नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या परिवारासोबत राहत असताना आम्ही गोष्टी अनुभवायला मिळतात. जर संयुक्त परिवार असेल तर एकमेकांना मधले गृहकलह सुद्धा असतात. यामुळेच अनेक वेळा भांडण तंटे होतात. घराच्या वाटणी च्या घटना, जमिनीच्या वाटण्या बद्दलच्या बातम्या आपण सर्रास वर्तमानपत्रात वाचत असतो. अशीच एक घटना वृषाली नावाच्या मुलीच्या आयुष्यात घडली. चला तर जाणून घेऊया त्या बद्दल.
नऊवारी साडीतील वृषाली, दिसायला एखाद्या सुंदर हिरॉईनसारखी होती. वृषाली लिहायला वाचायला येईल इतक शिकलेली होती. वयात आली तशी आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. वृषाली हट्टी आणि सुंदर होती. तिला साडीवर मॅचिंग ब्ला’उज हवा होता आणि तो काही मिळेना. त्याकाळात खूप श्रीमंत बायकाच मॅचिंग ब्ला’उज वैगरे वापरत असत. पण हिचा हट्ट पुरवला नाही तर ही दाखवायच्या कार्यक्रमाला नव्हे तर लग्न करायला सुद्धा उभी राहणार नाही.
हे त्या दोघानाही माहित होत. म्हणूनच आई-वडिलांनी शेजारच्या बाईचा मॅचिंग ब्लाऊज तिच्याकडून मागून आणला तेव्हा कुठे बाईसाहेब दाखवायच्या कार्यक्रमाला तयार झाल्या. वृषाली कामात आतिशय तरबेज होती. स्वयंपाकघरात आणि अगदी रानातून चुलीसाठी लाकूड आणण्यासाठी सुद्धा. तर मग अशा वृषालीला स्थळ आल होत ते म्हणजे खूप श्रीमंत आणि गावात मान मरतब असणार. आणि ही पसंत पडली तिच्या सासुबाईंना आणि तिचं लग्न झालं.
वृषालीचा नवरा गोरपान आणि राजबिंडा होता. दोघांच लग्न होवून संसार सुरु झाला. नवरा दिवसरात्र आपल्या व्यवसायात गुंतून गेलेला. आणि वृषाली होती तिच्या सासुबाईचे आणि नणदेच्या ताब्यात. वृषाली होती गरीब घरण्यातली तर तिची सासू खूप खाष्ट होती. सासूचे दागदागिने तिला कधी तरी सणासुदीला घालायला दिले जायचे पण नंतर ते परत सासूबाईंच्या ताब्यात जायचे.
हळूहळू घरातल्या सगळ्या नणदांची लग्न झाली. सगळ्यांनी जाताना घरातले भरपूर सोने आपल्या सोबत नेले. तिचा नवरा खूप शांत होता तिच्या नवरा एका शब्दाने कोणालाही काही बोलला नाही. त्यातच वृषालीला एका पाठोपाठ तीन मुली झाल्या. पण सासू मात्र खूश नव्हती कारण त्यांना घराण्याचा वारस हवा होता. या सगळ्यात काही दिवसांनी सासूचा हा र्ट अ टॅकने मृ त्यू झाला. त्यावेळी तिच्या नणदांनी कहरच केला.
सासूबाईंच्या दागदागिन्यांची वाटणी केली. वृषाली मात्र गप्पच बसली. त्यातच तिने चौथा चान्स घेतला. पण तू जन्मल्यानंतर लगेच वारला त्यामुळे वृषाली खूपच खचून गेली. ती वंशाला दिवा देऊ शकत नाही ही बोलणी तिला सारखी खावी लागत. या सगळ्या वातावरणामध्ये ती निगरगट्ट बनत गेली. तिचं माहेर फाटकं होते आणि सासरची मंडळी श्रीमंत असून सुद्धा त्याचा काहीही उपयोग नव्हता कारण त्यांच्यात मनाची श्रीमंती नव्हती.
वंशाचा दिवा झाला होता आणि तोही तिच्या नशिबात नव्हता. या सगळ्याच भर काय म्हणून तिच्या नवऱ्याला कॅ न्सरने ग्रा सले. कॅ न्सरमुळे नवऱ्याचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे खूप नु कसान झाल. वृषालीच्या तिन्ही मुलींची तिला साथ मात्र होती. वृषालीने काटकसर करून बराच पैसा जमा करून ठेवला होता पण नवऱ्याचे ऑ परेशन करायचे होते. आणि त्यासाठी खूप पैसे लागणार होते.
तिच्या नणदांनी किंवा दिरानी सुद्धा तिला मदत केली नाही. सगळा खटाटोप करून सुद्धा ते फक्त दोन वर्षं जगले आणि वृषालीला सोडून गेले. तिन्ही मुलींचा अर्धवट शिक्षण, कोणाचं लग्न नाही अशा परिस्थितीत संसार अर्ध्यावर सोडून निघून गेले. सगळीकडे माणूस गेल्यानंतर बाराव्या दिवशी कोणीतरी येऊन कुटुंबाची जबाबदारी घेतो…तेथे नणदा आणि दिर जमिनीच्या वाटण्या करण्यासाठी आले होते. आता वृषालीची खरी ल ढाई चालू झाली होती.
तिच्या तिन्ही मुलींच्या पाठीमागे ती भक्कमपणे उभी राहिली. बाराव्या दिवशी तिने वाटण्या होऊच दिल्या नाहीत. तिने कोर्ट गाठले. इतकी वर्षे तिने कधीच एवढे धाडस केले नव्हते. पण तिला तिच्या हक्कासाठी हे करणे भाग होते. ही ल ढाई ल ढण्यासाठी ती छोट्या कोर्टापासून हाय को र्टापर्यंत गेली आणि शेवटी तिने केस जिंकून दाखवली. तिने न्याय मिळवला.
तिच्या वाट्याची जमीन तिला मिळाली. ती जर ही ल ढाई ल ढली नसती तर तिचे दिर आणि नणदा त्यांनी तिला ही जमीन कधीच दिली नसती. आता तिच्या दिरानिही बघितलं की ती जिंकली होती. तिच्या मनावर झालेल्या आघा तामधून ती बाहेर पडली होतो. विश्वास या शब्दावरून तिचा विश्वास उडाला होता. कारण तशी परिस्थितीच तिच्यावर आली होती. तिने तिची ल ढाई आता पूर्णपणे जिंकलेली आहे. परंतू ती आता कोणावरही विश्वास ठेवायला तयार नाही.