एक स्त्री केव्हा समाधानी असते? नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे..

लाईफ स्टाईल

मित्रांनो नमस्कार! स्त्रीचे स्थान आपल्या प्रत्येकाच्या जी वनात अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. स्त्री मग ती आई असो, बहीण असो, आजी असो की मग पत्नी असो.. प्रत्येकालाच सुखावणारी, फुलावणारी, प्रेम करणारी ती स्त्री प्रत्येकाकडे असतेच असते. पण तिचे ही ऋण फेडायला नको का मग? तिलाही आपल्याकडून सुखाची अपेक्षा असतेच ना?

मग आपण आपल्या पत्नीला, आईला, आजीला आणि बहिणीला कसे बरे सुख द्यावे? कशाने तीं समाधानी होईल बरे? चला तर मग करूया चर्चा… भारतीय संस्कृतीने स्त्रीला लक्ष्मी मानले. कारण तिची महत्ता आहेही तशीच. पाहा ना, ज्या घरची स्त्री सुखी, समाधानी असते ते घर आपोआपच प्रगतीपथावर असते. आणि ज्या घरात स्त्रीला मानाचे स्थान नसते ते घर प्रगती करत नाही.

भलेही मग त्या घरचे पुरुष कमावणारे का असेना. पण पैसा त्यांच्या घरात थांबतच नाही. पण ज्या घरी स्त्रीला आदराने वागवल्या जाते, तिला सन्मानाने पाहिल्या जाते त्या घरात पैसा कमी राहू शकेल पण सुख, प्रसन्नता, उत्साह दिसतोच दिसतो. पण सुख आणि दुःख या मनाच्या कल्पना असतात. एखाद्याला एखाद्या गोष्टीत सुख मिळत असेल पण तेच सुख त्याच गोष्टीत दुसऱ्याला मिळत असेल याची काही शाश्वती नसते.

त्यामुळे आपापल्या स्वभावानुसार, आवडी निवडी, इच्छेनुसार प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना आणि दुःखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. जसे अधिक थोडे सविस्तर जाणून घेऊ. समजा एखाद्याची पत्नी आहे. तिला बाहेर जायला, कार्यक्रमात जायला, फिरायला आवडत असेल. पण तीच दुसरी एक स्त्री आहे तिला या सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ टाइमपास आहे असे वाटत असेल. आणि घर सांभाळणे, घरच्यांची सेवा करणे, आपले बाळ सांभाळणे यात तिला आनंद वाटत असेल.

तर अशाप्रकारे दोघींच्या आवडी आणि सुख देणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण सुख द्यायचं आहे, स्त्रीला समाधानी ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला व्यक्ती पाहून त्याप्रमाणे त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे गरजेचे असते. आई : आई म्हणजे साक्षात देवता जी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते, जी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडते.

आपल्याला कायम सुखाचेच वारे लागावे, सुखाची ऊब मिळावी, दुःख आपल्याला स्पर्शही करू नये असेच जिला वाटते ती आई असते. आईला समाधानी ठेऊ. मग त्यासाठी आईची सुद्धा इच्छा पूर्ण करणे गरजेचे आहे ना? आईच्या मनाने ऐकणे, तिनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे, आपले वर्तन असे ठेवणे जेणेकरून कोणी आपल्याला बोल लावणार नाही.

आपल्या व्यवहाराने लोकांना त्रा स होणार नाही, उलट सहकार्य होईल. अशाने आपली किर्ती वाढेल. आणि त्याने आईला प्रेम, सुख मिळेल. आपल्या आईचेही कौतुक होईल. असा पराक्रम करणे जेणेकरून आपल्या आईला वाटेल की माझी कूस धन्य झाली ज्यायोगे माझा हा मुलगा/मुलगी माझ्या पोटी जन्माला आले. अशाने आपण आपल्या आईच्या संस्काराचा परिचय करून देऊ.

पत्नी : पत्नी महत्वाची आहे मित्रांनो.. इथून आपल्या आयुष्याचा दुसरा अध्याय, चॅ प्टर सुरू होतो. आईच्या मायेने सुखावून आता पत्नीची जबाबदारी सांभाळायची असते. नवीन घरची मुलगी असते, स्वभाव, आवडी निवडी इत्यादी सारेच नवीन असते. सावरून घ्यायचे असते, जुळवून घ्यायचे असते. मग अशावेळी पत्नीला सुखी ठेवण्यासाठी चांगले प्रयत्न करणे गरजेचे असते.

तिला समजून घेणे गरजेचे असते. तिच्यासाठी सुद्धा आपण नवीन असतो. ती आपला आदर करेल असेच आपले वर्तन असणे अपेक्षित असते. दोघांनी ही एकमेकांचा सन्मान केला तर संसारात सभ्यता नांदते. आपल्या पत्नीचे मत विचारात घेणे, तिचा आदर करणे, तिचे कौतुक करणे यामुळे ती सुखावते. तिला अधून मधून तिच्या माहेरी नेणे, माहेरच्या मंडळींशी प्रेमाचे, सलोख्याचे सं बंध निर्माण करणे महत्त्वाचे ठरते.

अशाने आपली पत्नी आपल्यावर अधिक जी व लावू शकते. त्याच सोबत शा री रिक सं बंधही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. बेड वरील से- क्स नात्यात अधिक गोडवा आणि प्रेम आणतो. त्यामुळे आपली पत्नी से- क्शु-अली समाधानी आहे ना हे ही पाहावे. अधून मधून तिच्यासाठी गजरा आणावा. तिच्या सौंदर्याचे कौतुक करावे. परस्त्रीसोबत सं बं ध ठेऊ नये. असे जर केले तर कितीही समजदार, प्रेम करणारी आपली बायको असली तरी ती हा आघात स हन करू शकत नाही. आणि अशाने तिला आपण कधीच सुख देऊ शकणार नाही हे कायम लक्षात ठेवावे.

बहीण : आदर करावा. लहान असेल तर प्रेम द्यावे. तिच्या पाठीमागे उभे राहावे. तिच्या चुका माफ करून तिला त्या सुधारण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपली बहीण म्हणजे आपली प्रतिष्ठा असते. ती वाम मार्गाला जाणार नाही आणि तिची अधिकाधिक प्रगती होईल असेच पाहावे. अशाने ती आपल्यावर अधिक जीव लावते. तिच्याशी नेहमी सुसंवाद असावा. तिच्या आवडी निवडी जपाव्या. तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. अशाने ती सुखी होऊन समाधानी राहिल.

आजी : आजीने आपल्याला लहानपणी खूप जीव लावलेला असतो. आता ती थकली असते. तिला आधाराची गरज असते. अशावेळी तिचा आधार आपण बनावे. आजीशी रोज बोलावे, तिच्या मांडीवर निजावे.. तिला हळहळ करू नये. तिला तिच्या जुन्या गोष्टी विचाराव्या.. आजीची छोटी छोटी कामे करावी. आजीला जी व लावावा. बस आजी अजून काही मागत नाही.. ती सुखाने, आनंदाने मरण स्वीकारेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *