उच्च शिक्षित असलेलया या तरुणाने मूल होत नाही म्हणून जे केले ते पाहून धक्का बसेल..

लाईफ स्टाईल

तर एका दवाखान्यापुढे एक अलिशान कार थांबली. त्यातून विराज उतरला. डॉ सानेंचा पेशंट. नेहमी तो आणि त्याची पत्नी यायचे. लग्नाला ४ वर्षै झाली तरी अपत्य नव्हते. तो आत येईपर्यंत सानेनी मला त्याची हिस्ट्री सांगितली. विराजने कारच्या दुसऱ्या बाजूला जाऊन दार उघडले. आतून झगझगीत साडी घातलेली तरूणी उतरली. दोघेही द वाखान्यात आले.

तिला सर्दी खोकला किरकोळ आ जार होता. तिला तपासतांना सानेनी ही कोण असे विचारले. त्याने नंतर सांगतो आशी खू ण केली. उपचार घेऊन ती बाहेर गेल्यावर तो म्हणाला,” डॉ क्टर काका ही तुमची नवीन सून” विराज खूप लहान असल्यापासून त्याचे आई बाबा त्याला घेऊन सानेंकडे यायचे, त्यामुळे तो त्यांना काकाचं म्हणायचा. “म्हणजे ?” मी न समजून विचारले.

त्याच्या बोलण्याच नवल वाटून त्या दोघान मध्ये मी बोलले, उगाच. तसं विराज ३/४ वेळा येऊन गेला होता,त्यामुळे माझी आणि त्याची जुजबी ओळख होती. आणि त्या माहिती प्रमाणे विराजने कविता सोबत लग्न केल होत. तेही घरच्यांच्या वि रोधात जाऊन..”सॉरी, मी खूप पटकन बोलून गेले, पण तुमच्यासोबत कविता… मी पुढे काही बोलू शकले नाही. आपण या क्लि निक मध्ये नवीन असून एवढी चौकशी कारण मला चुकीच वाटल.

म्हणजे मी कविताला घट स्फो ट दिला” माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तो साने डॉ क्टरांना सांगू लागला. “काय?” आश्चर्यचकित होण्याची वेळ आता डॉ क्टर सा नेंची होती. माझ्यासमोर कविताचा हसतमुख सोज्वळ चेहरा आला. नेहमी विराजची काळजी घ्यायची. “तुम्हाला तर माहीत आहे. आम्हाला मुलबाळ होत, नव्हते. कवीतेत दो ष होता. तुम्हीच तर पाठवल होतना सुरूवातीला तज्ञ डॉ क्टरांकडे “हो पण दो ष मोठा नव्हता रे. ट्री टमेंटने फरक पडला असता ना..!

सर्व डॉ क्टर असेच म्हणायचे ना?”“पण किती वर्षे ? अगदी पुण्यामुंबईला पण दाखविले. पाण्यासारखा पैसा खर्च केला पण फरक पडला नाही “पण कविता हो म्हणाली ?” माझा प्रश्न. “तिचं हो म्हणाली. तिचे वडील तर ऐकतच नव्हते. मी तर अगोदरच सांगितले होते पैशाचा प्रश्न नाही. कवितेला जन्मभर पोसायची जबाबदारी माझी. शेवटी कवितेनेच वडीलांची समजूत घातली.”

तरीही माझ्या मनाला पटेना. “थोडे अजून प्रयत्न करायला हवे होते.” मी गुळमुळीतपणे म्हणाले. “किती वर्षे ? माझही वय वाढत चालल आहे. आईलाही नातू किंवा नात हवी आहे. शेवटी केलं दुसरं लग्न. माझी फी देऊन तो निघून गेला पण माझ मन स्वास्थ्य हिरावून गेला. नंतर काही दिवसांनी शिवा म्हणून हमाली करणारा तरूण आला. त्यालाही लग्नानंतर मुल बाळ होत नव्हते.

त्याच्या बायकोची तपासणी केली तर तिला पा ळीच येतच नव्हती. तिला सिनीयर मैडमकडे तपासायला पाठवले. ते सर्व रिपोर्ट घेऊन तो आला होता. “काय रे. काय म्हणाल्या मैडम? “त्यास्नी तुम्हाला फोन कराया सांगितलं आहे जी.. “ठीक आहे” मी मैडमचा नंबर फिरवला. “हैलो काव्या .” समोरून मैडम म्हणाल्या “मी तिला ए क्झा मीन केलं. तिची सोनो ग्राफी पण केली.

अरे मेन प्रॉ ब्लेम हा आहे की तिला यु टेरसच नाही. शिवाय तिचे बाकीचे रि प्रॉड क्टीव्ह अर्गन्स….”माझा चेहरा शक्यतो कोरा ठेवण्याचा प्रयत्न करत मी मैडमचे बोलणे ऐकलं फोन ठेवल्यावर चेहर्यावरचा घाम पुसला. आता शिवाला त्याची बायको कधीही आई बनू शकणार नाही हे कसं सांगायचे या विवंचनेत मी होते. तेवढ्यात तोच म्हणाला

“मैडमबाईने आम्हाला समद सांगितले. देवाच्या मर्जीपुढे कोणाच चालतयं व्हय? मी हिला म्हणलो असू दे. या नशीबाच्या गोष्टी. कधीतरी देवाकडून बी व्हती चूक, माझ्या भावाला मोप चारपाच पोरं हाईती. त्यातला एखादा ठिऊन घेऊ. ”शिवा बोलत होता आणि मी सुन्न होऊन ऐकत होतो. नकळत अभी आणि शिवाची तुलना मनात झाली. पैशाने अभी नक्कीच श्रीमंत होता पण मनाच्या श्रीमंतीत तो शिवाच्या आसपासही नव्हता .

मी काहीच बोलत नाही बघून शिवाने रिपोर्ट टेबलावर ठेवले.” येतो साहेब मी” म्हणून तो निघणार तोच मी त्याच्या हातावर थोपटले. त्या स्पर्शाने माझ्या भावना त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहचल्या. तो समाधानाने हसला आणि परत जायला निघाला. मला सानेनकडे येणारा विराज याच्यापेक्षा जास्त अशिक्षित वाटला तेंव्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *