या एका कारणांमुळे श्री राम यांनी आपल्या आपल्या भावाला म्हणजेच लक्ष्मणाला दिला ‘मृत्युदंड’…जाणून घ्या असे काय केले होते लक्ष्मणाने…ज्यामुळे लक्ष्मणाला

धार्मिक

आपल्या सर्वाना माहित आहे कि भगवान विष्णू हे सातवा अवतार घेत रामाच्या रूपात पृथ्वीवर आले होते, पण जेव्हा त्याचा पृथ्वीवरचा राहण्याचा काळ पूर्ण झाला तेव्हा त्यांना देवलोकी परतावे लागले होते. आणि श्री राम हे देवलोकी कशा पद्धतीने गेले याबद्दल एक गोष्ट आहे, आपल्याला माहित आहे कि भगवान विष्णू यांनी एकुण दहा अवतार घेतले होते. आणि अयोध्येत इक्ष्वाकू वं शात ज न्मलेले श्री राम हे तेथील राजा दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र होते.

आणि त्यानं तब्ब्ल दहा वर्ष तेथे शा सन केले होते, आणि एका राम चरित्रात तुलसीदास लिहितात की, त्यांच्या रा ज्यात कोणाचाही अल्प मृ त्यू किंवा कोणीही कोणत्याच रो गाने ग्रा सलेले नव्हते. आणि राम याच्या शेवटच्या प्रवासाबद्दल आणि श्रीराम यांनी आपल्या प्रिय भावाला म्हणजेच लक्ष्मणला मृ त्यूदं ड का दिला, याबद्दल कदाचित कोणालाच माहित नसेल.

पण याचा सर्व उल्लेख पद्मपुराणात केला गेला आहे, आणि याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, पद्मपुराणातील कथेनुसार एकदा एक वृद्ध संत श्री रामाच्या दरबारी पोहोचले आणि त्यांनी श्री रामाला म्हटले की, मला तुमच्यासोबत एकट्यात काही बोलायचे आहे आणि मग तेव्हा श्री रामाने त्या संतांची विनंती स्वीकार केली आणि त्यांना घेऊन एका खोलीत गेले. आणि त्यांनी लक्ष्मणला बाहेर पहारा देण्यास सांगितले, आणि एवढेच नाही तर त्यांनी आ देश दिला कि कोणीही आत यायला नको.

आणि जर कोणामुळे संत आणि त्यांच्यामधील चर्चेत खं ड पडला तर त्याला मृ त्यू दंड देण्यात येईल. एवढे सांगून ते आत खोलीत निघून गेले आणि लक्ष्मण आपल्या भावाच्या आज्ञेच पालन करत तिथे पहारा देऊ लागला. तेव्हा श्री राम याना भेटण्यास आलेले ते संत काल देव होते. आणि त्यांना खरं तर विष्णू लोकातून पाठविण्यात आले होते. तुमचा म्हणजेच श्री राम याचा पृथ्वीवरील वेळ संपतो आहे, आणि आता त्यांना विष्णुलोकात परत यावे लागेल. हेच सांगण्याकरिता ते राम यांना भेटण्यासाठी आले होते.

पण तेवढ्यातच ऋषी दुर्वासा राजमहालात येऊन पोहोचले. तसेच हे ऋषी एकदम रा गीट होते आणि त्यांनी सरळ आल्या आल्या श्री राम याना भेटण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांनी लक्ष्मणाला सांगितले कि, त्यांना कोणत्याही परस्थितीमध्ये रामाला भेटायचे आहे. पण लक्ष्मण तर राम यांच्या आज्ञेच पालन करत होते. म्हणून त्यांनी दुर्वासा ऋषींना न कार दिला. आणि या गोष्टीचा त्यांना खूप रा ग आला. त्यांनी म्हटले की, जर राम त्यांना भेटले नाही तर ते त्यांना श्राप देतील.

आता आपल्या प्रिय भावाकरिता ऋषींचे हे शब्द ऐकून लक्ष्मण खूप घा बरले. ते संभ्रमात पडले कि आता करायचे तरी काय, रामाच्या आज्ञेच पालन करायचे की त्यांना ऋषींच्या श्रापापासून वाचवायचे. लक्ष्मणाला माहित होते की, जर ऋषींना आत जाऊ दिले नाही तर ते श्री राम यांना श्राप देतील आणि जर त्यांना आत जाऊ दिले रामाच्या आज्ञेच उ ल्लंघन होईल. त्यामुळे लक्ष्मणाने स्वतः आत जाऊन राम यांना दुर्वासा ऋषी बाबत सांगण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा की त्यांना हे माहित होते की, चर्चा भं ग केल्यावर त्यांना मृ त्यु दंड देण्यात येईल. तरी देखील त्यांनी रामाला श्राप मिळू नये म्हणून हा निर्णय घेतला व त्यानंतर लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला, ज्यामुळे राम आणि काल देव यांच्यातील चर्चेत खंड पडला. लक्ष्मणाला बघून राम दुविधेत पडले, त्यांना कळे ना काय करावं. ते पहिलेच बोलून चुकले होते की, चर्चेत खंड पाडणाऱ्याला मृ त्यू दंड देण्यात येईल. आता एकीकडे त्यांचा निर्णय होता आणि दुसरीकडे त्यांचा प्रिय लक्ष्मण.

पण राम यांनी आपला ध र्म निभावला आणि आपल्या प्रिय भावाला रा ज्य आणि देशातून निष्कासित करण्याचा आदेश दिला. लक्ष्मणाला श्रीरामांच्या अयोध्येतून काढून टाकणे म्हणजे काही मृ त्यू दंडा पेक्षा कमी नव्हते. पण लक्ष्मणाला हा निर्णय पटला नाही. आपल्या मोठ्या भावापासून दूर होणे त्यांना जराही मान्य नव्हते. तेव्हा लक्ष्मणाने विचार केला की, अश्या जी वनाचा काय अर्थ.

असा विचार करत लक्ष्मण शरयू नदीकडे निघाले आणि त्या नदीत त्यांनी जल स माधी घेतली. नदीत जाताच लक्ष्मणाचे अनंत शे ष अवतारात रुपांतर झाले आणि अश्याप्रकारे लक्ष्मण विष्णु लोकात पोहोचले. आपल्या प्रिय भावाच्या विरहाने राम दु खी झाले, त्यांनी त्यांचे शा सन सोडले. आपल्या मुलांना आणि भावांच्या मुलांना सर्व सत्ता सोपवून श्रीराम यांनी देखील शरयू नदीत जल स माधी घेतली.

शरयू नदीत जाताच राम अदृश्य झाले आणि विष्णू अवतारात प्रगटले. त्यांनी सर्वांना दर्शन दिले आणि अश्याप्रकारे राम अवतार आपला पृथ्वीवरील काळ संपवून विष्णु लोकात परतले. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *