देवाने या जगामध्ये स्त्री आणि पुरुषा याशिवाय आणखी एक जात बनवली आहे ती म्हणजे किन्नर. आपण या लोकांना अनेक समारंभ जसे लग्न किंवा जन्मदिवसावर पाहिले असेल. या लोकांना आपण खास करून मुलांच्या जन्मदिवशी पाहिले असेल. तसे तर अनेक लोक असे आहेत जे यांच्यापासून दूर राहणेच उचित समजतात.
पण हे देखील सत्य आहे कि किन्नरांना धा र्मिक ग्रंथांमध्ये खूपच सन्मानित केले गेले आहे. महाभारताच्या कथेनुसार, द्रौपदीसोबत लग्न झाल्यानंतर पांडवांनी तिच्या संदर्भात एक नियम केला होता त्या नियमाचे अर्जुनाने एकदा पालन न केल्यामुळे त्याला इंद्रप्रस्थमधून बाहेर काढून देण्यात आले होते. अर्जुनाला एका वर्षासाठी तीर्थयात्रेला पाठवण्यात आले.
तेथून निघाल्यानंतर अर्जुन उत्तर पूर्व भारतात गेले. तेथे त्याची भेट एका नागकन्या उलुपीबरोबर झाली. दोघे एकमेकांवर प्रेम करू लागतात. काही दिवसानंतर उलूपी आणि अर्जुन विवाह करतात. वि वाहानंतर काही काळाने उलुपी एका मुलाला जन्म देते. त्याचे नाव ती अरावन ठेवते. आपल्या मुलाच्या जन्मानंतर अर्जुन त्या दोघांना सोडून पुढच्या यात्रेसाठी निघून जातो.
अरावन नागलोकात आपल्या आईबरोबरच राहत असतो. तरुणपणी तो नागलोक सोडून आपल्या पित्याकडे येतो. तेव्हा कुरूक्षेत्रात महाभारताचे यु द्ध सुरू असते. त्यामुळे अर्जुन त्याला यु द्धासाठी रणभूमीत पाठवतो. महाभारताच्या यु द्धात एक अशी वेळ येते जेव्हा पांडवांना विजयासाठी काली मातेच्या चरणी स्वच्छेने एक नर ब ळी द्यायचा असतो.
त्यावेळी अरावन स्वतः त्यासाठी पुढे येतो. परंतु अरावन अवि वाहीत राहून ब ळी देणार नसल्याचे सांगतो. त्यावेळी सगळ्यांसमोरच स मस्या उभी राहते. आपली मुलगी दुस-याच दिवशी विधवा होईल म्हणून कोणीही त्याच्याबरोबर मुलीचा विवाह लावून देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे श्री कृष्ण स्वतः मोहिनी रूप धारण करून अरावनबरोबर विवाह करतात.
दुस-या दिवशी अरावत स्वतः आपले शी र काली मातेला अर्पण करतो. अरावनच्या मृ त्यूनंतर श्रीकृष्ण त्याचरुपात बराच काळ दुःख व्यक्त करतात. श्री कृष्ण पुरुष असून स्त्री रुपात अरावनबरोबर विवाह करतात. त्यामुळे स्त्री रुपातील पुरुष म्हणून ओळखळे जाणारे किन्नर ही अरावन देवतेशी एका रात्रीपुरता विवाह करत असतात. व त्यांनाच आराध्य देवता मानतात.
महाभारत काळामध्ये देखील सांगितले गेले आहे कि अर्जुनला देखील कोणत्यातरी कारणामुळे किन्नरचे रूप धारण करावे लागले होते. लोकांचे असे मानने आहे कि किन्नर कधी लग्न करत नाहीत पण असे नाही. किन्नर देखिल लग्न करतात. पण त्यांचे लग्न सामान्य लोकांप्रमाणे होत नाही. त्यांचे लग्न फक्त एका दिवसासाठी असते आणि दुसऱ्या दिवशी ते विधवा होतात.
तामिळनाडूमधील कूवगम गावात दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात 18 दिवस चालणारा उत्सव साजरा केला जातो. देशभरातून त्यासाठी किन्नर जमा होत असतात. सुरुवातीचे 16 दिवस गाण्यांवर नाचगाणे सुरू असते. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात वि वाहाची तयारी सुरू असते. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट सुरू असतो.
17 व्या दिवशी पुजारी 17 एक खास पुजा करतात. देवाला नारळाची भेट दिली जाते. यांच्या विशेष लग्नाच्या दिवशी पुजारीच यांना मंगळसूत्र घालतात. त्याला थाली म्हटले जाते. नंतर मंदिरात अरावनाच्या मूर्तीशी विवाह लावला जातो. अखेरच्या म्हणजे 18 व्या दिवशी कूवगम गावात अरावनाच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते.
नंतर ती मूर्ती नष्ट केली जाते. त्यानंतर नवरी बनलेले किन्नर त्यांचे मंगळसूत्र तो डून टाकतात. तसेच चेह-यावरील श्रृंगारही काढला जातो. नंतर ते विधवेसारखे पांढरे वस्त्र परिधान करतात आणि दुःख व्यक्त करतात. जसे श्रीकृष्णाने मोहिनी रूप धारण केले आणि अरावनसोबत लग्न केले. जेव्हा दुसऱ्या दिवशी अरावनचे बलिदान दिले गेले, तेव्हा श्रीकृष्णाने विधवासारखा शोक व्यक्त केला. या घटनेची आठवण करून किन्नर एक दिवसासाठी विवाह करतात आणि दुसऱ्या दिवशी विधवा बनून शोक व्यक्त करतात.