इंग्रजांनी नोट छपाईसाठी नाशिक हे ठिकाणचं का निवडलं!…काय होता त्यावेळी त्यांचा विचार..काय आहे त्यामागील रहस्यमय कारण..ज्यामुळे

लाईफ स्टाईल

पैसा ही एक अशी गोष्ट आहे की, माणसाला शेवटपर्यंत त्याची हाव सुटत नाही. आज जगात प्रत्येक जण पैशांच्या मागे धावत आहे. पैसा मिळवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. तस तर ते खरंच आहे., कारण, आज माणसाला पैशाशिवाय किंमत नाही. चला तर मग पाहूया याच पैशाचा जन्म कुठे आणि कसा झाला? हे माहित आहे का तुम्हाला? भारतात फक्त चारच ठिकाणी नोटा छापल्या जातात. महाराष्ट्रातील नाशिक मध्ये, मध्य प्रदेशातील देवास येथे, कर्नाटकातील म्हैसूर येथे आणि पश्चिम बंगालमधील सलबोनी.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का? भारतातील पहिला नोट छपाई कारखाना हा नाशिक येथे उभारण्यात आलेला होता. पण इंग्रजांनी नोट छपाईसाठी नाशिक हेच ठिकाण का निवडलं हे पाहूया. पैसा छापणे हा नाशिकातील खूप जुना व्यवसाय आहे. आज सुद्धा नाशिक मध्ये भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. येथीलच टांकसाळे वाड्यात  मुठ्ठल नावाचा परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनाव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशिक मधील टांकसाळ येथून 1769 ते 1772 या कालावधीत नाणी पाडत असत.

पेशवाई काळात स रकार नाणी पाडण्याच्या भा नगडीत पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय करताना मात्र स रकारची परवानगी घ्यावी लागायची. अर्थातच स रकार नाणी पाडण्याचा मोबदला घेत असे. 1750 च्या सुमारास दोन कासारान्ना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षांच्या लायसन साठी त्यांना 125 रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिर्‍हाईकाने नाणी पाडण्यासाठी टांकसाळईत चांदी जमा करायची. आणि दर शेकडा नाण्यान मागे स रकारला काही कर द्यावा लागत असे.

1765 मध्ये नाशिक मधल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधवराव पेशवे यांच्या परवानगीने येथे टांकसाळ चालू केली. पेशवाईतील नाणी फारशी लिपीत नव्हती आणि मुघल राजांच्या नावाने ओळखली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ्या रयतेला मोगलाई पासून चालत आलेले चलन परिचयाचे होते. रयतेच्या सोयीसाठी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तशाच नक्षीकामाचे चलन पेशव्यांनी चालू ठेवले. नाण्यांवर गुलशनाबाद उर्फ ना असा उल्लेख सापडतो . हे ना म्हणजेच नाशिक. चांदवडच्या टांकसाळ येथून निघालेल्या नाण्यांवर जाफराबाद उर्फ चांदवडचा उल्लेख आढळतो.

1665 च्या सुमारास औरंगजेबाने चांदवडचे जाफराबाद करून टाकले होते. पेशव्यांचे से नाधिकारी तुकोजी होळकर यांनी चांदवडच्या किल्ल्यावर एका कारकुनाला सोने चांदी तांबे नाणी पाडण्याचा परवाना दिला होता. पण नंतर सुमारे1800 च्या दरम्यान हे टांकसाळ चांदवड शहरात आले. त्यावेळी टांकसाळ मध्ये दहा तासात वीस हजार नाणी पाडली जायची. सन अठराशेच्या नंतर एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल ब ळावत चालला होता. सुरुवातीला त्यांनी त्या त्या ठिकाणची ची नानी व्यापारासाठी वापरली.

सुमारे 1830 पर्यंत तरी स्थानिक नाणे आणि टांकसाळी या परिस्थितीत चालू ठेवल्या. पण 1835 ला इंग्रजांनी नाणे विषयक का यदा केला. संपूर्ण हिंदुस्थानात एक प्रकारची नाणी वापराची स क्ती केली. नाण्याच्या एका बाजूला किंमत लिहिलेली असे आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीच्या चौथ्या विल्यम आणि 1840  नंतर विक्टोरिया राणी चे चित्र. 1830  मध्ये मुंबईतील जॉन्स वेकेन्सी नामक अभियंत्याने नवीन टांकसाळ बांधले. आणि जेम्स वारिश नामक साहेबाच्या नेतृत्वाखाली इथली सर्व नाणी मुंबईच्या नवीन टांकसाळइत पाडू जाऊ लागली.

तोपर्यंत  टांकसाळत धातू तापवून लवचिक करून हातोड्याने बनवूनच नाणी केली जायची. पण याच कालावधीत इंग्लंड मध्ये जोरदार औद्योगिक क्रांती झाली होती. ती मुख्यतः वाफेवर चालणाऱ्या जेम्स वॅटच्या इंजिनाच्या जोरावर. मुंबईच्या नव्या टांकसाळत जेम्स साहेबांनी तीन वाफेवर चालणारी इंजिने बसवली. आधी वीस पंचवीस हजार नाणी दिवसागणिक पडायची आता इंजिन आल्यावर दीड लाख टन आणि मुंबईच्या टांकसाळी मध्ये पडू लागले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर हिंदुस्थानातल्या रुपये बरोबर इंग्रज साहेबांनी त्यांना इंग्लंड मध्ये लागणारी नाणी लाखांच्या संख्येने इथे छापून तिकडे नेली.

पण पहिल्या महायु द्धामुळे चांदीचा प्रचंड तु टवडा निर्माण झाला. आणि साहेबाच्या डोक्यात हिंदुस्थानात कागदी रुपये छापायचे कल्पना आली. इंग्रज व्यापारांच्या कलकत्ता  मद्रास मुंबई सारख्या ठिकाणी काही बँका होत्या. त्या त्या ठिकाणच्या स्थानिक व्यवहारासाठी या बँका कागदी नोटा वापरायच्या. पण हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या नोटा  इंग्लंडमध्येच छापल्या जायच्या. तिथून इकडे यायच्या. पण नाण्यानमुळे काम चालत असल्याने नोटा तिकडे छापून इकडे आणण्याची अडचण वाटत नव्हती.

पण चांदीच्या तुटवड्यामुळे इंग्रजांना कागदी नोटा हिंदुस्थानात कोठेतरी छापायचं होत्या. रंगून,  कराची, ढाका, कलकत्ता, लाहोर, कानपूर, मद्रास, दिल्ली, पुणे, बेंगलोर ही महत्त्वाची ठिकाणे बाजूला सारून साहेबाला नाशिकनेच भुरळ घातली. नाशिकची निवड नोटा छापणया करिता इंग्रजांनी सखोल विचार करूनच केली होती. एक तर नाशिक मुंबईच्या जवळ आहे. हवामानाच्या बाबतीत नाशिक सुरुवातीपासूनच सरस. कुठल्याच मौसमात अतिरेक नाही.

पण वर्षभराच्या तुलनेने थंड हवेचे ठिकाण, उन्हाळ्यात दिवसातले काही तास सोडले तर अन्यत्र हरे नाशिकात सुखद हवामान. साठ वर्षांपूर्वी चालू झालेली रेल्वे हे सुद्धा एक महत्वाचे कारण होते. ज्यामुळे साहेबाला नोट छापण्यासाठी नाशिक योग्य वाटले. शेजारी देवळाधी होते. सुरुवातीपासूनच इंग्रज सै न्याचा तळ ठोकण्याचे ठिकाण. त्यामुळे नोटा तयार झाल्यावर रेल्वेतील वाहतूक करताना आवश्यक असणाऱ्या सं रक्षणाची तयारी सुद्धा इथेच होती. एका व्यवसायाची अनोख्या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात महत्त्वाची आवश्यक बाब म्हणजे मनुष्यबळाची.

विसाव्या शतकापर्यंत हजारो वर्षे नाशिक मध्ये असणाऱ्या आणि बहरत गेलेल्या उद्योग आणि व्यापारामुळे नाशिक हे एक उद्यमशील शहर होते. आणि त्यामुळेच इथे एका नवीन उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कारागिरांची आणि मनुष्यबळाची काहीच क मतरता नव्हती आणि आजही नाही. अशा अनेक मुद्द्यांच्या सारासार विचारानंतर इंग्रजांनी नाशिक मध्ये नोटा छापण्याचा निर्णय घेतला. आणि 1928 साली नोटा छापण्याचा कारखाना चालू झाला. उद्योगाच्या बदललेल्या व्याख्येनुसार हा नाशिक मधला कारखाना ज्यामध्ये एकाच छताखाली हजारो लोकांना नोकरी मिळाली.

आधुनिक नाशिकच्या इतिहासातील हा नोट प्रेस एक महत्त्वाचा टप्पा आहे. नोटा बरोबर स्टॅम्प पेपर, पोस्टाची तिकिटे, पासपोर्ट, विजा आणि अशा अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची छपाई येथे आज होते. नोट प्रेस आणि सि क्युरिटी प्रेस मुळे येथे साधारणपणे पाच हजार लोक येथे काम करतात. खरंच, आजच्या काळात पैसा हे खूपच महत्त्वाचे साधन झाले आहे. पैशाशिवाय कोणतेही काम म्हणजे कठीणच! पैशांशिवाय खूप कामे अडून राहतात.

जिकडे जावे तिकडे पैसे द्या आणि काम करून घ्या. या पैशांअभावी कोणाला उपाशीपोटी राहायला लागू नये हीच सदिच्छा! रोजगार उपलब्ध होऊन प्रत्येकाला (गरिबांना) पोटाची खळगी भरणे इतका तरी पैसा मिळो हीच इच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *