नमस्कार मित्रांनो, भारताच्या स्वरकोकिळा म्हणून लता मंगेशकर यांना ओळ्खले जाते. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या करियरमध्ये पन्नास हजाराहुन अधिक गाणी गायली आहेत आणि ती सर्वच गाणी सुपरहिट ठरली. भारताची स्वरकोकिळा लता मंगेशकर या गायनाच्या दुनियेतील कोहिनुर आहेत.
त्यांनी जवळजवळ पाच पिढ्यांना आपला आवाज दिला आहे. जगभरात त्यांचे अनेक चाहते आहेत. पण रविवारी 6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील रु ग्णालयात त्यांनी अखेरचा श्वा स घेतला. यामुळे संपूर्ण देशावर दुःखाचे डोंगर को सळले आहे. जगातील दिगग्ज नेते, मोठं मोठे अभिनेत्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वच लोक दुःखी झाले आहेत.
मध्यप्रदेशमधील इंदोर मध्ये त्यांचा जन्म झाला. रंगमंचावरील गायन पंडित दिनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील होते. लहानपणापासूनच त्यांना गायनाची आवड होती. त्यांच्या आवाजात इतकी जबरदस्त जादू होती, त्यांना जणू सरस्वतीचाच आशीर्वाद होता. त्या हिंदी फिल्म सृष्टीतील टॉप सिंगर होत्या.
80 वर्षांपेक्षा जास्त वेळ त्यांनी गायन करियरला दिले आणि भारताला इतक्या मधुर आवाजाची गाणी दिली. जवळजवळ 50 हजाराहून अधिक गाणी त्यांनी गायली आहेत. 36 भाषेमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत आणि यावरूनच तुम्ही त्यांचे टॅलेंट समजू शकता. आपली मेहनत आणि टॅलेंट वर त्यांनी बॉलिवूड मध्ये आपलं नाव केलं.
आज भलेही त्या आपल्या मध्ये नाहीत पण त्यांनी आपल्या मागे करोडोची संपत्ती सोडली आहे. लता मंगेशकर यांचे जी वन काही सामान्य जी वन नव्हते, अत्यंत आलिशान जी वन जगत होत्या त्या. त्यांची पहिली कमाई ही पंचवीस रुपयांची होती. पण आपल्या मेहनतीने ओळख निर्माण करणाऱ्या लता दीदीच्या पायी यश लोळू लागले
व पंचवीस रुपयांनी सुरू झालेला हा प्रवास भल्या मोठ्या संपत्तीत रुपांतरीत झाला. त्यांची संपूर्ण संपत्ती ही 368 कोटी रुपयांची आहे. मुंबईतील अतिशय हायफाय भागात म्हणजे मुंबईतील पेडर रोडवर त्यांचे घर आहे आणि त्याचे नाव प्रभुकुंज असे आहे. नेहमी सामान्य पेहरावा करणाऱ्या लता दिदींना गाड्यांची खुप आवड होती.
लग्जरी गाड्यांचे कलेक्शन त्यांच्याकडे होते, त्यांच्या कलेक्शन मध्ये मर्सिडीज, शेवरेल आणि क्रिस्टलर या गाड्या आहेत. एका रिपोर्ट नुसार निर्माता यश चोप्रा यांनी विरजारा या गाण्याच्या रिलीज दरम्यान मर्सिडीज कार गिफ्ट दिली होती ती ही त्यांच्या संपत्तीमध्ये सामील आहे. याचबरोबर लता दीदींकडे मुंबई आणि पुणे येथे काही फ्लॅट्स आणि प्लॉटस देखील आहेत.
स्वरकोकीळा लता मंगेशकर यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता, 2007 मध्ये फ्रान्स सरकार द्वारा ऑफिसर ऑफ द रिजन या सन्मानाने पुरस्कारीत केले होते. याशिवाय पदमभूषण, पदमविभूषण, महाराष्ट्रभूषण, एन टी आर, एन आर राष्ट्रीय पुरस्कार हे पुरस्कार मिळाले आहेत आणि हे पुरस्कार त्यांच्या जी वनातील ती कमाई आहे ज्याचा हिस्सा कधीच कोणी घेऊ शकत नाही.
त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या पुरस्काराची संपत्ती ही त्यांच्या नावासोबत नेहमी इज्जतीने व सन्मानाने घेतली जाईल. भारतरत्न लता मंगेशकर हे एक नाव नसून एक युग आहे, लता मंगेशकर यांचे जाणे म्हणजे एक युग संपल्यासारखे आहे.