एव्हरेस्ट सर करताना मृ त्यू झाल्यास मृ तदेह खाली का आणले जात नाहीत?..तसेच एव्हरेस्टवर एवढे मृ तदेह आले कोठून…रहस्यमय कहाणी

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, एव्हरेस्ट हा आपल्या ग्रहावरील सर्वात मोठा पर्वत आहे, सध्या त्याची उंची 8,848 मीटर आहे. ते नेपाळ आणि चीनच्या सीमेवर असलेल्या हिमालयातील महालंगूर-हिमाल पर्वत रांगेत प्रवेश करते. एव्हरेस्टच्या विलक्षण उंचीने प्राचीन काळापासून तिबेटच्या स्थानिक लोकसंख्येलाही प्रभावित केले आहे. जगभरातील अनेक लोकांना या एव्हरेस्टच आकर्षण आहे आणि त्यामुळेच दरवर्षी जगभरातील किमान 800 लोक याच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करतात.

पण त्यातील काहीच लोक तिथे पोहोचतात आणि रेकॉर्ड बनवतात तर काही लोकांनी आपला जी व ही गमावला आहे. पहिली यशस्वी ल ढाई –पृथ्वीवर जेव्हा मनुष्य जन्मास आला तेव्हापासून हजारो वर्षापर्यंत माउंट एव्हरेस्ट वर चढणे अशक्य मानले जात होते. त्यावेळी मनुष्याला या पर्वताच्या शिखरावर पाय ठेवणे आता चंद्रावर जाण्याएव्हढे अशक्य वाटत होते. पण 29 मे 1953 रोजी शिखरावर पहिली यशस्वी चढाई झाली होती.

माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले लोक हे न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या नेतृत्वाखालील मोहीम होते. त्यांच्या यशाने केवळ इतर उत्साही लोकांची आवड पूर्ण केली नाही, तर या दोन गिर्यारोहकांनी हे अशक्य काम शक्य केले होते आणि पहिल्यांदा या पर्वतावर चढून इतिहासात आपलं नाव ऍड केलं होतं.

पर्वतावर येणाऱ्या स मस्या – या पर्वतावर गिर्यारोहकांना अनेक स मस्या येतात. जसजसे वर जाईल तसतसे तेथील ऑक्सीजनची पातळी कमी होते तसेच अतिथंड वातावरणामुळे काहींचे शरीर गोठते व त्यांचा मृ त्यू होतो शिवाय अचानक वातावरण बिघडून बर्फाचे वादळ येतात व गिर्यारोहकांना आपला जी व गमवावा लागतो. एव्हरेस्ट च्या 8000 मीटर पासून पुढे ‘डेथ झोन’ म्हणलं जातं.

कारण इथे गिर्यारोहकांना अतिथंड तापमान आणि ऑक्सिजनची पातळी कमी असणे तसेच बर्फाचे वादळ अशा स मस्यांचा सामना करावा लागतो. पण आता एव्हरेस्ट हा आता अधिसारखा कौतुकाचा विषय राहिला नाही कारण आता 4000 पेक्षा जास्त लोकांनी हे शिखर सर केले आहे. त्यामुळे आता एव्हरेस्टवर चढणे ही काही नवीन महत्वकांक्षा नाही किंवा नवीन आव्हान नाही.

गेल्या काही वर्षात गाईडच्या साहाय्याने गिर्यारोहणाचा अनुभव नसणारे लोकही एव्हरेस्ट वर जाऊन आले आहेत तर अनेक लोकांनी आपले प्रा ण ग मावले आहेत. पर्वताच्या 8000 मीटर पासून अनेक वादळ येतात व अनेक गिर्यारोहकांचे टीम या वादळात बर्फाखाली गाडले आहेत आशा स्थितीत मृ तदेहांचा ढीग तयार होतो. या डेथ झोन जवळ अंदाजे 200 ते 300 मृ तदेह आहे त्या स्थितीत पडून आहेत. पण हे मृ तदेह तिथून का काढले जात नाहीत? त्यांना तसेच का ठेवले जाते याबद्दल आज जाणून घेऊया.

डेथ झोन मध्ये पडलेले मृ तदेह दुसऱ्या लोकांसाठी गुगल मॅप सारखे काम करतात कारण इथं आल्यानंतरच लोकांना कळते की इथून आता माउंट एव्हरेस्ट पूर्ण करण्यासाठी 848. 86 मीटर अंतर राहिले आहे. अनेक मृ तदेह तर मैलाचे दगड बनले आहेत. पण दरवर्षी वाढणाऱ्या मृ त्यू मुळे तेथील मृ तदेहांची संख्या वाढत चालली आहे.

जेव्हा माणसाचा मृ त्यू होतो तेव्हा मानवाचे श रीर हे कुजते व त्याचा वास येतो. पण माउंट एव्हरेस्टच्या डेथ झोन मध्ये ज्यांचा मृ त्यू होतो वर्षानुवर्षे त्याच कंडिशन मध्ये आहेत कारण तिथे तापमान -14 ते -16 असल्यामुळे बॉडी तसेच्या तसे राहतात ना ते कुजतात ना त्यांना कोणता जनावर खातो. त्यामुळे तेथील मृ तदेहांची संख्या वाढत चालली आहे.

हे मृ तदेह परत आणण्याचे काम सरकार का करत नाही? बर्फाळ ठिकाणांवर उतार खूप असतो आणि ऑक्सिजनची पातळी कमी असणाऱ्या ठिकाणाहून बर्फाची साठलेली गादी खोडून मृ तदेह बाहेर काढणे हे जोखमीचे काम आहे. अशावेळी ते मृ तदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या लोकांच्या जी वालाही धोका असू शकतो. जेव्हा तो बर्फ तो डण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा मोठ्या प्रमाणात लॅन्ड स्लाईड होण्याची शक्यता जास्त असते आणि यामुळे दुसऱ्या गिर्यारोहकांना धो का होऊ शकतो.

यामुळे सरकार ही रिस्क घेऊ शकत नाही आणि मृ त लोकांचे देह काढण्यासाठी जी वंत लोकांचा प्रा ण धोक्यामध्ये टाकू शकत नाही. यामुळे भरपूर मृ तदेह अजुनही तिथे पडून आहेत. ते हलवण्यासाठी मोठ्या योजनेची आणि हिमतीची गरज आहे. माउंट एव्हरेस्ट वरील हे वाढते मृ तदेह, कचरा आणि गिर्यारोहकांनी फेकून दिलेल्या वस्तू यांचा साठा वाढत चालला आहे आणि त्यामुळे एवढी रिस्क घेऊन माउंट एव्हरेस्ट वर चढण्याची मोहीम आखणे खरच गरजेचे आहे का? याबद्दल विचार केला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *