कर्जदारांनो एकदा कर्ज कसे फेडावे हे पहाच…नक्कीच आपल्याला दिलासा मिळेल आणि काही दिवसांतच आपण कर्ज फेडाल..जाणून घ्या काही खास टिप्स..

लाईफ स्टाईल

बँकिग प्रणाली हायटेक झाल्याने कर्ज मिळण्याची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे हे आपल्याला माहितच आहे, लोकानी कर्जाची उचल तर मोठ्या प्रमाणात केली असली तरी व्याज आणि कर्जाची परतफेड करणे सध्याच्या को रोनाच्या संकटामुळे अनेकांना अवघड जात आहे. एकीकडे उत्पन्न मर्यादित आणि व्याजाचे हप्ते जास्त त्यामुळे करायचे काय हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तसेच ‘कर्ज’ सगळ्यात वाईट असे अनेकांचे मत असते. त्यामुळे त्यापासून लवकरात लवकर मुक्ती आपल्याला कशी मिळेल याचा विचार नेहमीच त्यांच्या मनात चालू असतो. त्याचसाठी आज आपण अशा काही गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्जातून लवकरात लवकर मुक्ती मिळेल. चला तर मग पाहूया यासाठी आपल्याला नक्की काय करायचे आहे.

तर मंडळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, क र्जातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. योग्य नियोजनामुळे तुमची वाटचाल आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करणे सोपे जाईल. कसे कराल आर्थिक नियोजन? १- आर्थिक नियोजनासाठी वेगवेगळ्या मा नसिक आणि वर्तमानात्मक बाबीचा विचार करा. २- कमी वयात किंवा करिअरच्या सुरवातीपासूनच नियोजनास सुरवात करा. ३- प्रत्येकाने आपल्या इच्छाचे आपत्कालीन आणि दीर्घकालीन भविष्य काय असेल याचा आढावा घेऊन आपल्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

४- रोख पैश्याच्या खर्च आणि मिळकत यांचे निरीक्षण करा. महिन्याच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे अचूक आकलन करा. यामुळे तुमची सद्य परिस्थिती काय आहे याचा अंदाज येईल आणि पुढील नियोजन करता येईल. ६- कर नियोजन हे भारतातील प्रत्येक नोकरदार, व्यापारी आणि व्यावसायिकाणे करणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मिळकतीचे र क्षण करू शकतात. यासाठी विमा, बॉंड यामध्ये गुंतवणूक करू शकता. ७- गुंतवणुकीचे नियोजन करा. जसे विमा, बचत, म्युचल फंड. पोस्ट, सोने, रियल इस्टेट पण कर सल्लागाराचा सल्ला मात्र आवश्य घ्या.

या सगळ्या नियोजन प्रक्रीये नंतर सुद्धा जेव्हा तुम्हाला कर्ज काढावे लागेल तर त्याची परतफेड तुम्ही कशी कराल हे पुढील गोष्टींवरून तुमच्या लक्षात येईल. कर्जाचा आढावा घ्या:- तुमच्या कर्जाची रक्कम जास्त असेल आणि तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली द बलेले असाल, तर व्याजाच्या माध्यमातून त्याची विभागणी करा. यामुळे कर्जाची रक्कम आणि त्याचे व्याज अशी त्याची विभागणी होईल.

उदा. क्रेडीट कार्ड वरील व्याज वर्षाला सुमारे ४०% च्या आसपास असते, तर पर्सनल लोनचे व्याज दर २५ ते ३० % असते. होम लोन वरील व्याजदर स्वस्त आहे. तर शैक्षणिक कर्ज १२ ते १४% व्याजदर मागते. कारलोन साठी १५% तर गृहपयोगी वस्तूंसाठी १६% व्याजदर असते. यावरून तुम्ही कोणते लोन कधी परत करायचे याचे नियोजन करू शकता. म्हणजे जास्त व्याजदराची रक्कम आधी फेडावी, तर कमी व्याजाचे कर्ज नंतर फेडू शकता.

कर्जाचे एकत्रीकरण:- जर तुम्ही एकाच प्रकारची अनेक कर्जे घेतली असतील तर ती एकाच ठिकाणी एकत्रित करा किंवा एकाच ठिकाणी पूर्ण रकमेचे कर्ज घ्या, ज्यामुळे तुम्हाला एकाचवेळी हप्ते भरणे सोपे जाईल. यामध्ये तुम्ही स्वस्तात उपलब्ध कर्जांचे पर्याय शोधू शकता. जसे कि, भविष्य निर्वाह निधी किंवा विमा जे क्रेडीट कार्ड पेक्षा स्वस्त असते.

महाग कर्ज आधी फेडा:- महागड्या कर्जांची रक्कम स्वस्त कर्जानी भरून काढू शकता. त्यासठी तुमच्या मालमत्तेचा आढावा घ्या. मॉर्गेज लोन हा पर्याय उचित ठरू शकतो. यामध्ये शेअर्स, म्युचल फंड यांचा समावेश होऊ शकतो. ज्यांचे कर्ज १२ ते १४ %व्याजाने तुम्हाला मिळू शकते.

कर्जदात्याशी घासाघीस करा:- ज्या क्रेडीट कार्ड कंपन्या तुम्हाला कर्ज देतात त्यांच्याशी व्याजदरात, हप्त्यांमध्ये घासाघीस करण्याचा प्रयत्न करा, प्रयत्नांनी यश मिळते हे या बाबतीत लक्षात ठेवा. कारण कंपन्या कोणतेही कर्ज थकीत कर्ज म्हणून ठेवणे पसंत करत अन्ही. त्यामुळे तुम्हाला या मध्ये सूट मिळू शकते. तसेच खर्चात काटकसर करा, कर्ज मुक्त होईपर्यंत अनावश्यक खर्चाला कात्री लावा. अतिखर्च टाळा.

कर्जाचा कालावधी कमी ठेवा:- कर्ज घेताना बरेच लोक इएमआय कमी व्हावा म्हणून अधिक मुदतीची कर्जे घेतात. जेणेकरून कमी पैसे द्यावे लागतील. पण आपल्याला अश्यावेळी जास्त व्याज भरावे लागते. म्हणून आर्थिक सल्लागार आपल्याला कमी कालावधीसाठी कर्ज घेण्याची शिफारस करतात. वरील सर्व गोष्टींचा आपल्या आर्थिक नियोजनासाठी आणि घेतलेले कर्ज लवकरात लवकर फेडता यावे यासाठी नक्की उपयोग होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *