कामवाल्या बाईवर चोरीचा आळ घेतला जातो पण खरे जेंव्हा समोर येते..तेव्हा जे घडते ते पाहून…

लाईफ स्टाईल

आपल्याकडे कामाला येणाऱ्या बायका वेगवेगळ्या तऱ्हेच्या असतात. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती, मात्र आपलं त्यांच्याशी जसं वागणं असेल त्यांच्याकडूनही बऱ्याच प्रमाणात ते आपल्याला परत मिळतं. अर्थात यात काही अपवा दही असतात. खरं तर गरज दोन्हीकडे असते. पण केवळ त्या खालच्या स्तरातून आलेल्या आहेत किंवा त्यांना कामाची, पैशांची गरज आहे म्हणून त्यांना अयोग्य वागणूक देणं कितपत बरोबर आहे.

त्यांच्याशी चांगलं वागून सुद्धा कामं करून घेता येतातच की आणि बऱ्याचदा त्यांचा प्रामाणिकपणा ही त्यांची जमेची बाजू ठरते. आज आपणही असाच एक प्रसंग पाहणार आहोत, शीला आणि तिच्या मालकीणबाई देशमुख काका-काकुंसोबत घडलेला. शीला देशमुखांकडे बरीच वर्षे काम करत होती. सकाळी बरोबर आठच्या ठोक्याला शीलाच्या हातात झाडू असायचाच. त्यांच्या घरचं अंगण लोटून, बागेतल्या झाडांना पाणी घालून मग बाकीची कामे सुरु होत असत.

पण आज तिला यायला थोडा जास्तच उशीर झाला, आज कामावर यायला नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला. म्हणून सकाळी सकाळी काकूंची बोलणी खावी लागली. त्यांनी तिला रोजच्या सारखा आज चहा पण दिला नाही. खरंतर उशीर झाल्यामुळे घरून ती चहा न घेताच निघाली होती. पण अर्ध्या तासाच्या उशिरामुळे काकू खूप बोलल्या तिला. आणि तोंडानं कधी काही न मागणाऱ्या तिला आताही चहा मागायला बरं वाटलं नाही.

तिने झाडू हातात घेतला आणि अंगण झाडायला लागली. सकाळीच बोलणी खाल्ल्यामुळे ती सुद्धा रा गातच होती. स्वतःशी बडबड करत तिचं काम करणं सुरु होतं. “रोजच्या कपभर चहाचे पैसे कापतात, दीडशे रुपये महिन्याचे. तेव्हा नड नसती तर यांच्याकडे कामच केलं नसतं. हे लोक पैशेवाले आहेत तर काय झालं, आम्ही बी तर माणसंच आहोत की, प्रत्येक माणसाला सुखदुख असतं. पण या लोकांना काय त्याचं. त्यांची कामं फक्त वेळेवर झाली पाहिजे.

महिन्याचे हजार रुपये कबूल केले होते, अन चहा तर रोज स्वतः होऊन द्यायच्या, मला काय माहीत, त्याचे पैसे का पतील. सुरवातीला गोडगोड बोलल्या काकू अन आता बोलायची एक संधी सोडत नाही. आता दुसरं एखादं जास्त कामाचं घर लागलं की मी काही काम करत नसते भो इथं.”असं तिनं मनाशी ठरवलं, पण हे तिनं अनेकदा ठरवलं होतं, प्रत्यक्षात मात्र आपल्या अडनाड्या वेळी कामात आले, मग त्यांचं काम कसं सोडावं हा विचार करत ती एकेक दिवस रेटत होती.

त्या सकाळच्या कोवळ्या उन्हात काहीतरी चमकलं. तिनं डोळे किलकीले करून बघितलं तर काहीतरी वजन पडल्यामुळे चेपलेली अंगठी होती ती. तिनं ती उचलली आणि देण्यासाठी घराकडे जाऊ लागली, तेवढ्यात काका खिडकीतून खेकसले, ”इथलं झाडलं नाही ते, आणि चाल्लीस कुठे? कामचोर कुठली, तुला काय वाटलं आमचं लक्ष नाही, चल झाड आधी ते.” तिने ती अंगठी तशीच हातात ठेवली आणि उरलेलं अंगण ती झाडू लागली. आता मात्र ती अंगठी परत द्यायचं तिचं मन होईना.

तिनं साडीच्या निऱ्यांजवळ लटकवलेली आपली पिशवी काढून त्यात ती अंगठी ठेवली आणि ती पुढच्या कामाला लागली. नंतर ती त्या अंगठीला विसरून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुखाच्याकडे कामाला गेल्यावर त्या दोघांचे चेहरे पाहून तिला काल दिवस भरत काय झाल असेल याचा अंदाज आला, काका काकू घरभर शोधाशोध करत होते, पण त्यांना अंगठी काही सापडली नाही, जावयाला दिवाळ सणाला द्यायची म्हणून आणून ठेवलेली अंगठी सापडेना म्हणल्यावर दोघेही घाबरले होते.

त्यांना पाहून शीलाने आत जाऊन आधी अंगठी काढून दिली. अंगठी पाहून काका तिच्यावर अजूनच ओरडू लागले, सोन्याची अंगठी पाहून तुझी नियत फिरली का? म्हणून वाट्टेल ते बोलू लागले. काळ सापडलेली अंगठी कालच का दिली नाही म्हणून विचारू लागले, आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून ती बोलायला लागली, “ओ काका, काल झाडता झाडता मी घरात येत होते, तुमी हटकलं नसतं न, त तेवाच देत होते तुमची अंगठी, तुमी काहिबाही बोलला मला, मग मला बी राग आला.

दिली ठिवून माझ्याच जवळ, अन स्वतःजवळच ठेवून घ्यायची असती तर आज कशाला घिवून आली असती मी ही अंगठी तुमची, गुपचाप सोनाराकडं जाऊन मोडली असती तर तुमाला काय पत्ता लागला असता सांगा मला दुसरी कोन असती माझ्या जागी तर तुमच्यासारखं असं वागणाऱ्या माणसाला काय परत केली नसती बगा तुमची चीज. एकतर स्वतः हून परत बी करतेय अन वरून तुमची खरीखोटी कशाला ऐकून घिऊ?

ही गोष्ट फार वाढू नये म्हणून मध्ये पडत काकूंनी तिचे आभार मानले आणि काकांना त्यांच्या निष्काळजी पणाबद्दल खडे बोल सुनावले. बायजाला बसायला लावून पाणी दिलं प्यायला. बायजाने एका घोटातच गटगट करीत पाणी संपवलं. काकूंनी चहा ठेवायला पातेलं घेतलंच होतं तशी ती बोलली, ” काकू माझा चहा ठिऊ नका, घरून घेऊन आली, अन उद्यापासून करू बी नका, म्हणजे पुढल्या महिन्याच्या पगारात पूर्ण म्हणजे आपलं ठरलं होतं तेवढे पैशे दया मला. काकू तिच्या या आवेशाला बगातच राहिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *