आज निलेश डबा न घेताच ऑफिसला गेला. शैलाताईनी वसंतरावांना हाक दिली, अहो जरा ऐकता का? निलेश ला ऑफिस मध्ये डबा देऊन येता का? सकाळी तो डबा न घेताच ऑफिसला गेला. वसंतरावांना वाटले काही झाले आहे का. त्यांनी शैला ताईंना विचारले काय झाले? त्याचा रा ग अजूनही गेला नाही का? त्याने डबा का नेला नाही? यावर शैलाताई सांगतात, नाही हो.
आज निलेशच्या ऑफिसमध्ये चेअरमन साहेब येणार आहेत. म्हणून निलेश सकाळी लवकरच सात वाजता ऑफिसला गेला. त्यामुळे सकाळी लवकर डबा तयार झालेला नव्हता. ठीक आहे डबा दे त्याला देऊन येतो. येताना काही घेऊन यायचे आहे का? असे विचारत वसंतराव चहाचा कप ठेवतात. आणि आवरण्यासाठी रूम मध्ये निघून जातात. वसंतरावांनी डबा देण्यासाठी होकार देताच शैला ताईंना हायसे वाटले. कारण त्यांचा आणि निलेशचा झालेला वा द वसंतरावांनी ऐकलेला नव्हता.
काल झालेला वा द: निलेश नेहमीच खा पर फो डायचा. काय केलं वडिलांनी आमच्यासाठी? वडिलांनी आमच्यासाठी काही केले आहे का? हा त्यांच्यातला नेहमीच वा दाचा विषय असायचा. वडिलांनी आपल्यासाठी काहीच केले नाही हा गैरसमज निलेशच्या म नात रुजत होता. तो सारखे आई वडीलानबरोबर भांडायचा. म्हणायचा, माझ्या मित्राचे वडील देखील शिक्षक होते. बघा त्यांनी आता मोठा बंगला बांधला आहे. गाड्या घेतल्या आहेत. नाहीतर तुम्ही, अजून सुद्धा आम्हाला भाड्याच्या घरात ठेवले.
निलेशचा पा रा च ढला होता. तो खूप रा गारा गाने आणि ता वाता वाने बोलत होता. शैलाताई त्याला समजावत होत्या, तुला माहित आहे ना? तुझे वडील घरातील सर्वात मोठे आहेत. लहान दोन बहिणी आणि दोन भावांची ल ग्न त्यांनाच पार पाडावी लागली होती. त्यांना मोठमोठे खर्च बघावे लागत होते. को र्टक चेऱ्या, शेतीची काम, शिवाय घरातल्या साऱ्या जबाबदाऱ्या त्यांच्याच खांद्यावर होत्या. तरी देखील निलेश ऐकायला तयार नव्हता.
तो म्हणत होता, बाबांनी त्यांच्या भावा बहिणींसाठी इतक्या ख स्ता खाल्ल्या, त्रा स स हन केला, ह लाखीत जी वन काढले त री सुद्धा त्यांना तुम्हाला मदतीचा हात पुढे करता आला नाही. ते आत्ता मोठ मोठ्या बंगल्यात राहत आहेत. सुखी जी वन जगत आहेत. निदान त्यांनी तुम्हाला आत्ता घर तरी बां धून द्यायला हवं होतं. बापानं माझ्यासाठी काय केलं? निलेशच हे बोलणं ऐकून शैला ताईंच्या डोळ्यात पाणी आलं. शैलाताई निलेशला समजून सांगू लागल्या, तुझ्या बाबांनी त्यांची सर्व कर्तव्य पार पाडली, बहिणीकडून कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत.
शैलाताई कितीही समजून सांगत असल्या तरी निलेशचा तो गैरसमज काही जात नव्हता. शैलाताई पुन्हा पुन्हा त्याला समजावत होत्या. तुझ्या बाबांनी कित्येक वर्षे मोफत क्लासेस घेतले. हजारो मुलांना शिक्षण दिले. गरिबांच्या मुलांना शिक्षणात मदत केली. त्यांनी कधीही फी घेतली नाही. त्यांनी जर फी घेतली असती तर आज ही परिस्थिती नसती. परंतु त्यांचे एक त त्व होते. ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत. पुन्हा निलेश रा गाने म्हणाला, इतकी प्रसिद्धी, इतके पुरस्कार मिळून काही उपयोग झाला का? हा पुरस्कार यांना कोणीही विचारत नाही.
हा वा द चालू असतानाच वसंतराव अचानक आत आले. त्यांना पाहून निलेश घा बरला. बाबांनी काही ऐकले नसेल ना? या भी तीने तो थ रथ रत होता. पण वसंतराव एकही शब्द न बोलता तिथून परतले. निलेश आणि शैलाताई दोघेही घा बरून शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी वसंतरावांनी निलेशला डब्बा देण्यासाठी सायकल काढली. आणि ते सायकलीवरून निलेशच्या ऑफिस च्या गेट मध्ये आले. सायकलवरून आल्यामुळे चांगलीच धा प लागली होती.
गेट मध्ये येताच सि क्युरिटी गा र्ड ने त्यांना अडवले. वसंतरावांनी त्याला सांगितले, निलेश पाटील यांचा डबा द्यायचा आहे. तुम्ही मला आत का सोडत नाही? तर सि क्युरि टी गा र्ड म्हणाला, चेअरमन साहेब आले आहेत. आत मध्ये त्यांची मि टिंग चालू आहे. कोणत्याही क्षणी मि टिंग संपून ते बाहेर येतील. तुम्ही जरा लांबच थांबा. वसंतराव थोड्या अंतरावर जाऊन उभे राहिले. थोडावेळ म्हणता म्हणता बराच वेळ उलटून गेला. वसंतरावांचे पाय दु खत होते.
इतक्यातच मी टिंग सं पली. चेअरमन साहेब, अ धिकारी आणि निलेश बाहेर आले. निलेश बाबांकडे पाहून चि डला. चेअरमन साहेब गाडीचे दार उघडून गाडीत बसणार इतक्यातच त्यांचे तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीवर लक्ष गेले. सि क्युरि टी गा र्डला विचारताच गा र्डने सांगितले की, ते राहुल पाटील साहेबांचे वडील आहेत. त्यांना डबा देण्यासाठी ते आले आहेत. चेअरमन साहेब वसंतरावांकडे जात होते. हे पाहून निलेश खूपच घा बरला.
चेअरमन साहेब वसंतरावांच्या जवळ गेले. आणि त्यांना विचारू लागले, तुम्ही हायस्कूलमध्ये शिक्षक होतात ना? वसंतराव हो म्हणाले. सर्वजण आश्चर्यचकित झाले. चेअरमन साहेब आपली ओळख करून देऊ लागले, सर मी, अखिल अग्रवाल. मी तुमच्याकडे क्लासला यायचो. वसंतराव म्हणाले, हो ओळखले मी. खूप मोठे झालात! चेअरमन साहेब म्हणाले, सर तुम्ही उन्हात का उभे आहे? चला ना आपण आत जाऊन गप्पा मारू.
चेअरमन साहेबांनी वसंतरावांचा हात ध रून त्यांना आत नेले. आपल्या खुर्चीत त्यांना बसवले. परंतु वसंतरावांनी त्याला न कार दिला. चेअरमन साहेब तिथेच उभ्या असलेल्या अ धिकार्याला आणि निलेश ला सांगत होते, पाटील सर नसते तर ही कंपनी मी उभी करू शकलो नसतो. मी आमचे धान्याचे दुकान सांभाळत बसलो असतो. हे ऐकून ते दोघे आश्चर्यचकित झाले. चेअरमन साहेब पुढे सांगू लागले, मी लहान होतो त्यावेळी अभ्यासात खूपच ढ होतो.
माझे अभ्यासात लक्ष लागायचे नाही. मोठमोठे क्लास लावले तरी सुद्धा. आमच्या शाळेत पाटील सरच क डक आणि शि स्तबद्ध शिक्षक होते. माझ्या आईने पाटील सरांना माझी शिकवणी घेण्यासाठी खूप विनवणी केली. परंतु आपली खोली लहान असल्याने सरांनी न कार दिला. मग आईने आमच्या घरी येऊन शिकवा अशी खूप विनवणी केली. शेवटी पाटील सर तयार झाले. मी अभ्यास करत नव्हतो. म्हणून सरांनी मला ब दडून काढले. पण नंतर त्यांनीच मला अभ्यासाची गोडी लावली. मला अभ्यास करायला खूप आवडू लागले. इंग्रजी आणि विज्ञान हा तर माझ्या आवडीचा विषय बनला.
उभ्या असलेल्या अधिकाऱ्याने चेअरमन साहेबांना प्रश्न विचारला, तुम्ही सरांना फी दिली की नाही? चेअरमन साहेब म्हणाले, मी चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर माझे आई-वडील पेढ्यांचा बॉक्स घेऊन सरांकडे आले. माझ्या वडिलांनी सरांना एक लाख रु पयाचा चे क दिला. परंतु सरांनी तो ना कारला. हे शब्द आजही मला आठवतात. सर म्हणाले, मी तर माझं फक्त काम केलं. तुमचा मुलगा आधीपासूनच हुशार होता. मी त्याला फक्त चांगला मार्ग दाखवला. त्याने अभ्यास केला म्हणून त्याला चांगले मार्क पडले.
चेअरमन साहेब म्हणाले, पाटील सरांसारखे शिक्षक क्वचितच आढळतात. माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिकवले आहे. पाटील सरांन मुळेच मी आज या पदावर आहे. हे सर्व दृश्य पाहून निलेशच्या पायाखालची जमीनच स रकली. त्याला अ श्रू अ नावर झाले. त्याने त्याच्या बाबांना घ ट्ट मिठी मा रली. आणि त्यांची मा फी मागितली. आता निलेशला समजून आले, बापाने माझ्यासाठी काय केल…