हिं दू ध र्मामध्ये ३३ कोटी देवांचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे हे आपल्या सर्वानाच माहित आहे. देवध र्म, चालीरीती, विविध संस्कार यामुळे हिं दु ध र्म अधिक समृद्ध झाला आहे. आपल्या हिंदुध र्मामध्ये बाळाच्या जन्मापासून त्याच्यावर विविध असे १६ संस्कार सांगितले आहेत. त्याचप्रकारे बाळ ज न्माला आल्यावर अनेक विधी- पूजा सुद्धा केल्या जातात.
आणि पाचवीची पूजा हि त्यापैकीच एक आहे. हि पूजा हा वै दिक संस्कार नसला तरी लौकिक अर्थाने बाळाच्या जी वनातील हा पहिलाच विधी असतो. बाळ ज न्माला आल्यावर पाचव्या दिवशी हि पूजा केली जाते. त्यादिवशी सटवाई येऊन बाळाचे भविष्य लिहिते तेव्हाच बाळाच्या नशिबाची रेखा कपाळावर आखली जाते.
अशी मान्यता आहे. तर मंडळी, आज आपण या सटवाई देवी बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सटवाई हि बाळाचे भविष्य लिहिणारी देवी आहे. या देवीस सातवी, सटुआई, सटी, षष्टीदेवता, रानसटवाई, छटी, घोडा सटवाई अशी अनेक नवे दिली गेली आहेत. बाळ ज न्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाई पूजा केली जाते.
याला पाचवीच्या पूजा असे सुद्धा म्हणतात. यादिवशी सटवाई कोणत्याही रूपात येऊन बाळाचे भविष्य लिहून जाते, असा समज आहे. म्हणूनच पूजा करून त्या ठिकाणी कोरा कागद, पेन किंवा टाक ठेवले जाते. सटवाई देवी अनेक ग्रामदेवता आहे. तिच्या मंदिरांचे बांधकाम केले जात नाही तर फक्त आडोसा केलेला असतो.
जेंव्हा बाळ झोपेत असताना मधूनच हसते तेव्हा लोक म्हणतात कि सटवाई बाळाला हसवते. सटवाई बद्दलची एक पौराणिक कथा सुद्धा प्रसिद्ध आहे. ती कथा अशी, एकदा सटवाईच्या मुलीला आपली आई रोज रात्री कोठे जाते असा प्रश्न पडला. तिने त्याबद्दल आपल्या आईला म्हणजेच सटवाईला विचारले असता तिने आपल्या मुलीच्या देणे टाळले.
पण जेव्हा मुलगी खूप हट्ट करू लागली तेंव्ह मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला व तिने सांगितले कि ती रो रात्री मी नवीन ज न्माला आलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जात असते. हे उत्तर ऐकून तिच्या मुलीने तिला प्रश्न विचारला, कि तू सगळ्यांचे भविष्य लिहितेस तर मग माझे सुद्धा भविष्य काय आहे ते मला सांग यावर सटवाई म्हणाली कि,”तुझे लग्न तुझ्या पोटी ज न्माला आलेल्या मुलासोबतच होणार आहे.
“हे भविष्य ऐकून ती मुलगी ल ग्नच न करण्याचा निर्णय घेते. काही दिवसांनंतर एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळील नदीवर पाणी पिण्यासाठी येतो, जेव्हा तो चूळ. भरुन ते पाणी नदीत थुं कतो ते पाणी योगायोगाने सटवाईच्या मुलीच्या पाण्यात मिसळते, आणि त्यामुळे तिला दिवस जातात. पुढे ते मूल ती एका कापडात गुं डाळून जंगलात टा कून देते.
ते मूल एका राजाला सापडते, तो राजा त्या मुलाचे पालन पोषण करतो. कालांतराने हे मूल मोठे होते. असेच एकदा शि कार करण्यासाठी म्हणून तो मुलगा जंगलात येतो, तेव्हा त्याला त्याची माहित नसलेली आई म्हणजेच सटवाईची मुलगी दिसते, दोघांची नजरानजर होते व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात.
आपण आपल्याला झालेला मुलगा टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे भविष्य खोटे ठरेल असे तिला वाटले. म्हणून तिने राजपुत्राच्या प्रेमाला प्रतिसाद दिला पुढे त्यांचे ल ग्न होते. त्यानंतर तिने आपल्या बाळाला गुंडाळून जंगलात फेकलेले असते ते काप त्या राजपुत्राकडे आहे हे ती पहाते. व तिला आपल्या आईने सांगितलेल्या भविष्याची आठवण होते. व सातवाहन लिहिलेले प्रारब्ध कधी चु कत नाही याची खात्री पटते. म्हणूनच आपल्याकडे ‘सटीचा लेखाजोखा ना चुके ब्रम्हादिका असे म्हणले जाते.
सटवाईची पूजा कशी करावी:- घरातील ज्येष्ठ स्त्रिया हि पूजा करतात. जन्मापासून पाचव्या दिवशी हि पूजा करतात, तेव्हा एका मोठ्या सूपामध्ये किंवा दगडी पाट्यावर याची मांडणी करतात. ५ विड्याची पाने मांडून त्यावर सुपारी, नाणी, बदाम, खारका, हळकुंड ठेवतात नैवेद्यासाठी वरण, भात, कढी, पुरणपोळी असा बेत केला जातो.
सष्टीची प्रतिमा आणून तिची पूजा केली जाते. इष्ट दे वतांना आवाहन करून पं चोपचाराने त्यांचे पूजन केले जाते. रातभर कणकेचा मोठा दिवा लावून ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी पूजेचे विसर्जन करतात. अश्या पूजेचे फळ सर्वांना लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !