आपल्यातले बरेच जण कोणत्यातरी कामासाठी किंवा काही कारणाने कर्ज काढत असतात. बरेच लोक कर्ज काढून घर बांधतात . काहीजण ह प्त्यावर गाड्या, मोबाईल, फ्रिज, टीव्ही आणि अशा बऱ्याच गोष्टी घेत असतात. काही लोक शेतीसाठी वगैरे कर्ज प्रकरण करतात. पण काही वेळा काही कारणांमुळे किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे आपण कर्जाचे हप्ते फे डू शकत नाही.
त्यानंतर मग बँकेकडून किंवा रिकवरी एजंट कडून आपल्यावर ह प्ता भरण्यासाठी द बाव आणला जातो. आणि त्याच मुळे लोकांना टेन्शन येऊन ते घा बरतात आणि डि प्रेशन खाली जातात. जर आपण सुद्धा अशाच परिस्थितीतून जात असाल आणि कर्जाचे ह प्ते फेडण्यास आपण सक्षम नसाल तर घाबरून जायची काही गरज नाही.
आणि तुम्ही जर कर्जासाठी एखादी वस्तू जरी गहाण ठेवली असेल तरी पण तुम्हाला टे न्शन घ्यायची आणि घाबरून जायची काही गरज नाही. पण हे मात्र नक्की आहे, तुम्ही जर कर्जाचे हप्ते फेडले नाहीत किंवा भरले नाहीत तर बँकेमार्फत तुमच्या वस्तूची किंवा मालमत्तेचा लिलाव केला जाऊ शकतो आणि पुढील कार्यवाही होऊ शकते.
सि क्युरिटीकरण आणि वि त्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि सु रक्षा व्याज अं मलबजावणी का यद्यानुसार कर्ज देणारी संस्था किंवा व्यक्ती किंवा बँक तारण ठेवलेल्या म्हणजेच गहाण ठेवलेल्या वस्तू किंवा मालमत्ता ज प्त करू शकतात. तुम्हाला हे माहित आहे का? बँकांना दिल्या गेलेल्या अधिकाराबरोबरच तुम्हाला पण काही अधिकार दिलेले आहेत.
आपण कर्ज घेतल्यानंतर आपल्याला कोण कोणते अधिकार किंवा हक्क असतात तेही आपल्याला माहीत असले पाहिजे. आणि जर आपण कर्ज भरण्यास सक्षम नसाल तर आपण या अधिकारांचा उपयोग करू शकता. ज्यामध्ये बँकेला तुमच्यावर कोणतीही कारवाही करण्यास प्रतिबंधित करते. या अधिकारांमध्ये बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारची ध मकी किंवा तुमचे शा रीरिक नु कसान करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आता हे सर्व अधिकार आपण विस्ताराने पाहू या…
आपल्याला कोणीही ध मकाऊ शकत नाही:- जर आपण कर्ज देण्यास सक्षम नसाल तर कोणतीही बँक किंवा बँक कर्मचारी तुम्हाला धमकी देऊ शकत नाही. तसेच तुम्हाला शा रीरिक इ जा पोहोचू शकत नाही. आपल्या सोबत सार्वजनिक किंवा सा माजिक रित्या गै रवर्तन करू शकत नाहीत. बँक वाले कदाचित तृतीय पक्षातील लोकांना व सुलीसाठी तुमच्याकडे पाठवू शकतात. पण हे लोक तुमच्या घरी फक्त दिवसा येऊ शकतात. त्यांना रात्री येण्यास परवानगी नाही. आणि हे लोक फक्त कर्ज परत देण्यास सांगू शकतात. धमकी किंवा जोर जबरदस्ती करू शकत नाहीत.
तुम्हाला मुबलक प्रमाणात वेळ दिला जातो:- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदे आणि नियमानुसार कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ दिला जातो. सर्वात पहिले तुम्हाला बँकेकडून बऱ्याच नोटिसा पाठवल्या जातात. कर्ज वसुली एजंट तुम्हाला कर्ज परत करण्यासाठी वेळही देतील. पण पुन्हा तुम्हाला वेळा नोटिसा पाठवल्या जातात. आणि मग तुमची मालमत्ता किंवा वस्तू विक्री पूर्वी किंवा लीलावा पूर्वी सुमारे तीस दिवस आधी तुम्हाला सार्वजनिक नोटीस पाठवली जाते.
तुमच्या मालमत्तेचे पूर्ण मूल्य मिळवण्याचा अधिकार:- या अधिकारानुसार जर तुमची मालमत्ता किंवा वस्तू विकली जात असेल तर तुम्हाला मालमत्तेची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. बँक आपले पैसे मिळवण्यासाठी तुमची वस्तू किंवा मालमत्ता कमी पैशात विकते असे नाही. तर तुम्हाला मार्केट रेट नुसार त्या वस्तूची किंमत मिळवण्याचा अधिकार आहे.
उदाहरणार्थ, तुमचे एकूण देणे पाच लाख रुपये आहे, आणि तुमच्या गहाण ठेवलेल्या वस्तूची किंमत दहा लाख रुपये आहे तर ती वस्तू विकल्यानंतर बँक फक्त पाच लाख रुपये आणि वरून काही कर जमा करून तुमचे राहिलेले पैसे तुम्हाला परत करते. कायदे आणि नियमानुसार हे सर्व अधिकार तुम्हाला आहेत.
त्यामुळे हप्ते भरण्यास सक्षम नसाल किंवा वेळ लागत असेल तर घा बरून जाऊ नका. हे सर्व अधिकार तुम्हाला माहीत असले पाहिजेत. त्या साठी आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.