नमस्कार मित्रांनो, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, आणि मग कलयुग असे ४ युग आहेत. यातील तीन युग संपले असून सध्या आपण चौथ्या म्हणजे कलियुगात जगतो आहोत. जगत असल्यामुळे या युगाची वास्तविकता आपल्याला चांगली ज्ञात आहे. स्वार्थ, कपट, अनीती, फसवणूक, अनेक मूल्यांचा र्हास, जी वघेणी स्पर्धा, धो का, कारस्थान, विषमता, वा सना, अ हंकार इत्यादी दुर्गुणांनी डबडबलेले हे युग आपण रोजच अनुभवतो.
त्यामुळे याला चांगले किंवा श्रेष्ठ म्हटल्यावर आपल्या प्रत्येकाला ते सहजा सहजी न पटणारे आहे. पण व्यास मुनी यामागे काय स्पष्टीकरण देतात ते जाणून घेऊया. त्रेतायुगात भगवान परशुराम, सत्ययुगात श्रीराम झाले. द्वापार युगात स्वतः श्रीकृष्ण आणि गीता अवतरली. पण कलियुगात अजून तरी या तोडीचं कोणी झालेलं नाही. आज कलियुगाचे ५१४४ वें वर्ष सुरू आहे.
आणि मागच्या युगांसोबत तुलना केल्यास कलियुगातील मानव अधिक सामर्थ्य शून्य, विवेक शून्य, संयम शून्य, बुद्धिहीन, मुल्यहिन पाहायला मिळतो. आजही मागच्या युगाच्या काही खाना खु णा सापडतात ज्याचे कोडे उलगडतच नाही. तसेच अनेक गोष्टी करायला मागच्या युगाच्या ध र्म ग्रंथांचा तसेच उपासना पद्धतीचा आधार घ्यावा लागतो. आज आपण आपल्या उपासना, कर्मकांड, व्यवस्था, अनेक सा माजिक संस्था इत्यादी मागच्या युगातल्या म्हणजे इतिहासातल्याच स्वीकारून पुढे चाललो आहोत.
अनेक शोध जरी कलियुगात लागले असे आपण म्हणत असू पण ह्या सर्व गोष्टी भूतकाळात ही आपल्याला दिसतात. याउलट बदललेली परिस्थिती, पर्यावरणाचं असंतुलन, उद्भवलेल्या अनेक सा माजिक, राजकीय, सांप्रदायीक तसेच आंतरराष्ट्रीय स मस्या, झालेली अवैज्ञानिक जीवनशैली, दुर्गुणांचा जिकडे तिकडे झालेला शुकशुकाट इत्यादी पाहता कलियुग श्रेष्ठ नाहीच अशी आपली पक्की मनोधारणा होते.
पण ज्यांनी महाभारत लिहून काढले ते एवढे अर्थहीन कसे काय बोलले असतील, हा प्रश्न देखील अनुत्तरित राहतो. त्यामागे एक कथा सांगितली जाते. एकदा मुनी व्यास पवित्र गंगा नदीवर स्नान करायला गेले असता. स्नान करून ते नदीच्या कमी पाण्याच्या पट्ट्यात ध्यान करत बसले. त्यांच्या दर्शनासाठी काही ऋषी तिथे आले आणि त्यांचे ध्यान होईपर्यंत तिथेच एका झाडाला टेकून बसले.
व्यास मुनींनी ध्यान आटोपताच ते दर्शनासाठी पुढे आले आणि दर्शन करून त्यांनी मनातील काही शंका कुशंका विचारल्या. तेव्हा शंकांचे निरसन करता करता मुनींच्या तोंडून कलियुग श्रेष्ठ आहे असे उद्गार निघाले. तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले. आणि त्यांनी कलियुग श्रेष्ठ कसे? असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा उत्तरादाखल मुनी म्हणाले की हे ऋषी श्रेष्ठहो, सत्य युगामध्ये जे ज्ञान मिळविण्यासाठी १० वर्ष तप करावे लागते.
तेच ज्ञान त्रेता युगात १ वर्षाच्या तपाने प्राप्त होते. मात्र द्वापार युगात केवळ १ महिन्याच्या तपश्चर्येचे ने साधक स्वतःला सिध्दी प्राप्त करून घेऊ शकतो. मात्र कलियुगाच्या बाबतीत हीच मर्यादा अधिक कमी होऊन केवळ एका दिवसाच्या साधनेने साधक पवित्र असे शाश्वत ज्ञान प्राप्त करू शकण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे माझ्या मते हे कलियुग श्रेष्ठ असे युग आहे.
१०-१० वर्षे सतत तप करूनही अनेकांना जे साधत नाही ते कलियुगातील माणूस केवळ भगवान श्रीकृष्णाच्या साधनेने एका दिवसात प्राप्त करू शकतो. याचाच अर्थ हा की कलियुगातील साधकावर परमेश्वरी शक्ती विशेष प्रमाणात कृपा करते. त्यामुळे कलियुगातील साधक अधिक भाग्यवान आहे असे मानायला हरकत नाही. आणि म्हणूनच त्याची गुणवत्ता अधिक तेजस्वी आहे.
त्याच्या शब्दाला, वाणीला, विचाराला, कर्माला, भक्तीला, अधिक धार आहे. ज्याने ही साधना साधली तो अगदी कमी वेळात सत्य युगाच्या सिद्धाच्या योग्य तेचा होऊ शकतो. त्यामुळे हे युग इतरांच्या तुलनेत अधिक श्रेष्ठ आहे असे मी म्हणतो. पण मित्रांनो, हे ऐकायला जरी चांगले वाटत असले तरी साधना साधने सोपी गोष्ट अजिबात नाही. इथे आपल्यात असलेल्या अनेक दुर्गुणांमुळे साधनेची इच्छा होणेच मुळात दुर्मिळ गोष्ट आहे.
आणि इकडून तिकडून इच्छा झालीच तर मन एकाग्र करून साधना करणे आणि ध्यानाला बसल्यावर सातत्याने मन एकाग्र राहिल अशी काळजी घेणे महाकठीण कर्म आहे. पापाचा वाढलेला डोंगर पवित्र मार्गावरून खेचण्याचे कामच अधिक करतो त्यामुळे परमेश्वरी शक्ती प्राप्त करताना अनेक म्हणजे अनेक अ डचणी येतात.
त्यामुळे ही साधी एक दिवसाची साधना सुद्धा प्राप्त होत नाही. आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर ५ मिनिट ध्यान लाऊन बसावे. आणि या ५ मिनिटात किती विचार येतात ते पाहावे. मन सतत भटकत असते. अनेक विचार येत जात राहतात. अशावेळी साधनेवर लक्ष केंद्रित करून ध्यानस्थ होणे किती जणाला जमेल?