आता आपण पण बनू शकता ‘करोडपती’…फक्त करा या प्रकारे या क्षेत्रात गुंतवणूक…जाणून घ्या श्रीमंत बनायचे काही नियम

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आपण सर्व जण काम करतो ते पैसे मिळून आपला उदरनिर्वाह करण्यासाठीच. फक्त मेहनत करून पैसे कमावणे एवढेच पुरेसे नसते, तर मिळवलेल्या पैश्यांचे योग्य नियोजन करून आपली सं पत्ती वाढवणे सुद्धा तेवढेच गरजेच असते. अश्या योग्य नियोजनामुळेच आपली आर्थिक स्थैर्य मिळते आणि आयुष्यात पुढे येणाऱ्या सं कटांना सामोरे जाणे सोपे जाते.

ज्यामुळे महागाई, भविष्यातील गरजा आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतील. म्हणूनच मिळवलेल्या पैश्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. म्हणूनच आपण पैश्यांची योग्य गुंतवणूक करणे जरुरी आहे. योग्य नियोजनामुळे आणि शिस्त बद्ध अमलबजावणी केल्याने आपल्याला अपेक्षित धनवृद्धी होऊ शकते.

या साठीच गुंतवणूक कधी, कोठे व कशी करायची हे माहित असणे गरजेचे असते. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. ही आहेत योग्य गुंतवणुकीची काही सोपी सूत्रे: –

संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आपण आज जी गुंतवणूक करतो त्याची संपत्ती बनण्यास काही वर्षांचा कालावधी लागत असतो. म्हणूनच आपण गुंतवणुकी मध्ये सं यम ठेवणे जरुरीचे असते. तुमचा संयम जेवढा अधिक तेवढी तुमची धन वृद्धीची खात्री अधिक हे लक्षात ठेवले पाहिजे. चटकन श्रीमंत होण्याची अपेक्षा न ठेवता छोट्या छोट्या पावलांनी प्रगती करा.

मोठी रक्कम बनण्याचा कालावधी सुद्धा जास्त लागत असतो. त्यामुळेच शक्य तेवढ्या लवकर गुंतवणूक करणे फा य देशीर ठरते. कमी वयात केलेली गुंतवणूक अधिक लाभ मिळवून देत असते. त्याच बरोबर कमी वयात कमी रक्कम गुंतवणूक केली तरी चालू शकते. तसेच नियमितता हा गुंतवणुकीचा पाया आहे असे म्हणतात.

शिस्तबद्ध पद्धतीने वर्षानुवर्षे केलेली गुं तवणूक अधिक फायदे मिळून देत असते. म्हणूनच कोणती गुंतवणूक करणे चालू केल्यास ती नियमित चालू ठेवणे खूप गरजेचे असते. एसआयपी सारख्या चक्रवाढ देणाऱ्या प्रकारात गुंतवणूक करून कमी वेळात जास्त पैसे मिळतात. तसेच गुंतवणूक करत असताना पो र्टफ़ो लिओ तयार करणे खूप जरुरी असते.

त्यासाठी आपण आपले वय, उत्पन्न, जो खीम क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी या सगळ्या गोष्टींचा विचार करणे देखील महत्त्वाचे ठरत असते. आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार आर्थिक नियोजन करत असताना आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे फा यदेशीर ठरते. हे सर्व करत असताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे कि, आर्थिक संपन्नतेसाठी गुंतवणूक आवश्यक आहेच, म्हणून गुंतवणूक करताना जो खीम लक्षात ठेउनच गुंतवणूक केली पाहिजे.

आर्थिक गुंतवणूक करताना घ्यायची काळजी तर आपण वाचलीच. आता आपण पाहूया गुंतवणूक कोठे करायची? गुंतवणूक कशी करायची याबाबत आपल्या म नात खूप संभ्रम असतो. आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित असणे देखील महत्त्वाचे आहे. गुंतवणूक करत असताना आपल्याजवळ फक्त पैसे जवळ असणेच गरजेचे नसते, तर आपल्या जवळ योग्य पर्याय देखील असला पाहिजे. पाहूयात की आहेत योग्य गुंतवणुकीचे सोपे पर्याय

पीपीएफ:- पीपीएफ मध्ये गुंतवलेल्या रकमेवर मिळणार व्याज आणि मॅच्युरीटी वेळी मिळणारी रक्कम हि टॅ क्स फ्री असते. यामध्ये प्रत्येक तीन महिन्यांनी व्याजाची समिक्षा केली जाते. पीपीएफ मध्ये वर्षाला कमीतकमी ५०० ते १५०००० रुपये गुंतवता येतात.

लि क्विड फं ड्स:- यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळते. तसाच पैसेही सहज काढता येतात. एफडी आरडी पेक्षा जास्त व्याजदर नक्कीच जास्त आहे. लि क्विड फं ड हा एक प्रकारचा म्युचल फंड आहे. या गुंतवणुकी मध्ये धो का कमी असतो. तसेच पैसे काढताना कोणतीही वेळेची मर्यादा नसते.

पोस्ट ऑफिस:- बँकेमध्ये केलेली गुंतवणूक कमी व्याजदर मिळून देते. मात्र पोस्ट ऑफिस मधल्या गुंतवणुकीवरील व्याजदर कमी केले गेले नाहीत. त्यामुळे ही गुंतवणूक अधिक फा यद्याची ठरते.

स रकारी बॉंडस्स:- स रकारी बॉंडस् हे जास्त व्याजदर मिळून देणारी गुंतवणूक ठरते. त्यामुळे गुंतवलेल्या पैश्यंचा जास्त परतावा लवकरात लवकर मिळतो. लाइफ इ न्शुरन्स फं डस्:- या मध्ये केलेली गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी करावी लागते.

रिअल इस्टेट:- हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला कधीच तो टा किंवा नु कसान होत नाही, फक्त या क्षेत्रात आपल्याला संयम असणे महत्वाचे आहे आणि त्याचं सोबत योग्य निवड आणि आपली दूरदृष्टी असणे महत्वाचे आहे, असे असेल तर आपण करोडो रुपये या क्षेत्रातून कमावू शकता.

म्यु च्युअल फंड:- अनेक लोकांकडून पैसा जमा करून तज्ञाकडून तो गुंतवणे, याला म्हणतात म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड बऱ्याच प्रकारचे असतात. आपल्याला उद्देशानुसार म्युच्युअल फंड निवडणे आपले काम असते. हे आपण स्वतः करू शकतो किंवा वितरकाची मदत घेऊ शकतो, यामधून सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणत पैसे कमावू शकतो.

शेअर बाजारातील गुंतवणूक:- जर काही प्रमाणआत धो का प त्करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. जास्त कालावधीत गुं तवणूकदारांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची सध्या चांगली संधी बाजारात उपलब्ध आहे.

सोन्यामध्ये गुंतवणूक:- को रो ना सं कटाच्या गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं पाहायला मिळालं. खरंतर, जेव्हा-जेव्हा आर्थिक मंदी येते तेव्हा नेहमीच सोन्यात गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय आहे. आताच्या परिस्थितीत सोनं उच्च पातळीपेक्षा 10 टक्क्यांहून जास्त आहे. पण गेल्या एका वर्षात सोन्याने 30 टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता.

मंडळी वरील गुंतवणुकीचे विविध पर्याय वापरून योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करा. गुंतवणूक कशी करावी:- वर आपण गुंतवणुकीचे प्रकार पाहिले, यावरून तुम्हाला गुंतवणुकीबद्दल काही अंदाज आलाच असेल. आपल्या उद्दिष्टानुसार गुंतवणूक केली पाहिजे. जर तुम्हाला ही गोष्ट कठीण वाटत असेल तर तुम्ही यात आर्थिक स ल्लागाराची मदत घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *