आनंदाच्या भरात बापाने सगळी संपत्ती मुलाच्या नावे केली; पण पुढे जे मुलाने केले ते खूपच भयानक होते….

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आयुष्यात माणसाकडून अनेक लहान-मोठ्या चुका होतात कारण माणूस म्हणलं की चुका या होणारच. पण काही चुका अशा असतात की ज्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. आणि अशीच एक चूक एका वडिलांकडून झाली होती आणि त्या चुकीमुळे त्यांना खुप सं कटांना सामोरे जावे लागले एवढंच नाही तर त्यांच्यावर उपासमा रीची वेळ आली आहे.

पण त्या वडिलांनी नेमकी काय चूक केली? त्याबद्दल थोडेसे जाणून घेऊया. राधाबाई आणि साहेबराव हे जोडपं चार दिवस लेकीच्या घरी राहण्यासाठी म्हणून गेले होते. ते तिथे काही दिवस राहून घरी परत येण्यासाठी निघाले. वाटेत त्यांनी आपल्या दोन नातींसाठी आणि एका नातवासाठी खावू घेतला आणि चारच्या सुमारास ते घरी पोहोचले.

घरी पोहोचल्यावर हातपाय धुऊन ते आराम करत होते. तर त्यांना घरात एकदम शांतता जाणवली घरामधे फक्त एक मोठी नात आणि त्यांची सून आशा होती, त्यांची लहान लहान नातवंडे घरात नव्हती. त्यांच्या मोठ्या नातीने त्यांना चहा आणून दिला आणि चहा पिताना साहेबरावांचे लक्ष हे बांधून ठेवलेल्या सामानाकडे गेले. जे त्यांच्या सुनेने बांधून ठेवले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या सुनेला त्या सामानाबद्दल विचारले.

तर त्यावर तिने त्यांना उलट उत्तर दिले आणि म्हणाली की, आता आम्ही तुम्हाला कंटाळून गेलो आहोत, तुम्ही तुमच्या राहण्याची दुसरीकडे सोय करा. तिच्या तोंडून अस सर्व ऐकून त्या दोघांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना समजून आले की, त्यांची ही सून एकटी एवढं बोलणार नाही. तर त्यांच्या मुलाचाही याला पाठींबा आहे.

साहेबराव न्हावी काम करायचे. स्वत:च्या कष्टाने त्यांनी हे घर उभारले होते. त्यांनी पुढे स्वतःचे सलून सुरू केले होते आणि अपार कष्टाने पैसे, संपत्ती आणि दागिने मिळविण्यासाठी क ठोर परिश्रम सुद्धा केले होते. मुलगा मोठा झाल्यावर साहेबरावांना कामात मदत करू लागला. त्यांनी प्रथम त्यांच्या धाकट्या मुलीचे लग्न केले आणि नंतर मोठ्या मुलाचे  लग्न केले दोघांचेही लग्न खुप थाटामाटात केले होते.

मुलाच्या लग्नानंतर त्यांची सून आशा घरी आली. मुलाला दोन मुली आणि नंतर एक मुलगा झाला. आणि त्यामुळे संपूर्ण घरात नंदनवन होते. साहेबरावांनी आपले सलून व घर व सर्व दागिने आपल्या मुलाला व सुनेला आनंदाच्या भरात देऊ केले आणि या चुकीमुळे त्यांना म्हातारपणी अशा वा ईट दिवसांना सामोरे जावे लागले.

साहेबराव आणि राधाबाई आता राधाबाईंच्या मामेबहीण सोबत गावाबाहेर एका झोपडीमधे राहतात. राधाबाई वयाच्या ६५ व्या वर्षी उदरनिर्वाहासाठी गावामधे घरकाम करतात. त्याच बरोबर दम्याच्या आ जाराने ग्र स्त असल्याने आणि त्यांची तब्येत सतत कुरकुर करत असल्याने, साहेबराव घरातील सर्व कामे हळूहळू करतात.

मात्र, गावात भजन किंवा कोणताही उत्सव असला की, साहेबराव हे त्यांच्यासोबत पेटीवर त्यांची साथ देत असत आणि त्यांची उठबस ही चांगल्या लोकांमधे होती. याच दरम्यान साहेबराव आणि राधाबाई यांना कळले की, को रोना आल्यामुळे त्यांच्या मुलाचे सलून बंद पडले आहे आणि नातवंडांच्या खाण्यापिण्याचे हाल होत होते. पण हे सर्व समजल्यावर त्यांचा नातवंडासाठी जी व तुटू लागला होता.

त्यामुळे त्यांनी निराधार योजना आणि श्रावणबाळ या योजनेचे पैसे त्यांच्या मुलाला देऊ केले आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. अशा काही चुकांमुळे तुम्हालाही अनेक स मस्यांना सामोरे जावे लागू शकते म्हणून अशा चुका करु नका. म्हातारपणी स्वतःसाठी पैसे राखून ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *