उतारे व विक्री करणाऱ्या मालकांचे पत्ते द्यावेत. अर्ज दिल्यानंतर त्याची फेरफार नोंद लिहितात. 15- फेरफार नोटीस सं बं धितांना देण्यात येते. यामध्ये खरेदी दिनांक, गट क्रमांक, क्षेत्र, आकार, दस्त क्रमांक, सर्व व्यक्तींची नावे यामध्ये अचूकता आहे की नाही हे तपासावे.

16- नोटीस पाठवल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येतो. कोणत्याही प्रकारची कोणाची हरकत आली नाही तर मंडळ अधिकारी पंधरा दिवसानंतर नोंद प्रमाणित करतात. त्यानंतर ते नोंदणीकृत खरेदी खतवरून पडताळून पाहिले, सं बं धितांना नोटिसा रुजू, नंतर हरकत नाही असा शेरा देतात.

फेरफार नोंद प्रमाणित झाल्यानंतर लगेचच 7/12 नोंदीची कार्यवाही करण्यात येते. त्यात नावांची दुरूस्ती केली जाते. दुरुस्तीचा 7/12 व 8 अ चा उतारा प्राप्त झाल्यानंतर खरेदी नंतरची नोंदणी पूर्ण होते. तर मंडळी, शेतजमीन किंवा कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी वरील सर्व गोष्टी आवर्जून तपासून पहा. त्यामुळे नंतर कोणत्याही अडचणी येणार नाहीत. आणि पश्चातापाची वेळ सुद्धा येणार नाही. मित्रहो, या टिप्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *