कर्जांचा डोंगर, दुःख, निराशा, आर्थिक संकट, कायम अपयश, दारिद्र्य अशा कोणत्याही स मस्या आपल्या जीवनात असो…फक्त करा स्वामींचा हा उपाय…यामुळे यश नक्कीच यश आपले असेल   

धार्मिक

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशादायक, आश्वासक आणि सकारात्मकता प्रदान करणारा गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्याला आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. मित्रांनो, आपल्या मनातील दुःख, निराशा, आपल्या घरात आलेले, दारिद्र्य, आर्थिक संकट या सर्वावर स्वामींनी अनेक उपाय सांगितले आहेत. त्यामुळे जर आपण हा उपाय मनोभावे केल्यास आपल्याला निश्चितच यश प्राप्त होईल आणि स्वामींचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहतील. चला तर मग जाणून घेऊ कि स्वामीं काय म्हणाले आहेत.

श्रद्धा:- जर आपण स्वामींवर विश्वास ठेवून तसेच श्रद्धा ठेवून आपण कुठलेही काम सकारात्मक रित्या केल्यास त्याचे यश आपल्याला मिळते, यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणींवर सहज मात करता येते. आपल्या जीवनात कितीही निराशा असो अथवा मनात कितीही दुःख असो, आपण कितीही आर्थिक विवंचनेने त्रस्त असो आपण स्वामींवर विश्वास ठेवून योग्य ते प्रयत्न केल्यास आपली सर्व चिंता तात्काळ दूर होते.

उपाय : आपणास सांगू इच्छितो कि हा उपाय आपण कुठेही आणि कधीही करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा आपण जिथे बसणार आहात तिथे वातावरण अत्यंत शांत असले पाहिजे. जेणेकरून आपले मन एकाग्र होईल. पण जर आपले मन एकाग्र होत नसल्यास आपल्याला हा उपाय अडचणीचा वाटेल तसेच आपल्याला त्रास जाणवेल. पण काही दिवसांनी आपल्याला त्याचा सराव होऊन जाईल आणि हा उपाय आपण कोठेही बसून करू शकाल.

कुठे करायचा हा उपाय:- आपणास सांगू इच्छितो कि हा उपाय करताना आपल्याला कुठलेही साहित्य लागणार नाही अथवा आपल्याला कोठेही जाईची गरज पडणार नाही. म्हणजेच आपण कोठेही बसून हा उपाय करू शकता. जिथं आपलं मन शांत राहील असे वाटते अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही बसा.

यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा आपण जप चालू करा. मग त्यावेळी तुमचे मन कितीही निराश असू द्या तुम्ही कितीही दुःखी असो, अथवा अनंत अडचणी आपल्यासमोर असू द्यात अशावेळी फक्त स्वामी समर्थ महाराजांचे शांत चित्ताने मन एकाग्र करून फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र म्हणा. तसेच हा मंत्र म्हणत असताना आपणाकडे माळ देखील असली पाहिजे असं काही. फक्त इतकंच कि आपण किमान एक वेळ बसला की पंधरा मिनिटे हा जप करावा.

मन एकाग्र:- हा नामजप करत असताना आपण खूप श्रद्धेने करावा यावेळी आपल्या मनात कोणतेही वाईट विचार आणू नयेत. यामुळे आपले मन एकाग्र होईल. तसेच तुम्ही करत असलेल्या कुठल्याही कामावर आपली पूर्णपणे कार्यशक्ती कार्यरत राहील आणि मित्रांनो कुठलेही काम आपण पूर्ण क्षमतेने मन एकाग्र करून केल्यास ते नेहमीच यशस्वी होते. त्यावेळी आपणामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि आपल्यासमोर आलेल्या अनंत अडचणींना आपण सहज तोंड देऊ शकतो.

त्यामुळे मन निराश असू द्या, मन दुखी असू द्या, आपल्यावर कर्जाचा डोंगर असेल, आपल्याला आर्थिक संकट असेल, नोकरीची समस्या असेल, आपल्या व्यवसायात अडचणी असतील. अशा गोष्टीवर आपण सकरात्मक रित्या मार्ग काढलं आणि अशा समस्या स्वामींच्या आशीर्वादाने दूर होतील आणि आपणाला प्रगतीचा मार्ग दिसून येईल. त्यासाठी गरज आहे आपणाला मन एकाग्र करण्याची आणि स्वामींचे नामस्मरण करण्याची.

तसेच आपण यासाठी दिवसातील कोणतीही वेळ आपण निवडू शकता अथवा रात्रीची देखील वेळ निवडू शकता. आपण कुठेही बसून हा श्री स्वामी समर्थ नाम जप करू शकता. यासाठी वर सांगितल्याप्रमाणे आपल्या दिवसभरातील किमान पंधरा मिनिटे वेळ देणे आवश्यक. मित्रांनो, हा उपाय मनोभावे श्रद्धापूर्वक करा आपणाला नक्कीच यश प्राप्त होईल.

शंका आणि समाधान:- जर आपल्या मनामध्ये शंका असेल की असे करण्याने कधी कुणाचे इतके चांगले झाले होते काय? तर याचे उत्तर होय असेच आहे. कारण अनेकांनी याचा लाभ घेतला आहे आणि त्यांना निश्चित यश प्राप्ती झाली आहे. मित्रांनो कोणताही उपाय असू द्या आपण तो मनःपूर्वक श्रद्धेने करावा तसेच आपण करत असलेले कार्य हे यशस्वी होणार असे समजून करावे. यामध्ये तुम्ही यशस्वी होणारच याची खात्री ठेवूनच कार्यरत रहा. अशा वेळी येणारे यश आपलेच असणार आहे.

तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उपाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *