एका एकरात कमवतो महिन्याला तब्ब्ल १५ लाख रुपये…फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी…करत आहे या प्रकारची शेती

लाईफ स्टाईल

कमालच आहे ना!हो…फक्त एक एकर मध्ये हा तरुण चक्क १५ लाख कमावतो..कोण आहे हा तरुण? आणि इतक्या कमी वेळात आणि थोडयाच जमीनीमध्ये इतका नफा तो कसा मिळवंतो? चला जाणून घेऊयात काय आहे यामागची गोष्ट आणि त्या तरुणाचे प्रयत्न, तर हा तरूण आहे फत्तेपुर येथील अल्पभुधारक शेतकरी आणि यांचे नाव आहे सोमेश्वर लवांडे.

कोरोना मधील लॉकडाउन मुळे बऱ्याच लोकांना आर्थिक फटका बसला. काही लोकांची कामे गेली काहींना उपाशी पोटी दिवस काढावे लागले. अशा कठीण काळाला सर्वानाच समोरे जावे लागले. याचेच एक उदाहरण आहे फत्तेपुर मधील हा तरुण, या अल्पभुधरक तरुण शेतकर्याने आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एक एकर शेतीमध्ये देशी आणि परदेशी चारा पीक घेऊन खूप म्हनजे अफाट फायदा मिळवला आहे.

आणि विशेष गोष्ट हि आहे कि या शेतकर्याचे शिक्षण अवघे बारावी झाले आहे. तरीसुद्धा यांचे शेती मधील व्यवस्थापनशास्राचे कौतुक करायला हवे. मोठ्या पगारच्या अमिशाने आपली थोडी जमीन सोडून, आई वडील, आपले गाव सोडून जाणाऱ्या तरूणाना हि गोष्ट विचार करायला लावण्याजोगी आहे. या तरुणाबद्दल,”शेती करावी तर अशी “या आशयाची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

सोमेश्वर ने काहीतरी हटके करायच ठरवल, आणि मग सुरुवातीला फत्तेपुर येथील सोमेश्वर श्रीधर लवांडे या युवकाने शनी शिंगणापूर येथे व्यवसाय केला. पण तिथे त्यांचे लक्ष लागेना, पुढे त्यांनी एका कंपनी मध्ये काही वर्षे जॉब केला. पण तिथे सुद्धा त्यांचे मन रमेना. मग नंतर त्यांनी त्यांची पत्नी रेणुका याच्यासोबत आहे तेवढ्या एक एकर शेती करण्याचे ठरवले.

पण त्यांना आपल्या शेतीमध्ये काहीतरी वेगळं आणि हटके असं करायच होत. याच हेतूने त्यांनी शेतामध्ये वेगळा काहीतरी प्रयोग करायचे ठरवले आणि चारा या पिकाची निवड केली आणि “हा “दुधासाठीचा सकस चारा उतरला शेतकर्याच्या पसंतीस, मग काय त्यांनी इंटरनेट, सोशल मीडिया, अशा माध्यमातुन वेगवेगळया चारा पिकांची शोधाशोध करून माहिती मिळवली.

नवनवीन पिकांचा शोध घेत असतानाच त्यांना थायलंडमधील विकसित फोर जि बुलेट सुपर नेपियर या चारा पिकांची माहिती मिळाली. हेच पीक आपल्या कडील गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल हे त्यांच्या लक्षात आले.आणि त्यांनी याच पिकाची लागवड करण्याचे ठरवले आणि लागवड केली. हे पीक कमी वेळात अधिक उत्पादन देते.

आणि हा दुधासाठी सकस असलेला चारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.त्यामुळे या चार्याचि मागणी खूप वाढत आहे. यानंतर त्यांनी इंडोनेशिया,बांगलादेश आणि ऑस्ट्रेलीया मधील चारा वाणांची लागवड केली. तसेच स्वतः संशोधन करून नवीन वाण विकसित केले. सोमेश्वर यांनी स्वतः वाण विकसित केले आणि ते बियाणे यशस्वी देखील झाले..

त्याला फोर जी बुलेट आणि इंडोनेशियाचा बाहुबली अशी नावे देण्यात आली. चारा बियाणं सोबतच त्यांनी घास, सुबाभुळ, कडवळ, हातग्, दशरथ आणि राय घासाचे बियाणे तयार करून त्याची विक्री चालू केली आहे. या सर्व बियाणंची आता देशभरातुन ऑनलाइन मागणी वाढली आणि त्यामुळे सोमेश्वर यांनी गावातील इतरांची शेती करारावर घेऊन चारा लागवड केली.

आणि या सर्व जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नाने त्यांनी फक्त एक एकर शेतीतुन केवळ एक वर्षात चक्क १५ लाख रुपयांचा भरघोस नफा मिळवला आहे, इतकेच काय तर ४ कामगार फक्त फोन घेण्यासाठी आहेत, फक्त कष्ट करण्याची तयारी आणि आटोकाट प्रयत्न करण्याची तयारी ठेवणाऱ्या या ध्येय वेड्या युवा शेतकऱ्याकडे सध्या १५ मजूर कामाला आहेत.

खास करुन प्लॉट ची माहिती देण्याकरीता आणि देशभरतुन येणारे फोन घेण्यासाठी चार जण कामाला ठेवले आहेत. या ठिकाणी भेट द्यायला येणाऱ्या ची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एवढेंच काय तर सोमेश्वर यांनी देशातील सर्व राज्याबरोबरच सौदी अरेबिया, नेपाल येथील शेतकऱ्यांना सुद्धा बियाणं ची विक्री केली आहे.

वर्षात घेतात ३०० टन चारा:- त्यांनी चारा पिकाचा प्रयोग चालू केल्यानंतर त्यांना अनेक लोकांनी नावे ठेवली पण सोमेश्वर यांनी त्यांचाकडे दुर्लक्ष केले आणि आपले ध्येय, जिद्द आणि प्रयत्न चालुच ठेवले आणि ते यशस्वी झाले. या पिका बाबत ते म्हणतात, एकरी बारा हजार डोळे म्हणजेच बेणे आवश्यक आहेत. सारी पद्धतीने तीन फूट बाय एक फूट अंतरावर लागवड करावी.

यानंतर वर्षात ३ ते ४ कापन्या होतात.हा चारा सुमारे १५ ते १८ फूट उंच वाढतो आणि तुम्हाला वर्षभरात ३०० टन चारा यामधुन मिळतो. तर तरुण मित्रमंडळी, आपल्याला नक्कीच यांच्या कडून प्रेरणा मिळेल. तुम्ही सुद्धा सोमेश्वर यांचा सारखे ध्येय, कष्ट आणि प्रयत्न हि त्रिसूत्री आवलंबली तर तुमचा देखील फायदा होऊ शकतो. शेवटी कष्ट करण्याला पर्याय नाही, शेवटी ध्येय आणि त्यासाठी प्रयत्न केलात तर तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *