काळी_बायको_का_नको? गोऱ्या बायकोत असे काय विशेष असते..? तर पहा संपूर्ण लेख

लाईफ स्टाईल

प्रत्येकाला भुरळ घालणारे गोष्ट म्हणजे सौंदर्य. प्रत्येक माणसाचे सौंदर्याविषयीची मतं वेगवेगळी असू शकतात. माझा एक अक्षय नावाचा मित्र आहे. आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करतो. त्याला एक लग्नासाठी स्थळ चालून आल होत. त्याने ही गोष्ट माझ्या कानावर घातली. तो बोलला अरे तिचा फोटो पाहिला आहे. मी मुलगी काळ्या वर्णाची आहे. मला लग्न करायच आहे पण…..मला कळना झाले… त्या मुलीला पाहायला मी जाऊ का नको ?

मी बोललो, अरे हा तुझा खाजगी प्रश्न आहे. यात मी काही सुद्धा करू शकत नाही. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तो माझे मत विचारत होता. मी त्याला बोललो मला जरा वेळ दे…विचार करायला… कारण या विषयावर मत मांडणे म्हणजे हा एक सा माजिक प्रश्न होता. ऑफिस सुटल्यावर घरी गेलो. फ्रेश होऊन कॉफी हातात घेऊन गॅलरीत जाऊन मस्त हवेशीर वाऱ्याला बसलो. कॉफीचा एक घोट घेतल्यावर अक्षयचं बोलणं डोक्यात घोळत होतं.

मी लगेच त्याला कॉल केला. आणि म्हणालो बिनधास्त, डोळे झाकून लग्न कर, कशाची चिं ता नको करू, कारण आजकालच्या मुलांना बायको ही सुंदर, गोरी, स्मार्ट, मॉडर्न हवी असते. पण त्यांनी हा कधी विचार केला आहे का सुंदरताही शरीरावरून नाही तर स्वभावावरून कळत असते. आजकालच्या मुलांना तर हेच कळत नाही. आजकाल प्रत्येक तरुण-तरुणीना सुंदर बायको हँडसम नवरा हवा असतो.

मुला-मुलींनी फिल्म मधील हिरो हिरोईन पाहून सुंदरतेचे वेड लागले आहे. या फॅशनमुळे तर तरुणांना स्टायलिं गचे खुप वेड लागले आहे. सोशल नेटवर्किंग फेसबुक, इंस्टाग्रामच खुळ उतरता उतरत नाही. आपल्या स माजात अशी ही जोडपी आहेत की आपल्या बायकोला सावळ्या रंगावरून टोमणे मा रतात. मला तू पसंत नव्हतीस, पण आई वडिलांचा आग्रह होता म्हणून मी लग्न केलं. मुलांना जीन्स घालणारी मुलगी हवी.

पण काकूबाई गळ्यात पडल्यासारखं वाटतं, त्यांना पण सावळी असणं ह्यात तिचा तरी काय दो ष आहेत. आई-वडिलांच्या गुणसूत्रानुसार मुलांच्या चेहरे पटाची निर्मिती होते. एखाद्याला निसर्गाची देणगी म्हणून सुंदरता मिळते आणि त्याचं कौतुकही होतं. शाळेत असल्यापासून सुंदर आणि कुरूप या मधला भाव कळायला लागतो. एका घरात दोन मुली असतील आणि एक त्यातली सावळी असेल तर त्याची तुलना व्हायला लागते.

घरातील लोक आपल्या मुलींमध्ये तुलना करतात. अशा बोलण्यामुळे लहान वयातच सुंदर मुलीं द्वेष निर्माण होतो. आणि जसे त्या मोठ्या होतात तसे त्यांचा आ त्म विश्‍वास ढळतो. इतिहास साक्ष आहे अनेक ल ढाया आणि यु द्ध सौंदर्यवतींच्या प्राप्तीसाठी झाल्या. सौंदर्याच्या बळावर यश मिळते. तर कोणाला ते घातक बनतात. जेव्हा मुलगी वयात येते आणि जेव्हा तिला स्थळ येऊ लागतात तेव्हा फक्त आणि फक्त फोटो मध्ये सावळ्या रंगाचे आहे म्हणून तिला रिजेक्ट केले जात.

असं काही ते फोटो प्रदर्शनासाठी मांडले आहेत. जर एखाद्या मुलाने लग्न केलच सावळ्या मुलीशी तर तो तिची प्रॉपर्टी बघून करतो. आणि आयुष्यभर तिला ऐकाव लागत त्याने तिच्यावर उपकार केले. त्या मुलीपेक्षा पैसे व सोने महत्त्वाचे असतात. समजा एखादा गोर्‍यापान सुंदर शरीराच्या मुलीबरोबर लग्न केलं. आणि काही दिवसांनी तिचा अपघा त झाला. त्या अपघा तात तिचा चेहरा विद्रूप झाला. तर तो पुरुष त्या मुलीला आयुष्यभर साथ देईल का ?

तेच तर त्याने त्या मुलीचे शा रीरिक सौंदर्य पाहण्यापेक्षा तिचा स्वभाव, वागणे-बोलणे बघून लग्न केले असते. तर तिच्या अपघा तात विद्रूप झालेला चेहरा असताना देखील तो आयुष्यभर तिची साथ देऊ शकतो…. स माजात असे खूप कमी लोक आहेत जे शरीराचे सौंदर्य न पाहता मनाचे सौंदर्य पाहतात. आज स माजात गुणवत्ता व तिच्यातील टॅलेण्ट पाहणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे.

कॉलेज, ऑफिस, कार्यालय असो या सुंदर मुलींची वाह वाह करणारे लोक या स माजात आहेत. पण या स माजात सौंदर्याचा गैर फा यदा घेणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही. पण सौंदर्याला संस्काराची जोड हवी. फक्त मन पवित्र हवं. कोळशाच्या खाणीत सुद्धा हिराच सापडतो. सौंदर्य हे नश्वर आहे. सौंदर्य हे काही काळासाठी आहे. पण चांगला स्वभाव, चांगले संस्कार हे आयुष्यभर टिकून राहतात.

जो माणूस चांगल्या स्वभावाची जी वनसाथी शोधतो तोच यशस्वी ठरतो. सुंदरता तिच्या शालीनेतेत, नम्रतेत, मृदू बोलण्यात, आवाजात, मनमोहक हास्यात, तिच्या व्यक्तिमत्त्वात, आ त्मविश्वासात पाणीदार डोळ्यात, सावळ्या रंगात असते. कोणतीही सुंदरता मन चांगल असेल तर आणखी निखरते. शब्द मनाला आ त्म्याला जागृत करतात. ते कुठल्याही सोनी चांदीच्या वस्तू पेक्षा अधिक मौल्यवान असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *