नमस्कार मंडळी, शीर्षकावरून आपल्याला समजलेच असेल कि आज मी कोणत्या आशयाची गोष्ट सांगणार आहे ते, मंडळी, हि कथा आहे साध्याभोळ्या, गरीब आणि प्रामाणिक महादूची, तर हा महादू मालवण बस डेपो मध्ये एस.टी कंडक्टर होता आणि त्याच्या बस सेवेमधला हा एक प्रसंग, तर असेच एकदा रात्रीचे साधारण साडेदहा वाजले असतील.
आणि देवगडला जाणारी शेवटची बस स्थानकावर लागली होती. बस मधले तूरळक प्रवासी सोडले तर बाकी विशेष गर्दी नव्हती आणि सगळीकडे शुकशुकाट पसरला होता. गाडीची वेळ होऊन गेली तरी गाडी अजून जागची हललेली नाही म्हणून प्रवाश्यांची चुळबुळ चालू होती. तेवढ्यात कोणीतरी निरोप घेऊन आला कि गाडीचे चाक पंक्चर आहे.
आणि दुरुस्ती शिवाय गाडी बाहेर काढता येणार नाही. पण आतमधील धुसफूस काही काळ शांत झाली आणि थोड्याच वेळात गाडी सुरु झाली आणि एक एक प्रवाश्याचे तिकीट फाडत महादू शांता आजी जवळ आला. आजीबाईने कातवन फाट्याजवळील एका गावाचे तिकीट काढले. महादूने शांता आजीकडे पहिले. कृश देह, पांढरे केस, कंबरेपासून वाकलेले शरीर, खोलवर गेलेले डोळे.
एकूणच श रीरयष्टीचा विचार करता म्हातारी एकटी राहणारी व राबून खाणारी आहे हे हे महादूच्या लक्षात आले. इतक्या रात्री हि आजीबाई एकटीने का प्रवास हा विचार महादू करू लागला. त्याने त्याबद्दल आजीला विचारले देखील, पण वयोमानाने तिची ऐकण्याची शक्ती कमी झाली होती. त्यामुळे महादू पुढे निघून गेला आणि इतर प्रवाश्यांची तिकीटे काढून तो जागेवर येऊन बसला.
बाहेर काळाकुट्ट अंधार पडलेला, भयाण शांतता सगळीकडे पसरलेली. रातकिड्यांचा आवाज गुंजत होता आणि काही वेळाने बस मधील लाईट बंद केले गेले त्यामुळे सर्व लोक झोपी गेले. महादू मात्र आजीचा विचार करत बसून राहिला. एवढ्या रात्री हि आजी एकटी आपल्या घरी जाणार कशी हा विचार त्याचे डोके भंडावून ठेवत होता.
इतक्यात शांता आजीच्या गावाचा फाटा आला. तशी महादुने बेल वाजवली, ड्रायव्हरने बस थांबवली, महादुने शांता आजीच्या हाताला धरून तिला खाली उतरायला मदत केली. खाली बघितले तर काळाकुट्ट अंधार, रात्रीची भ यानक शांतता. काही पावलांच्यापुढे काही न दिसेल इतका भयाण अंधार. त्याने शांता आजीला विचारले कि तुला न्यायला कोणी आले नाही का?
त्याच्या या प्रश्नाचे उत्तर आजीने टाळले. महादूजे समजायचे ते समजून गेला. मागचा पुढचा कसलाच विचार न करता महादुने आजीचे सामान उचलले, एका हाताने आज्जीचा हात घट्ट पकडला व तिच्या वाटेने लागला. एवढ्या अंधारात आपल्यासाठी एवढे कष्ट घेणाऱ्या महादुला पाहून आजी धन्य झाली व शक्य तेवढ्या झपाझप पावले टाकीत त्याच्यासोबत चालू लागली.
इकडे बस मध्ये प्रवाश्यांचा गोंधळ सुरु झाला, महादू कोठे गेला याची शोधाशोध सुरु झाली. तो आजीबाईला सोडायला गेल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले, त्याने सुद्धा महदूच्या नावाने काव काव सुरु केली. महादुला सोडून बस पुढे जाऊ द्या अशी मागणी सुरु झाली. तर इकडे दहा मिनिटांच्या पायपिटीनंतर आजीच्या प डक्या घराचा रास्ता लागला. आणि शांता आजी आधीपासून एकटीच राहायची.
तिचे जवळचे सख्खे असे कोणीच नव्हतं. गावातल्या एका कोपऱ्यात दोन खोल्यांचं घर, आणि थोडी फार जमीन. तीच जमीन दरवर्षी कोणाला तरी कसण्यासाठी देऊन आजीच्या पोटापाण्याची सोय होत असे. बाकी गावात इतर कोणाशी कसलाही संपर्क कमीच, आजीने महादूला त्याच नाव व पत्ता विचारून घेतला. तसेच इतर बारीक सारीक चौकशी करेपर्यंत आजीचं घर आल.
तस महादुने आजीच सामान खाली ठेवलं, आजीने त्याला घराची किल्ली दिली. महादुने कुलूप काढलं व बसकडे निघून गेला. त्याच्या या सेवेमुळे आजी धन्य झाली. असेच दिवस जात होते आ णि आता शांता आजी आता पार खंगून गेली होती. एकेदिवशी तिने गावच्या सरपंचाना व इतर प्रमुख माणसांना बोलावून घेतलं आणि म्हणाली,”सरपंच एक कागद घ्या, हे माझे २ तोळ्यांचे दागिने, माझी जमीन हे सर्व महादूच्या नावे होईल.
मी गेल्यानंतर माझी सर्व संपत्ती त्याला मिळाली पाहिजे.” असे सांगून काही पैसे त्यांच्या हातात दिले व त्यातुन तिचे अंतिम कार्य करण्यास सांगितले. महादूचा पूर्ण पत्ता आजीने त्यांना दिला. सरपंचानी ती गोष्ट मान्य केली. काहीच दिवसात आजी देवाघरी गेली. तिचे सर्व क्रियाकर्म करून झाल्यावर सरपंचानी महादूचा शोध घेतला, त्याला आजीची इच्छा बोलून दाखवली आणि घराच्या किल्ल्या महादुकडे दिल्या.
महादु हे सर्व पाहून थक्क झालाक़, डबडबलेल्या डोळ्यांनी त्याने घराच्या किल्ल्या घेतल्या. समोरच मोकळ्या जागेत शाळेचे वर्ग भरलेले महादुने पहिले. त्याने त्याबद्दल सरपंचांकडे चौकशी केली असता त्याला समजले, कि गावात शाळा भरण्यासाठी इमारत नाहीये, कोणीच आपली जागा शाळेसाठी देत नाहीये हे त्याला समजले.
तेव्हा त्याने आजीच्या घराच्या किल्ल्या नि जागेचे कागद सरपंचांकडे देऊन त्या जागेवर शाळा बांधण्याची व शाळेला शांता आजीचे नाव देण्याची विनंती त्याने सरपंचाना केली व तिथून निघून गेला आणि त्याच्या या परोपकारी वृत्तीवर सगळं गाव खुश झाला. मंडळी कशी वाटली आजची गोष्ट? केलेली मदत कधीच वाया जात नाही हेच आपल्याला यातून समजते… बरोबर ना?