काय!! २०३६ मध्ये भारतातील या राज्यात रंगणार ऑलिंपिकचा महासोहळा…हे राज्य लागले स्पर्धेच्या तयारीला…या राज्यांतच होणार… तर मग महाराष्ट्राचं काय…

लाईफ स्टाईल

खेळ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती स्पर्धा. वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धेमधून समजतं की कोणता खेळाडू एका विशिष्ट खेळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. आपल्या भारतामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातून वेगवेगळ्या उत्कृष्ट खेळाडूंची ओळख देशाला होते.

तसेच जगभरामध्ये देखील असे कितीतरी खेळाडू असतात आणि त्यांची सर्वोत्कृष्टता साऱ्या जगाला कळण्यासाठी, त्यांची ओळख साऱ्या जगामध्ये होण्यासाठी विविध खेळांचे आयोजन जागतिक पातळीवरती केले जाते. देशातील युवक भ क्कम आणि वैशिष्ट्यपूर्ण क्रीडा संस्कृती विकसित करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणारा प्रत्येक खेळाडू हजारो युवकांना खेळाकडे आकर्षित होण्याची प्रेरणा देतो.

अशा कौशल्यांना वाव देणारी जागतिक स्तरावरील स्पर्धा म्हणजे ऑलिंपिक स्पर्धा. इतिहासकारांच्या मते असे समजले जाते की, ऑलिंपिक खेळाची सुरुवात तीन हजार वर्षांपूर्वी झाली होती आणि त्यानंतर १८९६ मध्ये ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली. जेव्हा या स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळी पहिल्यांदा ग्रीस, फ्रान्स, इंग्लंड, भारत, जर्मनी सोबत आणखी १४ देश ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. विकसनशील देशांची मक्तेदारी असलेल्या ऑलिंपिक गेम्स चे भारतात आयोजन करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. सद्यस्थिती २०३२ पर्यंत ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद पक्के झाले असून १६ वर्षांनंतर भारताचे ऑलिंपिक आयोजनाची स्वप्नपूर्ती होऊ शकते. १८९६ पासून ऑलिंपिक स्पर्धा होत असून जगातील मा नाच्या स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीत भारताला प्रबळ दावेदार मा नले जात आहे.

येत्या काही महिन्यात भारतातील ऑलिंपिक गेम्सच्या योजना संदर्भातील चित्र स्पष्ट होईल. गुजरातमधील अहमदाबाद मध्ये ऑलिंपिक स्पर्धा घेण्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाने मंगळवारी ऑलिंपिक गेम्स नुसार स्पोर्ट्स आणि नॉन स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर एनालिसिससाठी टेंडर जारी केले आहे.

पुढील तीन महिन्यात या संदर्भात अहवाल तयार करण्यात येणार आहे. २०३२ साठीच्या ऑलिम्पिकसाठी पुढील महिन्यात दावा करता येणार आहे. २०२० च्या ऑलिम्पिक गेम्स या जपानमधील टोकियोमध्ये होणार होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदाच्या वर्षी होणार आहे. २०२४ ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस तर २०२८ मध्ये लॉस अँजेल्स येथे ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे.

२०३२ च्या ऑलिम्पिक यजमानपदाचा निर्णय जवळपास झाला आहे. ऑलिम्पिक कमिटीने ऑस्ट्रेलियाच्या ब्रिसबेनला पसंती दिली असून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या शेजारी असलेला गुजरात २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

त्यासाठीची तयारी गुजरात सरकारने सुरू केली आहे. गुजरातने २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक यजमानपदाची तयारी सुरू केली आहे. अहमदाबाद आणि गांधीनगर मध्ये यासाठी सोयी सुविधा उभारल्या जाणार आहेत. अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाने क्रीडा आणि क्रीडा व्यतिरिक्त सुविधा उभारण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

हे काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कंत्राटदारांना ऑलिम्पिक निकषानुसार काम करावे लागणार आहे. स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयी सुविधा उभाराव्या लागतात. त्याची तयारी गुजरातने आतापासूनच सुरू केली आहे.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *