हिमालयाच्या कुशीत असलेले केदारनाथ धाम हिं दू ध र्मामध्ये बारा ज्योतिर्लिं गापैकी एक विशेष असे स्थान मानले जाते. भगवान शंकराचे निवास्थान असलेले हे पवित्र धाम सहा महिने बर्फाने झाकलेले होते. पौराणिक ग्रंथांमध्ये याचे विशेष असे वर्णन केले गेले आहे.
या पवित्र धामा विषयी मी तुम्हाला विशेष माहिती, कथा सांगणार आहे. या कथेमध्ये असे सांगितले आहे की, शिवशंकरांनी पांडवांना आपले दर्शन दिले व नंतर पांडवांनी या शिवलिं गाची स्थापना केली. यास केदारनाथ धामाविषयी धा र्मिक ग्रंथांमध्ये कोणती माहिती, कथा सांगितली आहे हेच आपण आता जाणून घेऊयात…
पांडवा मधील युधिष्ठिर यांचा हस्तिनापूरचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. युधिष्ठिराने चार दशके हस्तिनापुर वर रा ज्य केले. नंतर श्रीकृष्णा बरोबर महाभारत युद्धाची पाच पांडवाबरोबर बोलणी झाली. त्यावेळेस श्रीकृष्णाला हेच पाच पांडव म्हणाले की मा रण्या बरोबरच मा रणे हा एक कलंक आम्हा बांधवांना लागलेला आहे. हा कलंक कसा दूर करायचा? हा प्रश्न त्यांनी श्रीकृष्णाला विचारला.
त्यावेळेस श्रीकृष्ण त्यांना म्हणाले तुम्ही जरी यु द्ध जिंकले असले तरी तुम्ही तुमच्या गुरुची, भावंडांची भावा बहिणींची ह त्या करून तुम्ही पाच जण दोषी ठरलात, त्यामुळेच हा कलंक तुम्हाला लागला. तोच कलंक जर तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही महादेवाचा आश्रय घ्या असे म्हणून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेले.
श्रीकृष्णाच्या या वाक्याने पाची पांडव चिं तेने त्र स्त झाले. त्यांना अधिक काळजी वाटू लागली. आपण आपला राजवाडा सोडून महादेवांच्या आश्रयास कधी जावे याचाच विचार पांडव करत राहिले. यातच त्यांना वासुदेव आपले आश्रयस्थान सोडून सर्वोच्च निवासस्थानी गेले आहेत हे कळले. त्यामुळे पांडवांना पृथ्वीवर राहणे हे अयोग्य वाटले.
आपले थोरले वडिल व काका विदूरही जंगलात गेले ही बातमी त्यांना समजली तर त्यांनी लगेचच परिक्षितच्या हाती कारभार सोपविला. आपल्याला सहाय्य करणारे श्रीकृष्ण देखील निघून गेले आहेत. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हस्तिनापुरसह द्रौपदीला घेऊन ते महादेवाच्या शोधात निघाले. पाच भावंडे द्रौपदी यांच्या सह भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी काशीला पोहोचले. परंतु त्यांना त्यांचे दर्शन झाले नाही.
शंकराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना शंकरांचे दर्शन झालेच नाही. ज्या ठिकाणी ते जातील त्या ठिकाणाहून महादेव गेलेले असायचे. पाच पांडव द्रौपदीसह भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी हिमालयात पोहोचले. महादेवांनी पांडव व द्रौपदी यांना पाहिले व ते लपून बसले. महादेव लपलेले आहेत ही गोष्ट युधिष्टिर यांच्या लक्षात आली. पाच पांडव द्रौपदी सह भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी पुढे सरसावले.
युधिष्ठिर त्यांना म्हणाले, आमच्या हातून पाप झाले आहे, त्याच पापाचे प्रायश्चित म्हणून तुमचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुमचे दर्शन घेतल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही. पांडव व द्रौपदी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पुढे जात असतानाच त्यांच्यासमोर एक बैल येऊन टक्कर देणार तोच भीमाने त्या बैलाचा सामना केला. बैलाने आपले डोके खडकांमध्ये घुसविले.
भीमानी त्या बैलाची शेपटी धरून त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. भिम जन्मा त्या बैलाचे शेपूट ओढीत होता ओढीत होता त्यावेळेस त्या बैलाचे ध ड डोक्यापासून वेगळे झाले. त्या धडाचे शिवलिं गामध्ये रूपांतर झाले. त्यानंतर काही क्षणातच त्या त्या शिवलिं गामध्ये भगवान शिव प्रकट झाले. भगवान महादेवांनी पांडवांची सगळी पापे माफ केली.
याचा पुरावा म्हणजे महादेव केदारनाथाच्या शिवलिंगात बैलाच्या पिल्लाच्या रूपात आहेत. भगवान महादेवांना समोर पाहून पांडवांनी प्रणाम केला आपली पापांपासून मुक्तता व्हावी अशी प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिवने यांना स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखविला. भगवान शंकर तेथून अदृश्य झाले पांडवांनी त्यात शिवलिं गाची पूजा करून तेथे शिवलिं ग स्थापन केले ते तीन शिवलिं ग केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध आहे.